मेष- आजचा दिवस आपल्यासाठी परिवाराच्या आनंदात रममाण होणारा आहे. मात्र त्यासाठी खिसा रिकामा करावा लागू शकतो. कारण आजचा दिवस आनंदासह थोडासा खर्चिकही आहे. आज परिवारासोबत शॉपिंग, प्रवास, मौजमस्ती करण्यावर आपला भर राहिल. मनसोक्तपणे मुलांची हौस पुरवाल. काही ठिकाणी मनाविरुद्धही खर्च करावा लागू शकतो. मात्र सुख असो दु:ख त्याची योग्य ती किंमत आपल्याला मोजावीच लागते. यालाच जीवन असं म्हणतात.
कुंभ- आज वर्षाचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी आपल्याला भाग्याचीदेखील साथ लाभणार आहे. नववर्षाच्या आनंदात, उत्साहात आपण जो संकल्प केला असेल त्याची अंमलबजावणी करायला अजिबात चुकू नका. महत्त्वाचे म्हणजे आज आपल्याला आर्थिक लाभही होऊ शकतो. त्यामुळे उत्साह द्विगुणीत होईल. मात्र हे सर्व तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपण अचूक प्रयत्न कराल .आज तर भाग्यदेखील आपल्या सोबतीला आहे. आपल्या भाग्याचा योग्य तो लाभ घ्या. आज आपल्याला प्रवासाचेही योग आहेत त्यातूनही आपल्याला लाभ मिळू शकतो.
मीन- वाद तेव्हाच घडून येतात जेव्हा सुसंवाद साधण्यात आपण कुठेतरी कमी पडतो. आज दिवस आपल्यासाठी अगदी तसाच आहे. आज काहीही घडलं तरी कुठलाच वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्या. विशेष म्हणजे आज आपल्याला आर्थिक चिंताही सतावू शकते. मुलांसोबत वाद होऊ शकतात. वादावर दोन मुख्य उपाय आहेत. एक म्हणजे योग्य सुसंवाद साधुन वाद मिटविणे किंवा त्याला सुरु होऊ न देणे.आणखी एक उपाय म्हणजे शक्य झाल्यास शांत बसणे. प्रत्येक दिवस सारखा नसतो म्हणून येणाऱ्या उद्यासाठी तरी आपण आज शांत बसले पाहिजे. वाद नैराश्याला जन्म घालतो. म्हणून आद वादापासून सावध राहा.
वृषभ – जीवनात अनेक गोष्टींना महत्त्व असतं. या गोष्टींना तेवढं जपलंही गेलं पाहिजे. त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य होय. आपलं आरोग्य सुदृढ राहिलं तरचज जीवनात समस्यांचा सामना चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. आज आपलं आरोग्य खालावण्याची शक्यता आहे. जुनी दुखणी डोकं वर काढू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. कामातून आपल्याला आनंद मिळेल. कामात देहभान विसल्याने आजारातून होणाऱ्या त्रासाचा विसर पडू शकतो. शक्य तेवढे काम व्यग्र राहणे व मनापासून काम करणे आज आपल्या हिताचे राहिल.
मिथुन- आपण जे काही करतो ते प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या स्वत:पेक्षा कुटुंबासाठी अधिक चांगलं असतं. ज्याच्या घरात सुख, शांती आहे ती व्यक्ती बाहेरील जगातल्या कुठल्याही आव्हानाला सक्षमपणे तोंड देऊ शकते. त्यामुळे आज आपल्यासाठी कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. आज तुम्ही जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा माराल. फार क्वचित होणारी आई व बायकोची एकजुटही आज तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल. स्वत:साठी, परिवाराच्या आनंदासाठी नवीन गोष्टीचे नियोजन, संकल्प करणे आज हिताचे राहिल. घरातील आनंदाचा लाभ घेऊन केलेले संकल्प तडीस नेण्याचे नियोजनही आजच सर्वांकडून करुन घ्या.
कर्क – आज वर्षाचा पहिला दिवस असल्याने त्याचा उत्साह आपल्याला व्यावसायामध्येही अनुभवास येईल. नवीन वर्षात स्वत:साठी काही संकल्प आपण केले असतीलच. सोबतच व्यावसायासाठीही एखादा संकल्प नक्की करा. कारण व्यावसायिक दृष्टीकोणातून आज दिवस आपल्यासाठी लाभाचा आनंदाचा ठरेल. एखादी चांगली बातमी कानी येईल. त्यामुळे सकारात्मकता व प्रसन्नतेचे वातावरण आजुबाजुला राहिल. मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या की प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही. म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहा. यश नक्की मिळेल. गरज पडल्यास वडीलांचे मार्गदर्शन, सल्ला घ्यायला विसरु नका. त्यातून नवीन दिशाही मिळू शकते.
सिंह- कभी खुशी.. कभी गम हा सुख-दु:खाचा पाठशिवणीचा खेळ आयुष्यामध्ये सुरु असतो. मात्र काही वेळेस एकाच दिवशी सुख व दु:ख असे दोन्ही अनुभवयास मिळेल. त्यापैकीच एक आजचा आपला दिवस आहे. थोडक्यात आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र ठरणार आहे. कारण कोणत्यातरी कारणाने घरात वडीलांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे घरात शांत राहून शक्य तितके शब्दांवर नियंत्रण ठेवा. काही समस्यांवर शांत बसणे हा उत्तम मार्ग ठरतो. कार्यक्षेत्रात मात्र आज पराक्रमात वाढ होण्याचे संकेत आहे. त्यामुळे घरात शांत राहून बाहेर म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये शक्य ते सर्व प्रयत्न करण्यामध्ये अजिबात कमी पडू नका. प्रेम प्रकरणातही यश प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे मनाला आनंद प्राप्त होईल.
कन्या- जीवनात फक्त पैसाच सर्वकाही नसला तरी पैसे मिळाल्याचा आनंद हा होतोच. आज आपल्यासाठी आर्थिक लाभाचा दिवस आहे. आज एखादं काम होऊ शकतं किंवा जुनी देणी मिळू शकतात. पैसा जेव्हा हाती नसतो तेव्हा खर्चही नसतात आणि पैसा आल्यावर मात्र खर्चही आपोआप वाढतात. त्यामुळे आज तुम्ही खर्चही करणार आहात. घरासाठी आनंदाने खर्च करण्याकडे तुमचा कल राहिल. फक्त अवास्तव काही खर्च होत नाही आहे ना? याकडे जरा लक्ष ठेवा. कारण त्यामुळे तुमच्यावर लक्ष ठेवणाऱ्या जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवास्तव खर्चाला आवर घालणे आणि सामंजस्याने वागणेच आपल्या हिताचे राहिल.
तुळ – आनंद आणि लाभ या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. लाभ मिळाल्यास आनंदही मिळेल अशी अपेक्षा आपण करु नये आणि आणि आनंद मिळाल्यास लाभही कमी वाटू शकतो. मात्र लाभ आणि आनंद हे जेव्हा दोन्ही एकत्रित मिळतात तेव्हा काही प्रसंगांमध्ये दुग्धशर्करा योग जुळून येतो. आजचा दिवस आपल्यासाठी लाभ आणि आनंद असा दोन्ही देणारा आहे. कारण व्यवसायात आज तुम्हाला आर्थिक लाभ तर मिळणार आहेत शिवाय काही नवीन संधीही उपलब्ध होऊ शकतात. नोकरदार मंडळींसाठी बढतीची संधी उपलब्ध होऊ शकते. बढती म्हणजे नवीन जबाबदाऱ्या त्यामुळे त्या ही तुम्ही अगदी आनंदाने स्विकारणार आहात.
वृश्चिक- सडेतोडपणे एखादी गोष्ट बोलणे किंवा टोमणे मारणे, टोचुन बोलणे हा वृश्चिक राशीच्या लोकांचा मुळ स्वभावच असतो. आपल्या या स्वभावाला आज थोडा आवर घाला. कारण आज जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. घरात भाड्यांला भांडं लागलं तर आवाज होतोच. अशा परिस्थितीत कोणी तरी एकाने समजूतदारपणा घेणे गरजेचे असतं. आजचा दिवस आपल्यासाठी चिंतेचादेखील आहे. कारण आज आर्थिक चिंता आपल्याला सतावू शकतात. अशा परिस्थितीत तर आपण आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवायलाच हवे. आपल्या शब्दांनी कोणी दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या.
धनु- आज तुमचं कर्तृत्व उजळून निघणारा दिवस आहे. कारण आजचा दिवस आपल्यासाठी लाभाचा आहे. विशेषत: आपल्याला आज प्रॉपर्टी क्षेत्रातून लाभ मिळू शकतो. अडकलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. लाभ जर आर्थिक असेल तर सोबत तो चिंताही घेऊन येतो. त्यामुळे आज मानसिक चिंताही सतावू शकते. त्यामुळे शक्यतोवर चुकीचे किंवा बेकायदेशीर व्यवहार करू नका. कारण असे व्यवहार फक्त फक्त क्षणिक लाभ देणारे असतात. अशा व्यवहारांपासून लांब राहा. कोणताही निर्णय घेतांना सावधपणे घ्या.
मकर- नाविन्य मग ते कोणतंही असो त्यातून आनंद हा मिळतोच. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे नाविन्य जपत असतो. आज आपला प्रत्यक्षपणे नाविन्य जपण्याकडे कल राहिल. विशेषत: आज आपण व्यवसायात नाविन्य जपाल. त्यामुळे स्फूर्ती, उत्साह वाढेल. नवीन योजना तयार कराल. नाविन्य आणि उत्साह यांची युती जेव्हा होते तेव्हा कामाचा उरक व त्या कामाची गुणवत्ताही सर्वात्तम असते. ते करीत असतांना मग देहभान विसरायला होतं. आज आपल्यासाठी तेच चिंतादायक आहे. कारण कामाची दगदग आज तुम्हाला सोसवणार नाही. त्यातून आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. दगदगीमुळे थकवा जाणवू शकतो. म्हणून आज नाविन्य जपा, उत्साहही दाखवा मात्र प्रकृतीला जपा. कारण याच उत्साहाने तुम्हाला उद्याही काम करायचे आहे.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje