कोणत्याही स्किन स्पेशालिस्ट किंवा स्किनफ्लुएंसर किंवा ब्युटी एक्स्पर्टला विचारले तर ते म्हणतील की तुमच्या डेली स्किनकेअर रुटीन मधील सर्वात महत्त्वाचे स्किनकेअर उत्पादन म्हणजे सनस्क्रीन होय. हे त्वचेचे मुक्त रॅडिकल्स मुळे झालेले नुकसान, मेलॅनिन, मुरुम आणि त्वचेच्या कर्करोगापासून संरक्षण करते. जशी आपण आपल्या त्वचेची काळजी घेतो तशीच काळजी आपण आपल्या केसांची देखील घेतली पाहिजे. खास करून तीव्र उन्हाळ्यात तर केसांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. तुमचे केस सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्यास, UVA आणि UVB किरण केसांच्या बाहेरील आवरणाला नुकसान पोहोचवू शकतात, ज्याला क्यूटिकल म्हणतात. हे केसांच्या शाफ्टला नुकसान पोहोचवू शकते आणि केस नाजूक होणे, लवकर पांढरे होणे, कोरडे आणि ठिसूळ होणे,तुटणे, पातळ होणे आणि गळणे अशा समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात टाळूला जास्त घाम येतो आणि टाळू चिकट व तेलकट होते, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.म्हणूनच उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची हे वाचा.
टाळूची काळजी घ्या
सनस्क्रीन असलेल्या केसांच्या उत्पादनांचा वापर सूर्याच्या नुकसानाविरूद्ध अडथळा निर्माण करण्यात मदत करेल. आंघोळीनंतर तुम्ही तुमच्या टाळू आणि केसांसाठी अशी लीव्ह-इन ट्रीटमेंट महत्त्वाची आहे. डायमेथिकोन असलेले यूव्ही फिल्टर असलेले कंडिशनर लावा जे केसांच्या शाफ्टवर कंडिशनरची पातळ फिल्म आणि सनस्क्रीनची लेयर तयार करतात आणि केसांचे संरक्षण करतात. तसेच उन्हात जाताना केस कधीही उघडे ठेवू नका. टोपी, ओढणी/ स्कार्फ किंवा छत्री वापरा जी तुमच्या टाळूचे व केसांचे अतिनील किरणांपासून संरक्षण करेल.
ब्लीचपासून दूर राहा
सूर्याची किरणे केसांवर ब्लीचसारखे काम करतात. हे केसांमधील मेलेनिनशी रिऍक्ट होते व केसांवरील रासायनिक रंग काढून टाकते. त्यामुळे केसांमधील केराटीनचेही नुकसान होते. हॉट टूल्स आणि हेअर लाइटनिंगमुळे केसांमधील प्रथिनांचे आणखी नुकसान होऊ शकते, ज्यामुळे सूर्य आणि उष्णता केसांमध्ये अधिक सहजपणे प्रवेश करू शकते, ज्यामुळे केस नाजूक होतात. म्हणून शक्यतोवर उन्हाळ्यात केस ब्लीच करू नका.
शॉवर घेताना केसांचे डीप-कंडिशनिंग करा
ज्याप्रमाणे मॉइश्चरायझिंग केल्याने त्वचा सुरक्षित राहते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे केसांचे कंडिशनिंग केल्याने केस मजबूत, अधिक लवचिक राहतात. कंडिशनर केसांचे क्यूटिकल सील करून आणि ते कमी सच्छिद्र बनवते ज्यामुळे केस अधिक कुरळे होण्याची आणि तुटण्याची शक्यता कमी होते. आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग केल्याने खराब झालेल्या केसांना आवश्यक ओलावा मिळतो.
आहारात अँटिऑक्सिडंट्सचा समावेश करा
सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचे व केसांचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होऊ शकते. म्हणूनच तुमच्या आहारात रंगेबेरंगी फळे आणि भाज्यांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. भाज्या व फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात.
हीट-स्टाइलिंग टूल्सना नाही म्हणा
आपण केसांची स्टाइल करण्यासाठी हीट-स्टाइलिंग टूल्स वापरतो. परंतु उन्हाळ्यात ते वापरू नका. खरं तर, सूर्यप्रकाशामुळे आधीच केसांचे नुकसान होते आणि जास्त उष्णतेमुळे केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात आणि केसांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. म्हणूनच उन्हाळ्यात केस धुतल्यानंतर ब्लो-ड्रायर्स, कर्लर्स आणि स्ट्रेटनर वापरणे टाळलेले बरे.
हेअर मास्क लावा
उन्हाळ्यात तुमच्या केसांना हवामानाचा सर्वाधिक त्रास होतो. अशा परिस्थितीत केसांची काळजी घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे केसांना अतिरिक्त पोषण प्रदान करणे. तुमच्या केसांचा आणि टाळूचा प्रकार लक्षात घेऊन घरीच हेअर मास्क बनवण्याचा प्रयत्न करा किंवा बाजारातून हेअर मास्क आणून वापरा. हेअर मास्क केवळ तुमच्या केसांना चमक देत नाही तर केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. हेअर मास्क तुमच्या केसांना मॉइश्चरायझ करतो, मऊ करतो आणि हायड्रेट करतो, टाळूचे आरोग्य सुधारतो आणि केसांच्या वाढीस चालना देतो.
अशा प्रकारे उन्हाळ्यात केसांची काळजी घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक