भविष्य

9 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना प्रेमात मिळेल यश

Rama Shukla  |  Sep 6, 2019
9 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना प्रेमात मिळेल यश

मेष – जमिनीतून लाभ मिळेल

आज तुम्हाला जमिनीच्या व्यवहारात लाभ मिळेल. आत्मविश्वास कमी जाणवेल. एखाद्या खास मित्राची भेट होईल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. मानसिक शांतीचा अनुभव येईल. घरात सुख शांती येईल. 

कुंभ –  एखाद्या आकर्षक व्यक्तीशी भेट होऊ शकते

आज तुमची एखाद्या आकर्षक व्यक्तीची भेट होऊ शकते. जोडीदाराच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. भावंडांमधील कटूपणा कमी होईल. सामाजिक मानसन्मान आणि धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमवा.

 

मीन – शैक्षणिक अडचणी येण्याची शक्यता

आज  काही घरगूती गोष्टींमुळे तुमच्या शैक्षणिक जीवनात अडचणी येण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीत तुमचा पक्ष मजबूत राहील. प्रेम करणाऱ्या लोकांचे ध्येय साध्य होणार आहेय प्रवासाला जाण्याची संधी मिळेल. 

 

वृषभ – अभ्यासात अनियमितपणा येईल

आज विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अनियमितपणा येण्याची शक्यता आहे. रोजच्या कामात व्यस्त राहाणार आहात. एखादे महत्त्वाचे काम रखडण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. सध्या प्रवास करणे टाळा. राजकारणातील लोकांकडून मदत मिळेल. 

मिथुन – हातापायातून वेदना जाणवतील

आज तुम्हाला हात पाय दुखल्यामुळे वेदना जाणवतील. चिडचिड होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. व्यवसाय अथवा कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 

कर्क – प्रेमात यश मिळेल

आज तुम्हाला प्रेमात यश मिळणार आहे. नवीन ओळखींचे रूपांतर गाढ मैत्रीत होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. घरातील वृद्धांचा सल्ला फायदेशीर ठरेल. 

सिंह – रंग अथवा केमिकल व्यवस्यातील लोकांना लाभ

आज रंगकाम अथवा  केमिकल क्षेत्रातील लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. व्यवसायातील प्रतिष्ठा वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी एखादी योजना महत्त्वाची ठरणार आहे. व्यवसायात कामांमुळे मन आनंदी असेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.

कन्या – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

आज तुमचेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सावध राहा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कुटुंबातील लोकांची भावनिक आणि आर्थिक साथ मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे. देणी-घेणी सांभाळून करा.

 

तूळ – उत्साही आणि प्रफुल्लित वाटेल

आज तुम्हाला अतिशय उत्साही आणि आनंदी वाटणार आहे. काहीतरी करून दाखवण्याच्या प्रयत्नात व्यस्त राहाल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात. विद्यार्थ्यांना अभ्यासाची संधी मिळेल. विरोधक तुमच्या बाजूने येतील. कामाच्या ठिकाणी विशेष जबाबदारी मिळणार आहे. 

वृश्चिक – वडीलांसोबत वैचारिक मतभेद होतील

आज तुमचे तुमच्या वडीलांसोबत वैचारिक मतभेद होणार आहेत. कामाच्या ठिकाणी  अधिकाऱ्यांकडून तणाव वाढणार आहे. नात्यात देणी-घेणी करताना सावध रहा. तुमच्या बोलण्यामुळे आज गैरसमज वाढू शकतात. मित्रांची साथ मिळेल.

धनु – जोडीदाराचा डोकेदुखीचा त्रास वाढणार आहे

आज तुमच्या जोडीदाराला डोकेदुखीचा त्रास वाढू  शकतो. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बदल होतील. तुमच्या बोलण्यातून तुम्ही लोकांना आनंदी करणार आहात. आर्थिक स्थिती मजबूत असेल. 

मकर –  चल-अचल संपत्ती खरेदी कराल

आज तुम्ही एखादी चल अथवा अचल संपत्ती खरेदी करणार आहात. रचनात्मक कार्यातील प्रगती वाढणार आहे. मानसन्मान मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. प्रवासाला जाणे फायद्याचे ठरेल.

Read More From भविष्य