भविष्य

18 ऑगस्ट 2019 ;चं राशीफळ, तूळ राशीच्या लोकांना मिळणार करिअरची नवी संधी

Rama Shukla  |  Aug 16, 2019
18 ऑगस्ट 2019 ;चं राशीफळ, तूळ राशीच्या लोकांना मिळणार करिअरची नवी संधी

मेष – नवीन प्रेम संबंध सुरू होतील

आज तुमच्या आयुष्यात नवीन प्रेमसंबंधांना सुरूवात होऊ शकते. सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. व्यवसायात नवीन ओळखी वाढवताना सावध रहा. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावं लागेल.

कुंभ – पोटाच्या समस्या होण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला पोटाबाबत समस्या होऊ शकतात. जोडीदाराला नोकरीधंद्यात मानसन्मान मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. 

मीन – मौल्यवान भेटवस्तू मिळतील

आज तुम्हाला मौल्यवान भेटवस्तू मिळू शकतात. सासरच्या मंडळींकडून भेट मिळेल. रखडलेले पैसे परत मिळतील. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल.

वृषभ – अभ्यासात मन रमणार नाही

आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. विरोधकांपासून सावध रहा. एखादी छोटीशी चूक व्यवसायामध्ये समस्या निर्माण करू शकते. कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होऊ शकतात. 

मिथुन – संपत्ती मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला एखाद्या वृद्ध महिलेकडून धनसंपत्ती मिळू शकते. व्यवसायात फायदा होईल. नोकरीत उत्पन्न वाढणार आहे. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. घरातत एखादी महागडी वस्तू खरेदी कराल.

कर्क – कामाच्या ठिकाणी समस्या येतील

आज तुम्हाला व्यवसायासाठी एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. विनाकारण दगदग करू नका. कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे.

सिंह – मानसिक तणाव वाढू शकतो

आज विनाकारण तुम्हाला दगदग करावी लागेल. छोटी-मोठी आरोग्य समस्या डोकं वर काढू शकते. आरोग्याकडे लक्ष द्या. आईवडीलांची भावनिक साथ मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळेल.

कन्या – प्रेमसंबंध मजबूत होतील

आज एखादी नवीन गोष्ट तुमच्या प्रेमसंबंधांना मजबूत करण्यासाठी कारणीभूत ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवा. व्यावसायिक भागिदारीतून फायदा होईल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. जुना वाद मिटवून पुढे जाल.

तूळ – नवीन संधी मिळेल

आज तरूणांना नवीन संधी मिळणार आहे. नोकरी, व्यवसायाची नवीन सुरूवात करण्यासाठी चांगला काळ आहे. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात मन रमवा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आईची तब्येत खराब होऊ शकते. 

वृश्चिक – गुंतवणूक करणे आज टाळा

आज कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्च वाढणार आहे. राजकारणात मानसन्मान मिळू शकतो. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराचे आरोग्य बिघडण्याची  शक्यता आहे. 

धनु – मन आनंदी असेल

आज तुम्हाला उत्साही आणि आनंदी वाटणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी अधिकारी कौतूक करतील. व्यावसायिक योजना सफळ होणार आहेत. जोडीदारासोबत कार्यक्रमात सहभागी व्हाल.

मकर- वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे

आज तुमचे तुमच्या वडीलांसोबत वाद होऊ शकतात. राग आणि भावनांवर नियंत्रण ठेवा. विनाकारण भांडण करू नका. कामाच्या  ठिकाणी विरोधकांपासून सावध रहा. व्यावसायिक भागिदारीमुळे तणाव वाढणार आहे.

अधिक वाचा

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

 

Read More From भविष्य