भविष्य

22 एप्रिल 2020चं राशीफळ, कन्या राशीच्या लोकांना धनलाभाचा योग

Rama Shukla  |  Apr 20, 2020
22 एप्रिल 2020चं राशीफळ, कन्या राशीच्या लोकांना धनलाभाचा योग

मेष – अडचणी दूर होतील

आज तुमच्या विवाहातील अडचणी दूर होतील. आईवडीलांचे सहकार्य मिळेल. घरातील वृद्ध आणि मुलांची काळजी घ्या. आर्थिक स्थिती मजबूत असेल. वाहन चालवताना सावध राहा. 

 

कुंभ – दुर्लक्षणामुळे एखादी चांगली संधी गमवाल

आज कामाच्या ठिकाणी आळस करणे टाळा. मेहनत जास्त आणि लाभ कमी मिळण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत फोनवरून संपर्क साधाल. नियमांचे उल्लघंन करणे त्रासदायक ठरू शकते. 

 

मीन- अज्ञात भिती जाणवणार आहे

आज एखाद्या अज्ञात भितीमुळे निरूत्साही वाटेल. विद्यार्थ्यांसोबत रचनात्मक कार्यातील रस वाढवा. जुन्या गोष्टी सुधारण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आवश्यक खरेदी करावी लागेल. 

 

वृषभ – ऑनलाईन कामांची संधी मिळेल

आज ऑफिससाठी ऑनलाईन काम करण्याची संधी मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. अधिकाऱ्यांची साथ मिळेल. रचनात्मक कार्यात रस वाढेल. 

 

मिथुन – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता 

आज घाईत एखादा चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मन निराश होणार आहे. कामाच्या ठिकाणात बदल होतील. जुन्या समस्यांचे समाधान होईल. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. 

 

कर्क – आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्हाला जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील वातावरण आनंदाचे असेल. विरोधक नमणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत असेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. प्रवासाला जाणे सध्या टाळा. 

 

सिंह – नात्यातील तणाव वाढण्याची शक्यता

आज रागावर नियंत्रण ठेवा. नात्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. मन आणि शरीरावर याचा परिणाम जाणवेल. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. 

 

कन्या – धनप्राप्तीचा योग

आज तुम्हाला धनलाभाचा योग आहे. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. घरातील कामे करावी लागणार आहेत. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. बिघडलेली कामे पुन्हा दुरूस्त करा. 

 

तूळ – कंबरेचे दुखणे जाणवणार आहे

आज तुम्हाला कंबरेचे दुखणे जाणवणार आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. व्हिडिओ अथवा फोन कॉलच्या मदतीने अधिकाऱ्यांसोबत नवीन योजना आखाल. मित्रांकडून आनंदाची बातमी मिळेल. 

 

वृश्चिक – जुन्या नात्यातील तणाव दूर 

जुन्या नात्यात आलेला तणाव आज दूर होईल. कौटुंबिक जबाबदारी वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी बदल होतील. कुटुंबासोबत मौजमस्ती करण्यासाठी योग्य काळ आहे. 

 

धनु – व्यवसायात समस्या निर्माण होतील

व्यवसायात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.  प्रवासाला जाणे टाळा. कौटुंबिक नात्यातील गोडवा वाढणार आहे. घरात राहून इनडोअर गेम्स खेळाल. मित्रांना भेटणे शक्य नाही. 

 

मकर – एखादे मोठे काम मिळेल

आज व्यवसायात एखादे मोठे काम मिळण्याची शक्यता आहे. घरातील साफसफाई आणि सजावटीत व्यस्त राहाल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. कुटुंबाच्या मदतीमुळे रचनात्मक कार्यात व्यस्त राहाल. 

 

हे ही वाचा –

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुम्ही ‘या’ राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

Read More From भविष्य