DIY फॅशन

ब्लाऊज सैल झाल्यास, न फेकता कशी करावी स्टाईल

Dipali Naphade  |  Jun 1, 2022
how-to-style-an-oversize-blouse-in-marathi

ब्लाऊज असा वेश आहे जो तुम्ही साडी, लेहंगा अथवा श्रगसह तुम्ही घालू शकता. कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे, डिझाईनर ब्लाऊज घालू शकता. वास्तविक महिला साडीसह ब्लाऊज अधिक प्रमाणात घालतात. कारण ब्लाऊज तुमच्या साडीचा लुक अधिक प्रमाणात वाढवतात. त्यामुळे महिलांच्या वॉर्डरोबमध्ये ब्लाऊजदेखील अधिक प्रमाणात दिसून येतात. पण काही ब्लाऊज असेही असतात, जे तुम्हाला सैल होतात आणि ते फिट करण्याइतका वेळही तुमच्याकडे नसतो. पण तुम्हाला माहीत आहे का? असे ओव्हरसाईज्ड ब्लाऊज अथवा सैल झालेले ब्लाऊजदेखील तुम्ही वेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकता. 

सैलसर ब्लाऊजसाठी तुम्ही करा दोऱ्याचा वापर 

ओव्हरसाईज ब्लाऊज असेल तर तुम्ही त्यावर श्रग अथवा कोटी घालू शकता. कारण ब्लाऊजसह कोटी केवळ चांगलीच दिसते असं नाही तर तुमचा सैलसर ब्लाऊज लपतो. या कोटीची निवड तुम्हाला तुमच्या ब्लाऊजनुसार करावी लागेल. तुमचा ब्लाऊज प्रिंटेड असल्यास, यावर तुम्ही अत्यंत साधी कोटी निवडा. जर प्लेन असेल तर त्यावर प्रिंटेड श्रग वा कोटीची निवड करा. ब्लाऊजसह तुम्ही लेहंगा वा साडी अत्यंत सहजपणाने नेसू वा घालू शकता. पण त्यासाठी तुम्ही कोटीची लांबी किती निवडत आहात याकडेही लक्ष ठेवा. लांब श्रग हा साडीसह अधिक चांगला दिसतो. याशिवाय ब्लाऊजवर कोटी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही स्टाईल करू शकता. सैलसर ब्लाऊजसह तुम्ही रंगबेरंगी कोटीही घालू शकता. जेणेकरून तुम्हाला फिटिंगचा जास्त विचार करावा लागणार नाही आणि तुमचा वेळही वाचेल. तसंच तुम्हाला वेगळा लुकही मिळतो. 

ऑफशोल्डर लुक करा 

तुमचा ब्लाऊज सैल झाला असेल तर तुम्ही याचा ऑफशोल्डर ब्लाऊज लुक बनवा आणि तो घाला. यासाठी तुम्ही सैलसर झालेला ब्लाऊज तुमच्या दोन्ही खांद्यांच्या बाजूने खाली ओढून घ्या आणि मग लेहंगा अथवा साडीवर हा ब्लाऊज घालून लुक करा. जर तुम्ही ब्लाऊज लेहंग्यासह घालणार असाल तर ब्लाऊज तुम्ही कफ्तानप्रमाणे स्टाईल करून घ्या. कफ्तानमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स मिळते, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीचे डिझाईन निवडून त्याप्रमाणे तुमचा लुक करून घ्या. यासह तुम्ही वेगवेगळ्या अॅक्सेसरीजचा अर्थात चोकर, नेकरेस इत्यादी गोष्टींचा वापर करून घेऊ शकता. 

हुकचा करा वापर 

तुमच्या सैलसर ब्लाऊजचा वापर करण्यासाठी तुम्ही हुकचा वापर करू शकता. हुक तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मागच्या बाजूला अथवा पुढच्या बाजूला लावल्यास एकदम परफेक्ट लुक करून घेऊ शकता. हुक लावणे केवळ सोपेच नाहीये तर ब्लाऊजचे डिझाईनदेखील यामुळे खराब होत नाही आणि तुम्हाला ब्लाऊजचा वापरही करता येतो. यासाठी तुम्हाला तुमच्या फिटिंगबाबत व्यवस्थित अंदाज यायला हवा जेणेकरून तुम्ही व्यवस्थित हुक लाऊ शकता. हुक लावण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. मात्र तुम्ही अगदी सहज याचा वापर करून घेऊ शकता. तुम्ही ब्लाऊजचा गळा लहान करू इच्छित असाल तर तुम्हाला तुमच्या खांद्याजवळ हुक लावल्यास, ब्लाऊजचा पुनर्वापर योग्य पद्धतीने करता येईल. 

अशा पद्धतीने तुम्ही सैलसर ब्लाऊजचा वापर करून स्टाईल करू शकता. आशा आहे की, तुम्हाला ब्लाऊज सैल होत असल्यास, पटकन वापरायला असल्यास, या पद्धतीचा वापर करता येईल आणि लगेच वापरता येईल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन