आरोग्य

उन्हाळ्यात शरीर कसे ठेवाल थंड, सोपे उपाय

Dipali Naphade  |  Apr 30, 2021
उन्हाळ्यात शरीर कसे ठेवाल थंड, सोपे उपाय

उन्हाळ्यात आपल्या शरीराचे तापमानही अधिक वाढते आणि त्यामुळेच अनेक आजार आणि शरीराला त्रास होतो. घामामुळे शरीरावर पुरळ येणे हे तर अत्यंत कॉमन आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरही थंड ठेवणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा अनेक आजारांना निमंत्रण मिळते. आम्ही तुम्हाला असेच काही सोपे उपाय देणार आहोत जे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतात. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळामुळे ताप येणे, सतत घाम येणे असे प्रकार होत असतात. पण तुम्ही या समस्यांपासून नक्कीच दूर राहू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराचे तापमान योग्य ठेवणे गरजेचे असते. पाणी पित राहणे हा नक्कीच सोपा उपाय आहे. पण तरीही तुमच्या शरीरातील उष्णता वाढत असेल तर काही घरगुती उपायांचा (homemade remedies) तुम्ही वापर करा. बरेच जण शरीर थंड ठेवण्यासाठी घरात एसी (air condition) चा वापर करतात. पण शरीराला आतून थंड ठेवणेही अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी नक्की कोणते घरगुती उपाय उपयोगी ठरतात ते आपण पाहूया.

केळ्याचे सेवन

Freepik

केळ्याचे सेवन तुम्ही नियमित उन्हाळ्याच्या दिवसात करणे हे अत्यंत लाभदायक आहे. केळ्यामध्ये पोटॅशियम अधिक असते जे पोटातील आम्लपित्त कमी करण्यास मदत करते. यामुळे पोटातील उष्णता कमी होऊन पोटात थंडावा राहातो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात केळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. विशेषतः लहान वेलची केळी असतील तर ती शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.

पाण्यात पाय बुडवणे

तुम्हालाही उन्हाळ्याच्या दिवसात त्रास होत असेल आणि सतत तुम्हाला आंघोळ करणंही जमणार नसेल  तर तुम्ही तुमचे दोन्ही पाय दिवसातून साधारण 10 मिनिट्स थंड पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे तुमच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी होते आणि शरीराचे तापमान योग्य राहण्यास मदत मिळते.

लावा चंदनाचा लेप

Shutterstock

चंदन शरीराला थंडावा देते हे आपल्याला परंपरागत माहीत आहे. बऱ्याचदा ताप आल्यावरही चंदनाच्या लेपाचा उपयोग केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात चंदनाचा लेप शरीराची उष्णता कमी करण्यास उपयुक्त ठरतो. शरीराची उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही चंदनाचा लेप कपाळावर आणि छातीवर लावावा. यामुळे शरीराची उष्णता कमी होते आणि शरीर व्यवस्थित थंड राहते.

चंदनाच्या फेसपॅकने करा त्वचा अधिक चमकदार

डाळिंबाचा ज्युस प्या

Shutterstock

डाळिंबाचा ज्युस उन्हाळ्यात पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे तुमचे शरीर थंड राहण्यास मदत मिळते. यामध्ये अँटिऑक्सिडंट, विटामिन ए, विटामिन सी आणि विटामिन ई चे प्रमाण अधिक असते. तसंच एल्गिनिग अॅसिडचा एक उत्तम स्रोत म्हणून डाळिंबाकडे पाहिले जाते. शरीराला थंडावा देण्यासाठी असणारे सर्व पोषक तत्व डाळिंबामध्ये असल्यामुळे तुम्ही नियमित या ज्युसचे सेवन करा.

उन्हाळ्यात या कारणांमुळे येतात पिंपल्स, करा सोपे उपाय

विटामिन सी चा करा उपयोग

Shutterstock

विटामिन सी सेवन केल्याने उन्हाळ्यात त्रास होत नाही आणि शरीरामध्ये योग्य तापमान राहते. आपल्या शरीराला अधिक थंड ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. यासाठी तुम्ही अनेक आंबट फळांचे सेवन करू शकता. द्राक्ष, संत्री यासारखी फळं तुम्हाला विटामिन सी अधिक मिळवून देतात. तसंच लिंबू पाणीही तुम्ही सेवन यासाठी करू शकता. हे अत्यंत प्रभावी ठरते.

उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी प्या ‘लिंबूपाणी’

थंड दुधाचे सेवन

Shutterstock

उन्हाळ्याच्या दिवसात चहा, कॉफी, गरम दूध नक्कीच पिऊ शकत नाही. त्यापेक्षा तुम्हाला शरीराची उष्णता कमी करायची असेल तर तुम्ही थंड दूध प्या. तुम्हाला नुसतं दूध आवडत नसेल तर यामध्ये एक चमचा मध मिक्स करा आणि थंड दुधाचे सेवन करा. उष्णतेमुळे उद्भवणारे आजार रोखण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. थंड दुधाच्या सेवनाने तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता.

ताक आहे उत्तम उपाय

Shutterstock

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे ताक. यामध्ये असणारे लॅक्टिक अॅसिड हे आरोग्यासाठी उत्तम असते. शरीरामध्ये अत्यंत स्फुर्ती आणण्याचे काम करते. जेवणानंतर हे ताक प्यायल्यास, पचनक्रियेसाठी उत्तम ठरते. यामध्ये कॅल्शिमय, पोटॅशियम आणि जस्ता असल्याने तुमच्या शरीराला याचा फायदा होतो. त्यामुळे उन्हाळ्यात नियमित ताक प्यायला हवे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य