केस लांब वाढवायची इच्छा असतानाही केसांना फाटे फुटू लागले की, केस कापण्याशिवाय काही इलाज नसतो. केसांची वाढ खुंटवणारे हे फाटे वेगवेगळ्या कारणांमुळे केसांना येतात. केसांना फाटे फुटू नये असे तुम्हाला वाटत असेल तर केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. आता केसांची काळजी घेणारे अनेक विषय आम्ही अनेक विषय आतापर्यंत लिहिले आहेत. पण केसांना फाटे फुटूच नये आणि केस लांब वाढावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही रोजच्या रोज केसांची योग्य काळजी घेऊ शकता. त्यामुळे केसांना फाटे फुटण्याची तुमची समस्या नक्कीच कमी होईल.
शॅम्पूच्या वापरानंतर तुमचेही गळतात का केस
शॅम्पूचा करा कमी वापर
काही जणांना अगदी रोजच्या रोज केस धुण्याची सवय असते. पण केसांच्या वाढीसाठी तुमची ही सवय घातक ठरु शकते. कारण कितीही चांगला शॅम्पू असला तरी त्याचा वापर तुम्ही रोज केला तर त्यामुळे केस कोरडे होण्याची शक्यता जास्त असते. केस कोरडे झाले की, ते तुटण्याची शक्यता जास्त असते. केस गळतीसोबतच केसांच्या टोकांना सतत कोरडेपणा जाणवत असेल तर अशा केसांना फाटे लगेच फुटतात. केसांना आठवड्यातून दोन वेळात शॅम्पी करा. योग्य पद्धतीने केस विंचरा आणि त्याची व्यवस्थित काळजी घ्या.
केस विंचरताना करु नका घाई
खूप जणांना केस विंचरण्याचा कंटाळा असतो. केस लांब असले की, केस विंचरणे थोडे कंटाळवाणेच असते. कारण केस विंचरणे केस लांब असणाऱ्यांसाठी एक प्रकारची कसरत असते. पण दिवसातून दोनदा तरी केस विंचरायला हवे. जर केसांचा गुंता सुटलेला असेल तर केसांना ओढण्याची वेळ येत नाही. केस सतत ओढल्यामुळे आणि केसांना कसेही विंचरल्यामुळे देखील केसांना फाटे फुटतात.त्यामुळे केस विंचरल्याशिवाय कुठेही जाऊ नका.
हिटचा असा करा प्रयोग
फाटे फुटण्यासाठी हिटिंग करणाऱ्या मशीन्स कारणीभूत असतात. स्ट्रेटनर किंवा कर्लर मशीनमुळे केस फुटण्याची शक्यता जास्त असते. शक्य असेल तर तुम्ही केस योग्य सल्ल्याच्या मदतीने एकदाच सरळ करुन घ्या. केसांसाठी परमनंट स्ट्रेटनिंग करुन घेतले तर तुम्हाला सतत हिटचा प्रयोग करावा लागत नाही त्यामुळे केसांना होणारी हानी टाळता येते. केसांना मशीन वापरण्याची वेळ आली तरी देखील केसांच्या टिप्सला ही मशीन जास्त वेळ ठेवू नका. म्हणजे केसांच्या टिप्स कोरड्या पडणार नाहीत.
गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं
केस कापत राहा
केस चांगले वाढवायचे असतील तर केस किमान तीन महिन्यातून एकदा तरी ट्रिम करा असे सांगितले जाते. त्यामागे कारण इतकेच असते की, केस कापत राहिल्याने केसांचा शेपटी दिसत नाही. केस चांगले जाडजूड वाटतात. केस वाढवायचे जरी असले तरी अध्ये मध्ये त्यांना थोडी थोडी कात्री लावा केस कापत राहिल्याने केसांचा झुपका चांगला दिसतो
चांगला आहार
केसांची बाहेरुन काळजी घेणे जितके गरजेचे आहे तितकीच त्यांची काळजी आतून ही घेणे गरजेचे आहे. केसांची आतून काळजी घेणे म्हणजे केसांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आहारात असायला हव्यात. जर तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन्स असतील तर त्याचा फायदा अधिक होतो. केसांवर चांगली चमक राहते. शिवाय केसांच्या वाढीला चालना मिळते.
केसांना फाटे फुटू द्यायचे नसतील केसांची अशा पद्धतीने काळजी घ्यायला विसरु नका.