मेष – विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये
विद्यार्थ्यांनी अभ्यास टाकून सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नये. एखाद्या वादात अडकण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्याबाबत सावध रहा. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे साधन वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. देणी घेणी सांभाळून करा.
कुंभ – कामात अडथळे येतील
आज तुम्ही एखाद्या नव्या कामाला सुरूवात कराल. मात्र कामात अनेक अडचणी येतील. मनासारखी नोकरी मिळण्यासाठी धावपळ करावी लागेल. जोडीदाराची साथ मिळेल. दुसऱ्यांच्या मदतीने चांगली संधी मिळेल. कोर्ट कचेरीतून सुटका होईल.
मीन – अप्रत्यक्ष धनलाभ होऊ शकतो
अप्रत्यक्ष धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने भेटवस्तू मिळेल. एखाद्या कामात थोडाफार बदल करावा लागेल. व्यवसायात नवीन योजना आखाल. परदेशी प्रवास करण्याचा योग आहे.
वृषभ – वेदना जाणवतील
कान आणि गळ्याच्या दुखण्यामुळे त्रस्त व्हाल. जोखिमेचे काम करू नका. रखडलेली कामे मित्रांच्या मदतीमुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवे साधन निर्माण कराल. घरात मंगलकार्य होण्याची शक्यता आहे. देणी घेणी सांभाळून करा.
मिथुन – एखादी जुनी मैत्री प्रेमात बदलेल
एखादी मैत्री प्रेमसंबंधात बदलण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत नातेसंबंध मजबूत होईल. व्यवसायात नवीन भागिदाराची ओळख होईल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे काम मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील.
कर्क – व्यावसायिक क्षेत्रात नवी संधी मिळेल
व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळेल. ज्यामुळे तुम्हाला यश आणि मानसन्मान मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि संपत्तीत वाढ होईल. विरोधकांनी सावध राहण्याची गरज आहे.
सिंह – व्यवसायात चढउतार येतील
आज तुम्हाला आरोग्य अथवा औषधांवर पैसे खर्च करावे लागतील. व्यवसायात चढउतार येऊ शकतात. मित्रांची मदत मिळाल्याने योजना सफळ होतील. राजकारणात फायदा मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
कन्या – आरोग्य चांगले राहील
शारीरिक आणि मानसिक चांगले असेल. व्यवसायात तुम्हाला चांगला फायदा होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण कराल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
तूळ – भावंडांसोबत तणाव वाढेल
आज कौटुंबिक संपत्तीवरून भावंडांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. सामाजिक स्तरावर समस्या येतील. टीकांपासून दूर रहा. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायासाठी केलेला प्रवास सुखकर होईल.
वृश्चिक – आईची तब्येत सांभाळा
आज तुमच्या आईला भुक न लागण्याची आणि झोप न येण्याचा त्रास होईल. कामाच्या ठिकाणी काम वाढण्याची शक्यता आहे. काही तरी नवीन करण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. वाहन चालवताना सावध रहा.
धनु – प्रॉपर्टीची योग्य किंमत मिळेल
आज तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीची योग्य किंमत मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत चांगले यश मिळेल. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल.
मकर – गैरसमज दूर होतील
आज तुमच्या जवळच्या नात्यात गैरसमज होण्याची शक्यता आहे. एखाद्याबाबतचे तुमचे मत आज बदल होणार आहे. प्रवासामुळे खर्च वाढणार आहे. व्यावसायिक भागिदारीमुळे फायदा होईल. जोडीदाराकडून प्रेम आणि चांगली साथ मिळेल.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje