भविष्य

19 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या तरूणांना मिळेल प्रेमात यश

Rama Shukla  |  Sep 16, 2019
19 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या तरूणांना मिळेल प्रेमात यश

मेष – मन निराश होईल

आज तुमचे मन थोडेसे निराश आणि अशांत असेल. एकांतात वेळ घालवा. आईवडीलांची भावनिक साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. रचनात्मक कार्यात सहभागी व्हा. देणे घेणी सांभाळून करा.

कुंभ – नवीन संपत्ती खरेदी करण्याची शक्यता

आज तुम्ही एखादी नवीन संपत्ती खरेदी करणार आहात. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्यामुळे आनंदी व्हाल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने उत्पन्नात वाढ होणार आहे. आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. 

मीन – नोकरीसाठी विनाकारण दगदग करावी लागेल

आज तुम्हाला नोकरीसाठी विनाकारण दगदग करावी लागेल. कामाच्या ठिकाणी घाईघाईत काम करण्याचा प्रयत्न करू नका. वाहन चालवताना सावध राहा. रखडलेले पैसे परत मिळणार आहेत. सामाजिक मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. 

वृषभ – प्रेमात यश मिळेल

आज तरूणांना प्रेमात यश मिळणार आहे. भावंडांमधील मतभेद कमी होतील. जुन्या लोकांची भेट होण्याची शक्यता आहे. नवीन कामातून पद,प्रतिष्ठा आणि धनसंपत्तीत वाढ होईल. मुलांकडून एखादी आनंदवार्ता कानी पडेल.

मिथुन – नवीन व्यवसायाची सुरूवात कराल

आज तुमच्या जीवनात भाग्योदयाचा योग आहे. नोकरी अथवा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. एखाद्या नव्या व्यवसायाला सुरूवात कराल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवास करताना सावध राहा. 

कर्क – खाजगी खर्च वाढण्याची शक्यता  

आज तुमचा खाजगी खर्च वाढण्याची शक्यता आहे. विनाकारण केलेल्या खर्चामुळे आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे. व्यवसायात खूप मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 

सिंह – घरात उत्साहाचे वातावरण असेल

आज जोडीदारामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल. घरात उत्साहाचे आनंदाचे वातावरण असेल. व्यावसायिक भागिदारीतून लाभ मिळेल. घरातील बदलांचा सुखद योग अनुभवाल. विद्यार्थ्यांना खेळात यश मिळेल. 

कन्या – इतर व्यक्तीला तुमच्या जीवनात दखल देऊ नका

आज एखादी बाहेरील व्यक्ती तुमच्या जीवनात दखल देऊ शकते. मुलांकडून निराशाजनक बातमी मिळेल. अप्रिय व्यक्तीकडून मानसिक कष्ट जाणवतील. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 

तूळ –  आरोग्याची काळजी घ्या

आज तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मन निराश होईल. व्यवसायात कठीण समस्यांचा सामना करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना चांगला परिणाम जाणवेल. वाहन खरेदीची योजना आखाल.

वृश्चिक – अचानक धनलाभ होण्याची शक्यता

आज अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. नोकरी अथवा व्यवसायात चांगली संधी मिळेल. आत्मविश्वासात वाढ होणार आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. विरोधक तुमच्या बाजूने असतील. सुख-साधनांमध्ये वाढ होईल.

धनु – भावंडामध्ये मतभेद होतील

आज तुम्ही एखाद्या आदर्श व्यक्तीसोबत तुमच्या मनातील भावना शेअर कराल. भावंडांसोबत मतभेद होतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची चांगले संबंध निर्माण होतील. व्यावसायिक भागिदारी फायदेशीर ठरेल. देणी-घेणी सांभाळून करा. 

 

मकर – व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता

आज तुम्ही नोकरीनिमित्त परदेशी पाठवणाऱ्या कंपन्यांच्या जाळ्यात अडकू नका. आर्थिक नुकसान आणि वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येतील. वाहन चालवताना सावध राहा.

अधिक वाचा

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

Read More From भविष्य