मेष – कठीण काळात वडीलांची साथ मिळेल
आज तुम्ही तुमच्या घरच्या लोकांसोबत मोकळेपणाने बोलणार आहात. ज्यामुळे कौटुंबिक तणाव कमी होणार आहे. कठीण काळात तुम्हाला तुमच्या वडीलांची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवासाला जाणे टाळा.
कुंभ – विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष द्यावे लागेल
विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन रमवण्याची गरज आहे. व्यवसायात सावधगिरी बाळगा. वाहन चालवताना सावध राहा. रचनात्मक कार्यात रस वाढेल. जोडीदाराची साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल.
मीन- आरोग्याची काळजी घ्या
आज तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. व्यवसायात चढ उतार जाणतील.
कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
वृषभ – प्रतिभेला योग्य न्याय मिळेल
आज विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चांगले यश मिळेल. कुटुंबासोबत संगीत आणि इतर मनोरंजक कार्यक्रमात वेळ घालवाल. सरकारी बाबतीत जोखिम घेऊ नका. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
मिथुन – आर्थिक संकट येण्याची शक्यता
आज तुमच्यावर एखादे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे टाळलेलेच बरे राहील. जोडीदाराची साथ मिळणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मित्रांची भेट होणे अशक्य आहे. आईवडीलांसोबत वेळ घालवा.
कर्क – मन उत्साहित आणि आनंदी असेल
आज तुमचे मन आनंदी आणि उत्साही असेल. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला मदत केल्यामुळे मन प्रसन्न होईल. कामाच्या ठिकाणी परिवर्तन होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल.
सिंह – प्रिय व्यक्तीकडून तणाव मिळण्याची शक्यता
आज तुमच्या जोडीदाराकडून तणाव मिळू शकतो. व्यवसायातील स्थिती सुधारणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या दूर होतील. विनाकारण खर्च करणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या. रखडलेली कामे पूर्ण करा.
कन्या – चल अचल संपत्ती खरेदी कराल
आज तुम्ही एखादी नवीन संपत्ती खरेदी कराल. घरातील सजावटीच्या कामात वेळ जाईल. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहा.
तूळ – अज्ञात भिती जाणवेल
आज तुम्हाला एखादी अज्ञात भिती जाणवणार आहे. मित्रांसोबत फोन अथवा व्हिडिओ कॉलने संवाद साधा. प्रवासाला जाणे सध्या टाळा. रचनात्मक कार्यातून तुमच्या कलेला वाव मिळेल.
वृश्चिक – विवाहातील अडचणी दूर होतील
आज तुमची एखाद्या भावनिक व्यक्तीशी ओळख होणार आहे. विवाहातील अडचणी दूर होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. घरातून बाहेर पडू नका. आर्थिक स्थिती चांगली असेल.
धनु – पर्यटन व्यवसायावर प्रभाव पडेल
आज तुमच्या पर्यटन व्यवसायावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. घरात संगीत आणि मनोरंजन कार्यक्रमात वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना कमजोर विषयाच्या अभ्यासावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
मकर – संपत्तीत वाढ होण्याची शक्यता
आज तुमच्या सांपत्तिक स्थितीत सुधारणा होणार आहे. राजकारणातील ईच्छा पूर्ण होऊ शकतात. एखादे काम पूर्ण झाल्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रिय व्यक्तीशी भेट होईल.
हे ही वाचा –
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी.
अधिक वाचा –
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje