वंध्यत्व ही एक सामान्य समस्या आहे जी मोठ्या संख्येने जोडप्यांमध्ये दिसून येते. अनेक जोडपी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) निवडून वंध्यत्वाचा उपचार घेतात. दुर्दैवाने, आयव्हीएफशी संबंधित अनेक गैरसमजूतींमुळे जोडप्यांना ते निवडण्यापासून दूर ठेवू शकते आणि पालकत्व स्वीकारण्याचे त्यांचे स्वप्न अपुर्ण राहू शकते.असुरक्षित संभोगाच्या एक वर्षानंतर (किंवा जास्त काळ) गर्भधारणा यशस्वीरित्या न झाल्यास त्यास वंधत्व असे म्हटले जाऊ शकते. गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांमध्ये ही एक सामान्य घटना आहे. स्त्रियांना अनेकदा मूल न झाल्याने दोष दिला जातो आणि यामुळे त्यांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना गर्भधारण करणे शक्य आहे तसेच इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) द्वारे मूल जन्माला घालणे शक्य आहे. तुम्हाला माहिती आहे का? आयव्हीएफ तुम्हाला गर्भधारणेचे स्वप्न पूर्ण करण्यात आणि पालकत्वाचा आनंद घेण्यास मदत करू शकते. याबाबत डॉ. निशा पानसरे, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुणे यांच्याशी आम्ही संवाद साधला.
अधिक वाचा – निरोगी संततीसाठी आयव्हीएफ प्रणाली उपयुक्त, तज्ज्ञांचे मत
वंध्यत्व आणि आयव्हीएफशी संबंधित गैरसमज कोणते ते जाणून घ्या:
आजही गर्भधारणा न होणे आणि तसेच मूल न झाल्यास महिलांना दोष दिला जातो. पुरुष आजही आयव्हीएफ क्लिनिकला भेट द्यायला संकोच करतात आणि त्यांना चाचणी करण्याची भीती वाटते. वंध्यत्वाकडे लज्जास्पद गोष्ट म्हणून पाहिले जाते. स्त्रियांना अपमानित केले जाते, त्यांना त्रास दिला जातो, टोमणे मारले जातात, उपहास केला जातो आणि वाईट वागणूक दिली जाते. यामुळे स्त्रिया निराश, चिडचिडे, तणावग्रस्त, चिंताग्रस्त, निराश होतात. स्त्रिया वंध्यत्वाचे निदान हे त्यांच्या कुटुंब, मित्रांपासून लपवतात याविषयावर उघडपणे बोलत नाहीत, उपचारांना विलंब करतात आणि यामुळे त्यांच्या भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मुल न झाल्याबद्दल त्यांना दोषी आणि लाजिरवाणे वाटते. नि: संतान असणे ही अजूनही समाजातील प्रमुख समस्या मानली जाते. अनेकांना असे वाटते की गर्भवती न होणे म्हणजे त्यांचे लैंगिक जीवन चांगले नाही. परंतु, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस), अवरोधित फॅलोपियन ट्यूब, एंडोमेट्रिओसिस किंवा मधुमेह यासारख्या वैद्यकीय समस्यांमुळे वंध्यत्वासारखी समस्या दिसून येते.
अधिक वाचा – मुलांना जन्म देण्यासाठी असणारी एग फ्रिजिंग (Egg Freezing) प्रक्रिया, इत्यंभूत माहिती
IVF बाबत सर्वात मोठा गैरसमज
आयव्हीएफच्या बाबतीतला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे त्यातून जन्मलेले मूल त्या पालकांचे नसते. वास्तविकता या अशा समजूतीला काहीच तथ्य नाही. आयव्हीएफ मध्ये, एका स्त्रीची अंडी आणि पुरुषाचे शुक्राणू एका विशेष प्रयोगशाळेत एकत्र करून एक भ्रूण तयार करतात आणि स्त्रीला गर्भधारणा करण्यास मदत करतात. त्यासाठी आपल्याला फक्त आयव्हीएफ म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते हे समजून घेणे आवश्यक आहे.
आयव्हीएफशी संबंधित दुसरा गैरसमज असा आहे की बाळाला आयुष्यभर आरोग्याच्या समस्या उद्भवतील. हे देखील अजिबात खरे नाही. आयव्हीएफ उपचारादरम्यान, जोडप्याला निरोगी जीवनशैली अंगीकारणे, त्यांच्या कोमॉर्बिडिटीजचे व्यवस्थापन करणे, संतुलित आहार घेणे, व्यायाम करणे आणि योग्य प्रकारे गर्भधारणा करणे यासाठी मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडून गर्भधारणेसाठी आयव्हीएफ उपचार न करण्याची चूक करू नका.
अधिक वाचा – कृत्रिम गर्भधारणेकरिता निवडायचे नक्की कोणते पर्याय, तज्ज्ञांचे मत
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक