भविष्य

29 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, धनु राशीला वारसाहक्क मिळण्याची शक्यता

Rama Shukla  |  Sep 25, 2019
29 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, धनु राशीला वारसाहक्क मिळण्याची शक्यता

मेष – विद्यार्थ्यांच्या समस्या सुटतील

आज विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत असलेल्या समस्या सुटतील. मुलांना क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात वाद होण्याची शक्यता आहे.  

कुंभ – घरातील वृद्धाचे आरोग्य बिघडेल

आज घरातीस वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. कंबर अथवा गुडघेदुखी जाणवणार आहे. व्यवसायात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खुश होतील. 

मीन – मैत्री प्रेमात बदलण्याची शक्यता आहे

आज तुमची मैत्री प्रेमात बदलू शकते. एखाद्या सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. देणी घेणी सांभाळून करा. युवकांना खेळात करिअर करण्याची संधी मिळेल. 

वृषभ – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

आयात निर्यातीच्या व्यवसायात समस्या येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. प्रवासाचा योग आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. मित्रांशी भेट होण्याची गरज आहे. 

मिथुन – जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी चांगली बातमी मिळेल

जोडीदाराच्या आरोग्याबाबत चांगली बातमी मिळेल. एखादी गोष्ट करून दाखवण्याचा उत्साह वाटेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तरूणांना खेळात यश मिळेल. विवाहाचे योग आहेत. 

कर्क –  कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता

कौटुंबिक संपत्तीबाबत वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात सावध राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मुलांबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. 

सिंह – आरोग्याबाबत समस्या येण्याची शक्यता 

आरोग्याबाबत छोट्या-मोठ्या समस्या येण्याची शक्यता आहे. अंधविश्वास ठेवू नका. देणी घेणी करताना सावध राहा. सामाजिक समारंभात नातेवाईतकांची भेट होईल. वादविवादापासून दूर राहा. 

कन्या – आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता

आज तुमचे आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता आहे. धनसंपत्ती मिळेल. परदेशी जाण्याची संधी मिळेल. राजकारणातील व्यस्तता वाढणार आहे. व्यवसायात करणाऱ्या लोकांना लाभ मिळेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेठी होतील. 

तूळ – जोडीदाराची संबंध चांगले होतील

आज तुमच्यासाठी दिवस रोमॅंटिक आहे. जोडीदारासोबत नाते दृढ होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्या. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. व्यवसायात लाभाची संधी मिळेल. तरूणांना खेळात प्राविण्य मिळेल. 

वृश्चिक – कामाच्या ठिकाणी वाद होतील

आज तुमचे कामाच्या ठिकाणी वाद होणार आहेत. तरूणांना करिअरची संधी मिळेल. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. अचानक एखाद्या प्रवासाला जाण्याची संधी मिळेल. 

धनु – कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला आईकडून वारसाहक्काने संपत्ती मिळेल.व्यवसायात वाढ होण्याचा योग आहे. स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीत यश मिळेल. 

मकर – विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही

आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भटकणार आहे. कामाच्या ठिकाणी आव्हानात्मक वातावरण निर्माण होईल. लहान गोष्टींवरून झालेला वाद चिघळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील कामे रद्द होऊ शकतात. धार्मिक कार्यात रस वाढवा. 

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

 

Read More From भविष्य