लग्नसमारंभ ठरतो तेव्हा सर्वात पहिले लग्नासाठी अर्थात वेडिंग लुकसाठी काय घालायचे आणि काय निवडायचे अथवा कशी स्टाईल करायची याबाबत आपण विचार करायला लागतो. जेव्हा आपल्याला लग्नासाठी काही स्टाईल करायची असते तेव्हा सहसा आपण पारंपरिक आणि वेगवेगळ्या साड्यांचे पर्याय आपण निवडतो. तुम्हाला पारपंरिक वेडिंग लुक हवा असेल तर तुम्ही बनारसी साड्यांचा अथवा बनारसी लेहंगाचा पर्याय निवडा. बनारसी कपडे हे नेहमी तुम्हाला रॉयल लुक मिळवून देतात. जेव्हा फेस्टिव्ह सीझन असतो तेव्हा महिलांना बनारसी लेहंगा अथवा बनारसी साडी खरेदी करणे नक्कीच आवडते. बनारसी लेहंग्याच्या करा वेगळी स्टाईल आण दिसा अधिक आकर्षक आणि सुंदर. कसे ते घ्या जाणून.
गोल्ड एम्ब्रॉयडरीचा लाल बनारसी लेहंगा (Red Banarasi Lehenga)
तुम्ही जर लवकर लग्न करणार असाल तर गोल्ड एम्ब्रॉयडरीचा लाल बनारसी लेहंगा (Gold Embroidery Red Banarasi Lehenga) हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. कारण लग्नासाठी लाल आणि गोल्ड रंग हा एकत्र क्लासी लुक तुम्हाला मिळवून देतो. तुम्ही जर लाल रंगाचा लेहंगा घालणार असाल तर त्यासह सोन्याचे दागिने हा उत्तम पर्याय तुम्हाला स्टाईल करण्यासाठी मिळतो. तसंच तुम्ही यासह लाल चुडा घालणे अधिक चांगले दिसते अर्थात महाराष्ट्रीयन लग्नामध्ये हिरवा चुडा घातला जातो. मात्र हल्ली स्टाईलसाठी लाल चुडादेखील तुम्ही घालू शकता. अशा स्टाईलवर तुम्ही मिनिमल मेकअप ठेवा. भडक रंगाच्या बनारसी लेहंग्यासह भडक मेकअप चांगला दिसत नाही. तसंच तुम्ही अति बटबटीत डिझाईन निवडू नका. तर नवरीला साजेसे असे बनारसी लाल रंगाचा लेहंगा तुम्ही निवडा.
बनारसी लेहंगा चोली आणि नेटचा दुपट्टा
तुम्हाला तुमच्या हेव्ही लेहंग्यासह हलका दुपट्टा घ्यायचा असेल तर तुम्ही नेटचा दुपट्टा वापरा. वास्तविक बनारसी लेहंगा आणि ब्लाऊज हा अतिशय हेव्ही वर्क डिझाईन्ससह असतो. त्यामुळे त्यावर साधा आणि सोबर दुपट्टा अधिक सुंदर दिसतो. यासह तुम्ही तुमचे दागिने कॉन्ट्रास्ट फॅशन करून वापरू शकता. हा लुकदेखील तुम्हाला अत्यंत सुंदर दिसतो. याशिवाय तुम्ही तुमच्या या लुकसह थोडासा वेगळेपणादेखील दाखवू शकता. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुमच्या लग्नासाठी अथवा जवळच्या कोणाच्याही लग्नामध्ये तुम्ही असा बनारसी लेहंगा चोली लुक नक्कीच ट्राय करू शकता.
अशी करा स्टाईल
बनारसी लेहंग्याची स्टाईल करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते सर्वांनाच नीट जमते असं नाही. त्यामुळे याची स्टाईल नक्की कशी करायची याच्या काही खास टिप्स तुमच्यासाठी –
- तुम्हाला तुमच्या बनारसी लेहंग्यासह दुपट्टा स्टाईल करायचा असेल तर तुम्हाला यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही जर ब्राईड्समेड अर्थात करवली असाल आणि आपली बहीण अथवा आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नामध्ये बनारसी लेहंगा लुक करून वेगळा लुक मिळवायचा असले तर तुम्ही शॉल स्टाईलप्रमाणे यावर हा दुपट्टा परिधान करा
- तुम्हाला तुमचा लुक साधा आणि सोबर हवा असेल तर तुम्ही दुपट्टा एका बाजूला घ्या. इतकंच नाही जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या कोणत्या कार्यक्रमाला वा समारंभाला जात असाल तर तुम्ही हा दुपट्टा साडी स्टाईलमध्येही घालू शकता. यामुळे बनारसी लेहंग्याचा बनारसी साडीसारखा लुक येईल. साडी कशी नेसायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला हा पर्यायही उत्तम आहे.
- पारंपरिक लुकसाठी तुम्ही लेहंग्याचा दुप्पट्टा सरळ साडीच्या पदराप्रमाणेदेखील घेऊ शकता. अशा स्वरूपाने तुम्ही बनारसी लेहंग्यावर दुपट्टा स्टाईल करू शकता
- तुम्ही बनारसी लेहंग्यासह ब्लाऊजदेखील डिझाईनर वापरला असेल तर तुम्ही त्याच्या निऱ्या बारीक काढू शकता. याच्या पदराच्या बारीक निऱ्या काढून तुम्ही ब्लाऊजच्या डाव्या बाजूला पिनअप करा. असे केल्याने तुम्हाला बनारसी लेहंगा आणि दुपट्टा कॅरी करायला काहीच त्रास होणार नाही
बनारसी लेहंग्याची स्टाईल करताना तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि दिसा अधिक रॉयल आणि आकर्षक.