DIY लाईफ हॅक्स

बाथरुमची स्वच्छता आहे महत्वाची, असे ठेवा तुमचे बाथरुम स्वच्छ

Leenal Gawade  |  Apr 22, 2022
बाथरुमची स्वच्छता

 तुमचे घर हा तुमचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण घराची स्वच्छता कशी राखली जाते यावर ते अवलंबून असते. पण आता घरासोबतच तुमच्या घराचे बाथरुम कसे आहे हे देखील अगदी आवर्जून लोकं पाहतात. एखाद्याच्या बाथरुम किंवा टॉयलेटमधून अशक्य अशी दुर्गंधी किंवा घाण असेल तर लोक इतर घर न पाहता त्यावरुनच घराचा अंदाज लावतात.म्हणूनच तुमच्या घराच्या इंटेरिअरसोबत तुमचे बाथरुम चांगले असणे हे देखील तितकेच गरजेचे असते. घरातील बाथरुमची किंवा टॉयलेटची स्वच्छता कशी ठेवायची ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला करुया सुरुवात

पाण्याचा करा वापर

बाथरुममध्ये पाणी चांगले असेल तर तुम्ही आंघोळीनंतर स्वच्छ करण्यासाठी मॉबचा उपयोग करुन ते स्वच्छ पुसून घ्या. जर असे करणे शक्य नसेल तर पाणी टाकून बाथरुम झाडून घ्या. आंघोळीनंतर बाथरुममधी साबण पटकन जात नाही. ते तसेच ठेवले तर कालांतराने फ्लोरींग हे पांढरे पडू लागते. त्यावर डाग दिसू लागतात.  पाण्याचा वापर करुन तुम्ही बाथरुम झाडून घ्या.

कुबट वास येत असेल तर

बाथरुमची स्वच्छता

खूप जणांच्या बाथरुममध्ये गेल्या गेल्या खूप कुबट आणि कोंदट असा वास येतो. अशा बाथरुममध्ये गेल्यानंतर श्वासही घेवत नाही. अशा बाथरुम किंवा टॉयलेटमध्ये जाता येत नाही. असा वास तुमच्या बाथरुममध्ये येत असेल बाजारात मिळणारे सुगंधित असे द्रव्य फवारा. शिवाय बाजारात मिळणाऱ्या सुंगधित डब्यांचा वापर करता येतो. त्यामुळे काही काळासाठी हा वास येत राहतो. कुबट वास येत असेल तर तुम्ही हमखास हे वापरायलाच हवे. 

जाळी येऊ देऊ नका

खूप जणांच्या घरी बाथरुम आणि टॉयलेट हा दुर्लक्षित असा भाग असतो. त्याची स्वच्छ करणे कोणालाही आवडत नाही. अशांच्य बाथरुमची अवस्था पाहिली तर खूप जणांच्या बाथरुममध्ये जाळी आणि कोष्टक असतात. त्यापासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही दर दोन दिवसांनी बाथरुमचे कोपरे स्वच्छ ठेवा. म्हणजे तुमच्या बाथरुममध्ये गेल्यावर आनंदी वाटेल.

पॉट ठेवा स्वच्छ

सतत पॉट बदलणे हे शक्य नसते. बोअरिंगचे पाणी वापरल्यामुळे अनेकदा शौचालयाचे पॉट पिवळे पडते. त्याला डाग पडतात. त्यामुळे पॉट खराब दिसतो. अशा अस्वच्छ पॉटवर बसावे देखील वाटत नाही. तुम्हाला त्यातल्या त्यात तो स्वच्छ आणि नीट ठेवायचा असेल तर तुम्ही त्याचे क्लिन्झर योग्य पद्धतीने वापरा. म्हणजे त्याची स्वच्छता राहणे फार सोपे जाते. पॉट स्वच्छ ठेवायचा असेल तर वेगवेगळ्या लिक्विडचा उपयोग करायला अजिबात विसरु नका. त्यामुळे तुमच्या बाथरुमची स्वच्छता चांगली राहण्यास मदत मिळते. 

खूप जणाच्या बाथरुममध्येच टॉयलेटदेखील असते. त्यामुळे सगळ्या गोष्टीची स्वच्छता राखणे हे खूप महत्वाचे असते. त्याची स्वच्छता राखताना तुम्ही थोडासा वेळ काढा. त्यामुळे आपोआपच चांगली स्वच्छता राहण्यास मदत मिळेल. 

Read More From DIY लाईफ हॅक्स