मेष – आत्मविश्वास कमी होईल
माणसाचं आयुष्य अनेक उतार -चढावांनी भरलेलं असतं. ग्रहांच्या भ्रमणामुळे हे घडून येत असतं. परिणामी अनेक चांगल्या – वाईट घटनांना माणसाला सामोरं जावं लागत असतं. हे सत्य स्विकारण्याचा आजचा आपला दिवस आहे. आज कोणत्यातरी घटनेने आपला आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. जेष्ठ नागरीकांनी आपल्या प्रकृतीला जपायला हवं. आज एखादा किरकोळ आजार अथवा तापाची शक्यता आहे. सरकारी कर्मचा-यांनी आज थोडं सावध राहायला हवं. कोणताही निर्णय घेताना तो विचारपूर्वक घ्यायला हवा. प्रेमी मंडळींसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज प्रेयसी भेटण्याची शक्यता आहे.
कुंभ – ओळखीतून संधी निर्माण होतील
कधी कधी एखाद्याला आपण पहिल्यांदाच भेटतो मात्र ती पहिलीच भेट आपल्याला नवीन संधी देऊन जाते. तिचा योग्य उपयोग करुन घेतल्यास आपल्याला नवीन दिशा सापडू शकते. आज याचा अनुभव आपल्यास मिळू शकतो. आज आपल्या नवीन ओळखी होणार आहेत. त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा. कदाचित भविष्यात त्या तुम्हाला उपयोगी पडतील. नोकरी व व्यवसायात संधीचे योग आहेत. आज जर तुम्ही प्रवास करीत असाल तर तिथेही संधीही निर्माण होऊ शकतात. म्हणून सतर्क राहा. संधी हातून निसटून जायला नको. स्त्रियांना मात्र आज मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यामुळे विचलित न होता, स्वत:ला प्रेरणा देत राहा.
मीन – लक्ष विचलीत होईल
एखाद्याबद्दल मनात गैरसमज होणे ही खूप वाईट गोष्ट आहे. कारण त्यामुळे संबंधात दुरावा निर्माण तर होतोच शिवाय आपले लक्षही विचलित होऊ शकते. आज याचा तुम्हाला अनुभव घ्यायचा नसेल तर सावध राहा. शक्यतोवर एखाद्याविषयी आपले काही मत बनविण्याआधी खूप विचार करा. कारण त्यामुळे गैरसमजही होऊ शकतात. अशाच कारणांमुळे आज सरकारी कर्मचारी गोंधळात पडू शकतात. मात्र असे असले तरी अधिकाऱ्यांकडून आपले जर एखादे काम अडकून पडले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. ते पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्न करायला हरकत नाही.
वृषभ – उत्साह वाढीस लागेल
माणसाच्या अंगी सहनशीलता असणं खूप महत्त्वाचे असतं. कधी कधी ही सहनशीलताच आपलं एखादं काम करण्याचा उत्साह वाढवित असते. हेच अनुभविण्याचा आजचा आपला दिवस आहे. आज अमर्याद सहनशीलता दाखविल्याने आपला कामातील उत्साह वाढणार आहे. जोडीदारासह प्रवासाचेही योग आहे. घरात उत्साहाचे वातावरण राहिल. मात्र मुलं तुमच्या आवडीनूसार आज वागणार नाहीत. त्यांना जे हवं तेच आज करणार आहेत. भुतकाळात घडून गेलेल्या आनंददायी घटना आज पुन्हा नव्याने तुम्हाला आनंद देणार आहेत. त्यामुळे उत्साहाचे रुपांतर आनंदामध्येही होऊ शकते.
मिथुन – आज सावध राहण्याची गरज आहे
संयम बाळगून सर्तक आाणि सावध राहणे हा गुण सध्याच्या काळात प्रत्येक माणसाकडे असणं आवश्यक आहे. कारण आजच्या काळात बेफिकर राहून चालणार नाही. हेच तुम्हाला शिकविणारा आजचा दिवस आहे. आज तुम्ही विशेषत: व्यापारी, व्यावसायिकांनी नफ्याकडे लक्ष ठेवणं गरजेचे आहे. व्यवहार करताना आपला नफा होणार आहे की नाही हे पडताळूनच तो पूर्ण करावा. आज सरकारी कर्मचारी थोडे गोंधळात पडतील. लक्ष विचलित होण्याचे योग आहेत. काही अनपेक्षित घटना आपल्याला गोंधळात पाडू शकतात. आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी, पुढे काय करायला हवे यासाठी आज तुम्ही एकांत शोधाल.
कर्क – प्रयत्नात कमतरता नको
कोणतंही यश हे सहजासहजी मिळत नाही. आयुष्यात सदैव प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागते. एखादं महत्त्वपूर्ण काम अडकून पडलेल असेल आणि अशावेळी प्रयत्न केले नाही तर नंतर पश्चाताप होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर आपली ही परिस्थिती असेल तर प्रयत्नांमध्ये कमी पडू नका. आज तुमचं अडकून पडलेलं महत्त्वपूर्ण काम पूर्ण होऊ शकतं. त्यात ते काम जर एखाद्या अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले असेल तर १०० टक्के प्रयत्न करा. आज ते काम नक्कीच पूर्ण होईल. व्यापार, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सुखद ठरेल. थोडक्यात आज सहजासहजी काहीच मिळत नाही म्हणून प्रयत्न करायला विसरु नका.
सिंह – निर्णय विचारपूर्वक घ्या
वास्तविक बघता आयुष्यात कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घेतला गेला पाहिजे. मात्र कधी कधी अती आत्मविश्वास आणि बेफिकर राहिल्यामुळे आपण न विचार करता निर्णय घेऊन बसतो आणि नंतर मग पश्चाताप करीत बसतो. कधी कधी तर या चुकीच्या निणर्याचे भयंकर परिणामही सहन करावे लागतात. आज आपण कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतला पाहिजे. विशेष सरकारी कर्मचा-यांनी आज हे पथ्य पाळलेच पाहिजे. आज आपण जर प्रवास करीत असाल तर सावधान रहा.आज प्रवासात नुकसान होण्याचे योग आहेत. त्यामुळे आज शक्यतोवर प्रवास टाळा. प्रवास करणे आवश्यकच असेल तर सावध राहा. सोबतच उत्पन्न व खर्च यांच्यात नियंत्रण ठेवा. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त व्हायला नको. आजचा दिवस आपल्यासाठी कार्यात व्यस्त राहण्याचा आहे.
कन्या- आज सुखद दिवस असेल
सुखामागुन दु:ख आणि दु:ख येतं हे जरी खरं असलं तरी प्रत्येक दिवशी काही तरी चांगलं घडेल किंवा वाईटच घडेल अशी आपण आयुष्याकडून अपेक्षा करु शकत नाही. काही दिवस तटस्थ अनुभव देणारेही असतात. त्यापैकीच आजचा दिवस आहे. विशेषत: व्यापारी व व्यावसायिकांना हा फरक जाणवून येईल. आजच्या दिवशी विशेष नफा होणार नसला तरी तोटाही होणार नाही. मात्र आजचा दिवस आपल्याला सुखद नक्कीच आहे. व्यावसायिकांसाठी तर तोटा नाही यापेक्षा वेगळं सुख आणखी काय असणार. विद्यार्थ्यांनी आज संपूर्ण लक्ष अभ्यासात द्यायला हवं. अपचनाचा त्रास संभवू शकतो. लेखकांना आपल्या लेखनकार्यात यश मिळू शकते त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करायला हरकत नाही.
तुळ- आत्मिक समाधान लाभेल
बऱ्याचदा जीवनात अशा काही घटना घडतात ज्यामुळे परमेश्वराची आपल्यावर कृपा असल्याचा साक्षात्कार होत असतो. सकारात्मक भाव वाढीस लागून आत्मविश्वास वाढतो व आत्मिक समाधान लाभत असते. याची प्रचिती आज आपल्याला मिळण्याचे योग आहे. आज ईश्वराची कृपादृष्टी तुमच्यावर असल्याची भावना मनात दाटेल. त्यामुळे परमेश्वरावरील विश्वास अधिक दृढ होऊन आत्मिक समाधान तुम्हाला लाभेल. सोबतच भुतकाळात घडून गेलेल्या आनंददायी घटना पुन्हा आनंद देऊ शकतात. ओळखीच्या व्यक्तीबरोबर सामंजस्य पुन्हा वाढेल. काही गैरसमज असतील तर ते दूर होऊ शकतात. अपचनाचा त्रास संभवू शकतो. त्यामुळे आहाराकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
वृश्चिक – चिकाटी कायम ठेवा
अपयश मिळणं ही एक संधी असते आपल्या कार्याला सुधरविण्याची. कार्यात अनंत अडचणी येत असतील तरी चिकाटीने कार्यरत राहायला हवे. आपल्यासोबत जर असेच होत असेल तर हार मानू नका. कारण आज आपण चिकाटीने काम करायला हवे. यश मिळेल की अपयश याचा विचार आज करुच नका. प्रयत्नपूर्वक अपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहा. केलेले प्रयत्न व परिश्रम हे कधीच वाया जात नाहीत. हे सत्य जर आपण स्विकारलेले असेल तर आजचा आपला दिवस कार्यात व्यस्त राहण्यात जाईल. अनोळखी लोकांचा विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रयत्न करणेच आपल्या हिताचे राहिल. हाती घेतलेले काम पूर्ण करण्यावर भर द्या. व्यायामाच्या वेळा चुकवू नका.
धनु – सामंज्यस वाढविणे गरजेचे
जीवन जगत असताना आपली स्वत:ची मूल्ये, तत्त्वे असायलाच हवीत. मात्र सध्याच्या काळामध्ये फक्त त्यांनाच कुरवाळत बसणं योग्य नाही. मोडेनपण वाकणार नाही हे तत्त्व आजच्या काळात तरी चालणार नाही. त्यात जर जवळच्या व्यक्तींशी जमवून घ्यायचे असेल तर नमतं घ्यायला हवे. आज ओळखीच्या लोकांबरोबर सामंजस्य वाढविण्यासाठी चांगले योग आहेत. त्यात तुम्हाला यश मिळणार असून त्यात फायदाही आहे. एखादं महत्त्वपूर्ण काम अडकून पडलेलं असेल तर आज प्रयत्न वाढवायला हरकत नाही. कदाचित ते पूर्णही होऊ शकतं. मात्र कामात अडचणींची शक्यताही आहे. त्यामुळे हतबल होऊ नका. प्रयत्न करीत राहा. मुलं आज तुमच्या आवडीनूसार वागणार नाहीत.
मकर – संधीचा लाभ घ्या
जीवनात संधी मिळत असतात. त्यांचा आपल्याला पूर्ण लाभ घेता आला पाहिजे. तेव्हाच यशाकडे आपली वाटचाल सुखद होऊ शकते. मात्र संधी वेळीच ओळखताही यायला हव्यात. नाहीतर ही चांगली संधी होती असं म्हणण्याची वेळ येते. आज नोकरी व व्यवसायात संधी मिळण्याचे योग आहेत. तिचा सदुपयोग करुन घ्या. आज लाभणारी संधी ओखळता आली तर तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. मात्र असे असले तरी काम सहजासहजी पूर्ण होणार नाही. त्याला जास्त वेळही लागू शकतो. आज मानसिक व शारीरिक दृष्ट्याही तुम्हाला उत्साह जाणवेल.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje