भविष्य

1 एप्रिल 2020 चं राशीफळ, धनू राशीच्या लोकांना धनलाभ

Rama Shukla  |  Mar 30, 2020
1 एप्रिल  2020 चं राशीफळ, धनू राशीच्या लोकांना धनलाभ

मेष –  व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता

रखडलेल्या व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकीच्या योजना तयार कराल. आरोग्याकडे केलेला दुर्लक्षपणा महागात पडण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नका. ध्यान आणि योगातील रस वाढणार आहे. 

कुंभ –  जोडीदारासोबत वाद असलेला वाद मिटेल

आज तुमच्या संतान सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वाद मिटण्याची शक्यता आहे. घरात एखादे मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे.अध्यात्म आणि योगातील रस वाढणार आहे. मित्रांसोबत फोनवरच बोला. 

मीन- कामे रद्द होण्याची शक्यता

आज पर्यटनासंबधीत व्यवसायांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. कामे रद्द होण्याची शक्यता आहे. काम करण्यात दुर्लक्षपणा करू नका. वाहन चालवताना सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ –  परिक्षा रद्द होण्याची शक्यता

आज विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. आयात आणि निर्यातीच्या व्यवसायात अडथळे येतील. विनाकारण खर्च करणे टाळा. जवळच्या लोकांची काळजी घ्या. नाते मजबूत होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

मिथुन -स्वभावात चिडचिडेपणा येण्याची शक्यता

आज एखाद्या अज्ञात भितीमुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येण्याची शक्यता आहे. मन निराश आणि भितीग्रस्त राहील. पैशांबाबत एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूकीची योजना आखाल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. 

कर्क – कौटुंबिक वाद दूर होतील

आज कौटुंबिक वाद दूर होण्याची शक्यता आहे. घरात जोडीदारासोबत कॅंडललाईट डिनर करणार आहात. राजकारणातील सहकार्य वाढणार आहे. व्यवसायात फायदा होईल. पदोन्नतीची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. 

सिंह – रखडलेला व्यवसायात प्रगती होईल

आज कामाच्या ठिकाणी एखादा सुखद बदल होणार आहे. रखडलेल्या कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांमधील लपलेले कौशल्य बाहेर पडणार आहे. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. 

कन्या – पैशांबाबत समस्या जाणवतील

आज पैशांबाबत एखादी समस्या डोकं वर काढणार आहे. आवश्यक्तेनुसार थोडे थोडे सामान खरेदी करा. कुटुंबातील लोकांमध्ये एकजूट जाणवणार आहे. रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील. आपल्या लोकांची काळजी घ्या. 

तूळ – हेल्थ रिपोर्ट चांगला येईल
आज एखाद्या आजारपणासाठी काढलेला हेल्द रिपोर्ट चांगला असणार आहे. कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ घालवा. विनाकारण खर्च करणे टाळा. व्यवसायात स्थिर राहा. रचनात्मक कार्यात मन रमवा. 

वृश्चिक – तणाव वाढण्याची शक्यता

आज एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे भांडण होणार आहे. व्यवसायातून तणाव मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य आणि साथ मिळेल. आर्थिक बाजू मजबूत असेल. वाहन चालवणे टाळलेलेच बरे राहील. 

धनु – पैशांबाबत चांगली बातमी मिळेल

आज पैशांबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. घरातून बाहेर पडू नका. स्वतःची काळजी घेण्यासाठी चांगला काळ आहे. व्हॉईल कॉल अथवा व्हिडिओद्वारा मित्रांशी संवाद साधा. मानसिक उर्जेत वाढ होणं गरजेचं आहे. 

मकर –  तणाव वाढेल 

आज तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. व्यवसायातील मंद गतीमुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च करणे टाळा. तुमची प्रतिष्ठा सुधारण्याचा हा योग्य काळ आहे. प्रवासाला जाणे सध्या टाळा. 

 

 

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

 

Read More From भविष्य