DIY लाईफ हॅक्स

कप किंवा मगवरील चहा-कॉफीचे डाग असे करा स्वच्छ

Leenal Gawade  |  Jun 17, 2022
कपवरील डाग काढा असे

 भारतातील सगळ्या घरांमध्ये चहा अगदी आवर्जून केला जातो. सकाळपासून चहा टाकायला जी सुरुवात होते. ती अगदी रात्रीपर्यंत सुरुच असते. काही जणांकडे चहा हा सतत बनवला जातो. चहानंतर दुसरे आवडीचे पेय म्हणजे कॉफी. चहा आणि कॉफी या दोघांचेही डाग फार जिद्दी असतात ते काही केल्या जात नाही. हे डाग तुम्ही वापरत असलेल्या कप्सना देखील तसेच राहतात. तुम्ही तुमचे कप किंवा मग पाहिले आहेत का? ते नीट पाहा त्याच्या तळाशी तुम्हाला नक्कीच डाग दिसतील. कधी कधी कप चांगले असतात पण हे डाग असल्यामुळे कप फेकून देण्याची इच्छा होते. चला जाणून घेऊया कपवरुन असे हे जिद्दी डाग कसे काढावे ते.

साबणाच्या पाण्यात भिजवा

सगळ्यात सोपा आणि पटकन करता येणारा असा पर्याय म्हणजे पाण्यात भिजवणे. एका भांड्यामध्ये थोडे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये डिश वॉशिंग लिक्विड टाका. त्याचा फेस काढून काही काळासाठी कप्स भिजवत ठेवा. ते त्यामुळे तळाशी चिकटलेली चहा पावडर किंवा कॉफी निघून जाण्यास मदत मिळते. पण जर डाग खूप जुने असतील तर ते सहज निघणार नाहीत.अशावेळी तुम्ही स्क्रबरचा वापर करा. त्यामुळेही हे डाग निघण्यास मदत मिळते. 

उदा.एक मोठा टब घेऊन त्यामध्ये लिक्विड टाकून त्यात साधारणपणे 20 मिनिटांसाठी कप ठेवा. डाग जास्त असतील तर कालावधी वाढवला तरी देखील चालून शकेल. त्यानंतर जर सहज स्पाँजने डाग निघाले नाही तर मगच तारेचा किंवा ब्रशचा उपयोग करा.

अधिक वाचा: तुमची चहा पावडर शुद्ध आहे का, चेक करा गुणवत्ता

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा हा देखील कपवरील चहा आणि कॉफीचे डाग घालवण्यासाठी चांगला असतो. बेकिंग सोडा चमचाभर घेऊन तो कपमध्ये घाला. त्यावर अगदी काही थेंब पाणी टाकून तो तसाच ठेवून द्या. बेकिंग सोडा हट्टी आणि चिकट डाग काढून टाकण्यास मदत करतात.ही ट्रिक खूप वेळा कामी येते. त्यामुळे बेकिंग सोडा अगदी नक्कीच तुम्ही वापरा. सिरॅमिक भांड्याव्यतिरिक्त काचेवरहही असे डाग असतील तर ते डाग निघण्यासही मदत मिळते.

व्हिनेगर

कपवरील जिद्दी डाग

डाग घालवण्यासाठी व्हिनेगर हे देखील चांगले आहे. व्हिनेगर घेऊन ते अशाच पद्धतीने कपमध्ये घालून ठेवून द्या. व्हिनेगरने देखील डाग जाण्यास मदत मिळते. एका भांड्यात थोडेसे व्हिनेगर घेऊन ते कपला लावून ठेवून द्या. व्हिनेगरमुळे डाग निघण्यास मदत मिळते. व्हिनेगर जास्त काळासाठी ठेवले तर ते डाग आपोआपच निघून जातात. पण जर तसे  झाले नाही तर कप थोडा घासला तरी चालू शकेल.

हे ही असू द्या लक्षात

कप घेताना काही गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हाला कप जास्तीत जास्त काळ टिकवण्यास मदत मिळेल. इतकेच नाही तर ते स्वच्छ देखील राहतील. 

  1. कपचा वापर करुन झाल्यानंतर ते लगेचच धुवून घ्या. किंवा साबणाच्या पाण्यात टाकायला अजिबात विसरु नका. 
  2. कपचा आकार निवडताना तो स्वच्छ करण्यास सोपा जाईल असा घ्या. कारण खूप वेळा आपण वेगवेगळे आकार निवडायला जातो. त्यामुळे डाग स्वच्छ करणे कठीण जाते. कारण चहा- कॉफी कोपऱ्यात जाऊन बसते. शक्यतो कप हा गोलाकार असावा. 

या काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही घरातील कप्स ठेवा एकदम स्वच्छ

Read More From DIY लाईफ हॅक्स