भविष्य

6 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, मिथुन राशीला अचानक धनलाभाचा योग

Rama Shukla  |  Aug 5, 2019
6 ऑगस्ट  2019 चं राशीफळ, मिथुन राशीला अचानक धनलाभाचा योग

मेष – एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल

आज तुम्ही तुमचं मन खुशाल मोकळं करू शकता. तुमच्या मनावरचं ओझं आज कमी होणार आहे. प्रवासात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होणार आहे. रचनात्मक कार्यातील गती वाढणार आहे. व्यावसायिक प्रवास लाभदायक ठरेल.

कुंभ – आईच्या तब्येतीची काळजी घ्या

आज तुमच्या आईची  तब्येत अचानक खराब होणार आहे. मन निराश आणि असमाधानी राहील. अंधविश्वास आणि अती आत्मविश्वासामुळे त्रास होऊ शकतो. रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे. उत्पन्नाची नवी साधने वाढतील. वाहन चालवताना सावध रहा.

मीन – सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू मिळतील

सासरच्या मंडळींकडून तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळेल. घरात मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. प्रेमात निराशा येऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी एखादी जास्तीची जबाबदारी मिळेल.

वृषभ – आळस करू नका

आळस केल्याने एखादे काम टाळले जाईल. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळेल. छोट्याशा कामासाठी तुम्हाला आज शिफारस करावी लागेल.

मिथुन – अचानक धनप्राप्ती होणार आहे

आज तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करणार आहे. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. व्यापार अथवा नोकरीत स्थिती अनुकूल असेल. एखादी वाईट बातमी मिळाल्याने मन दुःखी होऊ शकते. जोडीदारासोबत नातं मजबूत असेल.

कर्क – विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही

आज विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येईल. नकारात्मक विचारांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये समस्या येण्याची शक्यता आहे. व्यापाराबाबत निर्णय घेताना सावध रहा. कुटुंबातील नातेसंबंध दृढ होतील. परदेशी जाण्याचा योग आहे.

सिंह – दातांची समस्या जाणवेल

आज तुमच्या अथवा तुमच्या जोडीदाराला दातांची समस्या जाणवू शकते. कामाच्या ठिकाणी आज तुमचे कौतुक होणार आहे. जोडीदारासोबत तणाव वाढू शकतो. मुलांकडून आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

कन्या – व्यावसायिक भागिदारी मजबूत होईल

व्यावसायिक भागिदारी मजबूत होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व निर्माण होणार आहे. सामाजिक कार्यात सक्रियता वाढू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. देणी- घेणी करताना सावध रहा. 

तूळ – विद्यार्थ्यांचं उद्दीष्टं साध्य होईल

तुमच्यातील कौशल्य ओळखण्याचा प्रयत्न करा.  व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी खूश होतील. कोर्ट कचेरीतून सुटका होईल. आरोग्याची काळजी घ्या. रखडलेली कामे पूर्ण होतील. 

वृश्चिक – एखादी मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता

आज तुमची एखादी प्रिय वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याची घाई करू नका. आत्मविश्वास आणि मेहनतीमुळे ध्येय साध्य कराल. आध्यात्म आणि धार्मिक कार्याबाबत रस वाढणार आहे.

धनु – घरगुती उपचारांमुळे आरोग्य चांगले राहील

आज तुम्हाला घरगुती उपचारांमुळे बरं वाटणार आहे.कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. मित्र मदत करतील. प्रवास सुखकर होईल. देणी-घेणी करताना सावध रहा.

मकर- जोडीदाराची मदत न मिळाल्याने समस्या वाढतील

आज तुमच्या वागण्याचा इतरांना त्रास होणार आहे. जोडीदाराची मदत न मिळाल्याने तुमच्या समस्या वाढणार आहेत. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा योग आहे. कोर्ट कचेरीत सावध रहा.

 

अधिक वाचा

राशीनुसार निवडा तुमचे करिअर

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

Read More From भविष्य