DIY लाईफ हॅक्स

कपड्यांवरील चॉकलेटचे डाग असे करा स्वच्छ, वापरा या सोप्या ट्रिक्स

Trupti Paradkar  |  Dec 1, 2021
how to remove chocolate stains from clothes in marathi

चॉकलेट खाताना, चॉकलेटचं आईसक्रीम खाताना अथवा चॉकलेटची एखादी रेसिपी बनवताना तुमच्या कपड्यांवर सहज चॉकलेटचे डाग लागतात. चॉकलेटचे डाग हे इतर डागांच्या तुलनेने थोडे हट्टी आणि चिकट असल्यामुळे सहज निघत नाहीत. जर तुम्ही कपड्यांवरील चॉकलेटचे डाग काढण्यासाठी केमिकलयुक्त क्लिनर वापरलं तर तुमचे कपडे खराब होण्याची शक्यता जास्त असते. यासाठीच आम्ही तुम्हाला कपड्यांवरील चॉकलेटचे डाग काढण्याचे सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत.

Chocolate Day Quotes, Status, Kavita And Messages In Marathi (चॉकलेट दिन कोट्स मराठीतून)

कसे दूर कराल कपड्यांवरील चॉकलेटचे डाग

चॉकलेट चिकट आणि गडद रंगाचे असल्यामुळे कपड्यावर लागलेले चॉकलेटचे डाग काढणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. यासाठी करा हे उपाय

बेकिंग सोडा

कपड्यावरील चॉकलेटचे डाग काढण्याचा सोपा उपाय म्हणजे त्यासाठी बेकिंग सोडा वापरणे. यासाठी ज्या ठिकाणी डाग लागला आहे तिथे थोडा बेकिंग सोडा लावा. त्यानंतर त्यावर लिंबाचा रस लावा आणि व्हिनेगर लावून वीस मिनीट्स ठेवून द्या. त्यानंतर साधं लिक्वीड डिश वॉशर लावून घासून तुम्ही चॉकलेटचे डाग दूर करू शकता. 

व्हिनेगर वापरा

कपड्यांवरील कोणतेही डाग काढण्यासाठई तुम्ही व्हिनेगर नक्कीच वापरू शकता. यासाठी सौम्य डिर्टंजट आणि व्हिनेगर एकत्र करा आणि त्याची पेस्ट डाग लागलेल्या ठिकाणी लावा. काही वेळाने ब्रशने हलक्या हाताने रगडून तुम्ही कपडयांवरील चॉकलेटचे डाग काढू शकता.

रबिंग अल्कोहोल 

कपड्यांवरील चिकट चॉकलेटचे डाग काढण्यासाठी तुम्ही डाग लागलेल्या ठिकाणी रबिंग अल्कोहोल लावून ठेवू शकता. कारण डाग काढण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. वीस ते तीस मिनीटांनी तुम्ही तुमचे कपडे कोमट पाण्याने धुतल्यास तुमच्या कपड्यांवरील चॉकलेटचे डाग दूर होण्यास मदत होईल.

चॉकलेट रेसिपींनी गोड करा तुमचा व्हेलेंटाईन

अमोनियाचा करा वापर 

जर तुमच्या पांढऱ्या शुभ्र ड्रेसवर चॉकलेटचे डाग लागले असतील तर ते सहज नक्कीच जाणार नाहीत. यासाठी तुम्हाला काहीतरी जास्त प्रयत्न करावेच लागतील. तुम्ही यासाठी अमोनियाचा वापर करू शकता. अमोनिया डागावर लावून तुम्ही साध्या पाण्याने कपडे धुतले तर तुमच्या कपड्यांवरील हा चिकट डाग नक्कीच निघून जाईल.

चॉकलेट केक रेसिपी मराठीत, घरच्या घरी बनवा सोपे केक (Chocolate Cake Recipes In Marathi)

Read More From DIY लाईफ हॅक्स