Combination Skin

Beauty Tips : पार्लर बंद असताना चेहऱ्याची अशी घ्या काळजी

Aaditi Datar  |  Apr 2, 2020
Beauty Tips : पार्लर बंद असताना चेहऱ्याची अशी घ्या काळजी

कोरोनाच्या सावटाने संपूर्ण देशात सध्या गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे सगळेजण घरात राहूनच स्वतःची काळजी घेत आहेत. मग ते आपल्यासारखे असोत वा सेलिब्रिटी असो. या काळातही सगळेच फिट राहण्यासाठी वर्कआऊटपासून ते ब्युटी टिप्सपर्यंत सर्वच फॉलो करत आहेत. POPxoMarathi च्या या लेखात आम्ही तुम्हाला क्वारंटाइनमध्ये स्वतःच्या त्वचेची काळजी कशी घेता येईल याबाबत सांगणार आहोत.

Shutterstock

लॉकडाऊनच्या काळात मॉल, थिएटर्स, कपड्यांची दुकानं ते अगदी ब्युटीपार्लरपर्यंत सर्वच बंद आहे. पण या काळात तुमच्या त्वचेच्या काळजीसाठी तुमच्या मदतीला आहेत सोपे घरगुती उपाय. जर तुम्ही या काळात चेहऱ्यासाठी योग्य घटकांची निवड केली तर तुमची त्वचा क्वारंटाइनमध्येही अगदी छान आणि तुकतुकीत दिसेल. अशावेळी तुम्हाला फक्त गरज आहे ती स्कीन केअरसाठी थोडा वेळ देण्याची.

काही दिवसांआधी बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोणनेही तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती फेस रोलरच्या मदतीने तिच्या स्किनची काळजी घेताना दिसत होती. जर तुम्हीही कोरोना व्हायरसपासून बचावासाठी स्वतःला आयसोलेट केलं असेल तर घाबरू नका. खालील गोष्टी फॉलो करा.

वाचा – वर्क फ्रॉम होम होण्यासाठी टिप्स

निरोगी त्वचेसाठी ब्युटी टिप्स

त्वचेच्या काळजीसाठी फॉलो करा या टिप्स

Shutterstock

कोरड्या त्वचा असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक मॉइश्चराइजिंग फॅक्टरची निर्मिती होत नाही. त्यामुळे वारंवार चेहरा धुतल्यास तो कोरडा आणि निस्तेज दिसू शकतो. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी वारंवार चेहरा धुतल्यास जास्त तेल चेहऱ्यावर येऊ शकतं.

जर तुम्हाला घरी खूप गरम होत असेल आणि घाम येत असेल तर बर्फाचा तुकडा चेहऱ्यावर घाम कमी येईल. यामुळे तुमचा मेकअपही कोरडा होणार नाही.

Shutterstock

या काळात फेसवॉश, सनस्क्रीन आणि मॉईश्चराईजर तिन्ही स्टेप्स फॉलो करा. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार आठवड्यातून एक ते दोन वेळा एक्सफॉलिएशन करा.

मेकअप न करता सुंदर दिसण्यासाठी सोप्या टिप्स

मेकअप किटमधील concealer चा असा करतात उपयोग

Read More From Combination Skin