हल्ली बाहेरून लिंबू मागवण्यापासून तर डॉक्टरची अपॉइंटमेंट बुक करण्यापर्यंत सगळी कामे ऑनलाईन होतात. सर्व कामे ऑनलाइन करण्याचे फायदे अनेक आहेत, परंतु काहीवेळा ऑनलाइन बँक खाते, ई-वॉलेट्स, जीमेल किंवा सोशल नेटवर्किंग साइट्सचे पासवर्ड हॅक झाल्यामुळे नुकसान होते. अशा परिस्थितीत, हॅकर्सपासून आपला पासवर्ड कसा सुरक्षित ठेवायचा हे जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे. पासवर्ड असतानाही अनेक वेळा मोबाईल, बँक अकाउंट किंवा सोशल मीडिया अकाउंट्स हॅक होतात. कारण पासवर्ड बनवताना आपण काही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉंग पासवर्ड कसा बनवायचा.
पासवर्ड हॅक झाल्यास होऊ शकते मोठे नुकसान
बँक अकाउंटचा पासवर्ड हॅक झाल्यास आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय जीमेल, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब या सोशल नेटवर्किंग साइट्सचे पासवर्ड हॅक झाल्यास हॅकर्स आपली महत्त्वाची माहिती मिळवू शकतात तसेच त्या साइटवरून काही आक्षेपार्ह किंवा चुकीच्या पोस्ट टाकू शकतात. याशिवाय पेटीएम, गुगल पे, फोनपे या बँक खात्याचा पासवर्ड आणि ई-वॉलेट हॅक झाल्यावर आपल्या खात्यातून पैसे काढले जातात. अशा परिस्थितीत आपली माहिती कुठेही लीक होऊ नये म्हणून तुमचे बँक अकाउंट, मेल अकाउंट तसेच सोशल मीडिया अकाउंट हॅकर्सपासून सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. तसेच पासवर्ड बनवताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते.
आपला पासवर्ड हॅकर्स पासून कसा सुरक्षित ठेवावा
- तुमचे सगळे अकाउंट्स हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी प्रत्येक अकाउंटसाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा. पासवर्ड लक्षात ठेवण्याचा त्रास टाळण्यासाठी अनेकदा आपण अशा चुका करतो, ज्याचा हॅकर्स सहज फायदा घेतात. एका साइटचा पासवर्ड हॅक झाल्यास, इतर साइटचे पासवर्ड देखील हॅक होतील.
- कुठलेही नवीन खाते तयार करताना, त्यासाठी नवीन पासवर्ड तयार करा, जुना पासवर्ड वापरू नका. कारण हॅकर्स कालबाह्य झालेले पासवर्ड डार्क नेटच्या माध्यमातून सहज काढतात. तुम्ही नवीन पासवर्ड सेट केल्यानंतर, तो तुमच्या ईमेलमध्ये मसुदा म्हणून, मजकूर दस्तऐवज म्हणून किंवा ऑनलाइन कुठेही सेव्ह करू नका. आणि वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा.तसेच Chrome किंवा इतर कोणत्याही ब्राउझरला तुमचा पासवर्ड सेव्ह करण्याची परवानगी देऊ नका.
- तुम्ही एखाद्या असुरक्षित वेबसाइटला भेट दिल्यास किंवा तुमच्या सिस्टममध्ये मालवेअर असल्यास, त्यामुळे तुमचे सर्व पासवर्ड असुरक्षित होतात. तसेच अकाउंट ऍक्सेस करण्यासाठी कायम टू -स्टेप व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडा. यामुळे हॅकर्स तुमचा फोन किंवा इतर प्लॅटफॉर्म हॅक करू शकणार नाहीत. पासवर्ड म्हणून फोन नंबर वापरणे ही सर्वात सामान्य चूक आहे जी लोक सहसा करतात.तसेच कोणत्याही महत्त्वाच्या तारखा पासवर्ड किंवा पिन म्हणून वापरणे नेहमी टाळा कारण त्यांचा सहज अंदाज लावता येतो. पासवर्ड किंवा कोणत्याही पिनमध्ये तुमचा फोन नंबर, जन्मतारीख, कार नंबर किंवा कोणतीही महत्त्वाची तारीख टाकू नका. त्यामुळे हॅकरला पासवर्ड किंवा पिन हॅक करणे सोपे जाते. याशिवाय पासवर्डमध्ये थेट तुमचे नाव ठेवणे टाळा कारण हे हॅकर्स सहजपणे हॅक करू शकतात.
- हॅकर्सपासून पासवर्डचे संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा. नेहमी तोच पासवर्ड ठेवल्यास तो हॅक होण्याची शक्यता जास्त असते. अनेक वेळा तुम्हाला असे वाटते की तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या खात्यातून साइन आउट केले नाही. त्यावेळीही पासवर्ड बदला.
अशा प्रकारे तुम्ही स्वतःचा पासवर्ड सुरक्षित ठेवू शकता.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक