आरोग्य

गरोदरपणात तोंडाची चव का बदलते, जाणून घ्या कारण

Trupti Paradkar  |  Sep 1, 2020
गरोदरपणात तोंडाची चव का बदलते, जाणून घ्या कारण

गरोदरपणी  तोंडाची चव जाणे ही एक सामान्य समस्या आहे. म्हणजेच सर्वसामान्यपणे अनेक महिलांना या काळात हे लक्षण जाणवते. कधी कधी गरोदरपणामुळे काही महिलांना काहीही खाल्लं तरी ते कडू लागलं. ज्यामुळे या काळात तुम्हाला तुमचे आवडते पदार्थही खाणं नकोसं वाटू शकतं. वास्तविक गरोदरपणी पोषक आणि संतुलित आहार घेणं फार गरजेचं असतं. ज्यामुळे तुमच्या बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. मात्र या काळात तुमच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हॉर्मोनल बदल होत असतात. याचा परिणाम तुमच्या ज्ञानेद्रिंयावर होत असतो.

पहिल्या तिमाहीत म्हणजेच गर्भधारणा झाल्यावर पहिल्या तीन महिन्यांमध्ये ही समस्या प्रकर्षाने जाणवते. मॉर्निंग सिकनेस, मळमळ, उलटी यासोबतच तुमच्या तोंडाची चवही कमी होते. काही जणींना तर  या काळात एकतर वासच येत नाही अथवा कोणताही वास सहन होत नाही. गरोदरपणात तोंडाला मॅटेलिक, खारट, जळकट चव येण्याच्या समसम्येला वैद्यकीय भाषेमध्ये डिस्गेशिया ( Dysgeusia) असं म्हणतात.

गरोदरपणी तोंडाची चव सुधारण्यासाठी करा हे उपाय –

प्रेंगनन्सी मध्ये तुम्ही तुमच्या तोंडाची चव बदलण्यासाठी हे सोपे उपाय करू शकता.

तोंडाची स्वच्छता राखा –

तोंडाची चव बदलण्यासाठी तुम्ही नियमित तोंडाची योग्य स्वच्छता राखणं फार गरजेचं आहे. ज्यामुळे तोंडात किटाणू जमा होणार नाहीत. कारण तोंडाची चव बदलण्याचं हे ही एक महत्वाचं कारण असू शकतं. गरोदरपणाी येणारी मॅटेलिक टेस्ट बदलण्यासाठी हा उपाय जरूर करा.

Shutterstock

अॅपल सायडर व्हिनेगरने चुळ भरा –

अॅपल सायडर व्हिनेगर हे एकप्रकारचे उत्तम औषध आहे ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या कमी होतात. कारण यामध्ये अॅंटि बॅक्टेरिअल घटक असतात. यामुळे तुमचे जीवजंतूपासून संरक्षण मिळते. यासाठी तोंडाची चव बदलण्यासाठी कोमट पाण्यात दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि त्याने चुळ भरा. 

आंबट फळं खा –

प्रेगनन्सीमध्ये  जर तुम्हाला काही खावसं वाटत नसेल आणि तोंडाची  चव गेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय जरूर करा. आंबट फळ खाण्यामुळे तुमच्या तोंडाची चव बदलेल. आंबट फळांमध्ये  व्हिटॅमिन सी भरपूर असते. ज्यामुळे तुमच्या तोंडाचा कडवटपणा कमी होतो  आणि तोंडाला चव येते. तुम्ही या काळात लिंबू, संत्री आणि मोसंबी खाऊ शकता.

Shutterstock

भरपूर पाणी प्या –

गरोदरपणीच नव्हे तर इतरही काळात सर्वांनी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. कारण पाण्यामुळे शारीरिक क्रिया सुरळीत होतात. गरोदरपणात हॉर्मोनल बदलांमुळे तोंड कोरडे होते आणि तोंडाची चव बदलते. पण जर तुम्ही भरपूर पाणी प्या ज्यामुळे तुमच्या तोंडाची चव ठीक होईल. 

ठराविक वेळाने काहीतरी खा –

गरोदरपणात तोंडाची चव जाण्यामुळे पहिले काही महिने महिला खाण्याचे प्रमाण कमी करतात. मात्र असे केल्यामुळे बाळाचे पोषण होण्यास अडथळा येऊ शकतो. यासाठीच या काळात ठराविक काळानंतर थोडं थोडं खाणं गरजेचं आहे. जरी तुमची खाण्याची इच्छा नसली तरी वेळेनुसार प्रमाणात अन्नाचे सेवन करणे तुमच्यासाठी गरजेचं आहे. शिवाय यामुळे तुमच्या तोडांची चव पुन्हा नीट होऊ शकते. 

Shutterstock

पाचक आणि जलयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करा –

गरोदरपणी भुक लागली तरी तोंडाची चव बदलण्यामुळे तुम्हाला खाण्याची इच्छा होत नाही. शिवाय मळमळ आणि उलटीमुळे तुम्ही खाण्याचा कंटाळा करता.  मात्र  या काळात जर तुम्ही हेव्ही अन्नपदार्थ खाण्यापेक्षा जलयुक्त आहाराचे प्रमाण वाढवले तर तुमचे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल. यासाठीच फळांचे रस, पेज, सूप, नारळपाणी, लिंबू पाणी अशा पदार्थांचे प्रमाणआहारात वाढवा. ज्यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतील आणि जीभेची चव सुधारेल. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

अधिक वाचा –

गरोदर महिलांसाठी सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय

गरोदर राहण्यासाठी करण्यात येतोय मेन्स्ट्रूअल कपचा वापर

गरोदरपणातही करा ही सोपी योगासने

Read More From आरोग्य