मेष : प्रेम संबंध संपुष्टात येण्याची शक्यता
प्रेम संबंध संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. सामाजिक स्तरावर एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. वादांपासून दूर राहा. राजकारणात आवड वाढू शकते. आरोग्याप्रति सतर्क राहा.
कुंभ : कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते
देखावा करण्याच्या नादात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. वाहनाच्या देखभालीमुळे खर्च वाढू शकतो. उत्पन्न-खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक सहकार्य मिळेल. रचनात्मक कामांमध्ये वाढ होईल.
मीन : जुन्या आजारातून सुटका होईल
आज मन शांत आणि आनंदीत राहील. जुन्या आजारातून सुटका मिळू शकते. सामाजिक सन्मानात वाढ होईल. नव्या लोकांसोबत भेटगाठी होतील, ज्या भविष्यात व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकतात.
वृषभ : अडकलेला पैसा मिळण्याचा योग
आज अडकलेला पैसा मिळण्याचा योग आहे. जंगम-स्थावर संपत्ती खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. पैसा गुंतवण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळू शकते. मित्रांसोबत भेट होण्याची शक्यता आहे.
(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)
मिथुन : शारीरिक थकवा आणि अशक्तपणा राहील
आज निरर्थक धावपळीमुळे शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी काम करताना अडचणी येतील. राजकारणातील आवड वाढू शकते. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
कर्क : वृद्धांच्या मदतीमुळे प्रकरण मार्गी लागतील
एखाद्याप्रति प्रेमाची भावना निर्माण होईल. वृद्धांच्या मदतीनं व्यावसायिक अडचणी दूर होतील. जुन्या मित्रांची भेट फायदेशीर राहील. रागावर नियंत्रण ठेवा. छोटे-मोठे आजार होण्याची शक्यता आहे.
सिंह : निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमावण्याची शक्यता
आळस किंवा निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमावण्याची शक्यता आहे. वरिष्ठांसोबत मतभेद वाढू शकतात. पदोन्नतीमध्ये अडचणी येऊ शकतात. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. धार्मिक कामांमध्ये आवड वाढेल. आरोग्य खराब होऊ शकते.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)
कन्या : व्यवसायात धन लाभाची शक्यता
भावाच्या सहकार्यामुळे व्यवसायात धन लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. एखाद्या प्रति आकर्षण वाढू शकते. भावनात्मक स्तरावर भक्कम असाल. विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगली असेल. आवश्यक असलेली कामे आधी पूर्ण करा.
तूळ : कार्यालयात निरर्थक गुंतागुंत असेल
व्यवसायात कष्ट अधिक पण लाभ कमी मिळतील. कामाच्या ठिकाणी निरर्थक गुंतागुंत निर्माण होईल. वैवाहिक क्षेत्रात होणाऱ्या प्रयत्नांना यश मिळू शकते. वादग्रस्त प्रकरणे संवादामुळे सुटतील. आजारातून सुटका मिळेल.
वृश्चिक : आरोग्यात जलदगतीनं सुधारणा होईल
दीर्घ काळापासून सुरू असलेल्या लोकांच्या आजारात जलद गतीनं सुधारणा होईल. चांगल्या घराचा शोध निश्चित बजेटमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामांमध्ये यश मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. वादविवादांपासून दूर राहा.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)
धनु : नव्या प्रेम संबंधांची सुरुवात होईल
प्रेम प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध भक्कम होतील. आज प्रभावशाली व्यक्तीसोबत भेट होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. धूर्त लोकांपासून सावध राहा.
मकर : कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता
आर्थिक दिशेनं केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. व्यवसायात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. रखडलेले काम संपन्न होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी करू शकता. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje