यंदा पाऊस अगदी मुसळधार आणि मनसोक्त बरसला आहे. पावसाळ्यात ओलावा आणि आर्द्रता वाढलेली असते. ज्यामुळे पावासाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं असतं. पावसाळ्यात घ्याव्या लागणाऱ्या काही दक्षतांमध्ये सर्वात महत्त्वाची दक्षता घ्यावी लागते ता विजेच्या उपकरणांबाबत. कारण पावसाळ्यात विजेच्या उपकरणांपासून माणसाला सर्वात जास्त धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय दैनंदिन जीवनात माणसाला एसी, रेफ्रिजरेटर, मायक्रोव्हेव, मिक्सर, इस्त्री, वॉशिंग मशीन, गिझर अशा अनेक विजेच्या उपकरणांना हाताळावं लागतंच. या गोष्टी माणसाच्या आता नेहमीच्या जीवनाचा एक भागच झालेल्या आहेत. मात्र पावसाळ्यात हवामानातील ओलाव्यामुळे अशा उपकरणांमधून शॉक लागण्याची जास्त प्रमाणात शक्यता असते. यासाठी Godrej Appliances चे राष्ट्रीय सेवा प्रमुख रवी भट यांच्याकडून जाणून घेऊयात पावसाळ्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी कशी घ्यावी.
पावसाळ्यात घरगुती उपकरणांची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स
उपकरणांचे आर्द्रतेपासून रक्षण करा
- पावसाळ्यात मुळातच हवामानातील आर्द्रता वाढलेली असते. ज्यामुळे विजेच्या उपकरणांना बुरशी लागण्याची शक्यता असते. साठीच विजेची उपकरणे दररोज कोरड्या कापडाने पुसून स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.
- या काळात रेफ्रिजरेटरच्या बाह्यभाग, दरवाजा आणि गॅस्केटवर बाष्प जमा होणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे.हे द्रवरूप बाष्प तीव्र आर्द्रतेमुळे जमा होत असते. मात्र ते शक्य तेव्हा कोरड्या फडक्याने पुसून घेणे आवश्यक आहे.
उपकरणातील पोकळ जागा आणि बाह्य भाग स्वच्छ करण्यासाठी कोरडे, सुती फडके वापरा.
शॉर्ट सर्किट आणि इलेक्ट्रिक शॉक पासून सावध राहा
- मुसळधार पाऊस पडत असल्यास रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्स इत्यादी अवजड उपकरणांचा प्लग काढून ठेला. विजांचा कडकडाट अथवा इतर कारणांमुळे या उपकरणांमध्ये बिघाड होऊ शकतो.
- ओल्या हातांनी कधीच उपकरणांना स्पर्श करू नका, कारण त्यामुळे विजेचा धक्का बसण्याची मोठी जोखीम निर्माण होऊ शकते.
- उपकरण योग्य ठिकाणी इन्स्टॉल करा. शिवाय जास्त आर्द्रता असलेल्या भागापासून ते शक्य तितके दूर ठेवा, नाहीतर शॉर्ट सर्किट होऊ शकते.
- खिडक्या, छतातून होण्याच्या पाण्याच्या गळतीपासून सावधान राहा. बाल्कनी किंवा खुल्या जागेत कधीच विजेची उपकरणे ठेवू नका.
- चांगल्या प्रतीचा वीजपुरवठा वापरा. अर्थिंगची तपासणी करा, कारण त्यामुळे शॉर्ट सर्किटला प्रतिबंध होतो.
- विजेचे बटण योग्य असेल असे बघा, कारण जास्त पाऊस असताना त्यातून शॉक लागू शकतो.
- स्विच बोर्ड पेट घेऊ नये यासाठी एमसीबी अथवा चांगल्या दर्जाचे स्विचेस वापरा
विजा चमकत असताना तुमचे उपकरण सुरक्षित ठेवा –
- पावसाळ्याआधीच एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीकडून लायटनिंग रॉड इनस्टॉल करून घ्या.
- सर्व उपकरणे योग्य अर्थिंगशी जोडलेली आहेत हे तपासा.
- वीज आणि वादळांदरम्यान विजेवर चालणारी उपकरणे बंद करून त्यांचा प्लग काढून ठेवा.
- इलेक्ट्रिक सर्ज संरक्षक वापरा.
उपकरणांची देखभाल करा
- पावसाळ्याआधी उपकरणांची दुरुस्ती- देखभाल करणे महत्त्वाचे आहे.
- उपकरण सुरक्षित ठेवण्यासाठी विक्री पश्चात सेवा अतिशय आवश्यक असते. उपकरण सुस्थितीत राखण्यासाठी या सेवेचाउपयोग करणेही महत्त्वाचे आहे.
- त्याचप्रमाणे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या आणि थेट ब्रँडतर्फे सेवा देत असल्याचा दावा करणाऱ्या अनाधिकृत सेवा पुरवठादारांपासून सावध राहा. तुमच्या घरी भेट देणाऱ्या तंत्रज्ञाने ब्रँडचा गणवेश घातला आहे याची खात्री करा आणि फसवणूक किंवा उपकरणाचे नुकसान टाळण्साठी त्याचे अथवा तिचे ओळखपत्र तपासा.
- तुमचे उपकरण वापराशिवाय ठेवू नका
- अतिरिक्त आर्द्रतेमुळे तुमचे उपकरण जाम होऊन त्यात बिघाड करू शकते. त्याच मुळे उपकरण दीर्घकाळ वापराशिवाय राहिल्यास त्याच्या कामकाजात बिघाड होऊ शकतो. म्हणूनच उपकरण दीर्घ काळ वापराशिवाय ठेवणे टाळा आणि ते आठवड्यातून किमान एकदा तरी वापरा.
- जर तुमच्या घरातल्या एअर कंडिशनरचा खूप काळ वापर होत नसेल, तर त्याची नियमित देखभाल केली जाणं आवश्यक आहे. इतर कोणत्याही घरगुती उपकरणासाठी, मग ते मायक्रोवेव ओव्हन असो, वॉशिंग मशिन किंवा रेफ्रिजरेटर असो, ते व्यवस्थित स्वच्छ राहील आणि ते सुरू करण्यापूर्वी त्याचा वीज पुरवठा योग्य असेल याची खबरदारी घ्या.
तापमान अचूक राहील याची खात्री करा
- एयर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटरच्या तापमानाची सेटिंग कमी करण्याची दक्षता घ्या, कारण ते उन्हाळ्यात बरेच जास्त असते.
- पावसाळ्यापूर्वी चेस्ट फ्रीझर डिफ्रॉस्ट करा, कारण पावसाळ्यात बर्फ जमण्याची वारंवारता जास्त असते.
पावसाळ्यात या आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करा आणि चिंतामुक्त होऊन पावसाचा आनंद घ्या.
अधिक वाचा –
Vaastu Tips : तुमचं घर सांगतं तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल बरंच काही
घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी करा हे ‘5’ सोपे उपाय
घराला कसं बनवावं ‘स्मार्ट होम’, काय आहे ‘स्मार्ट होम’
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम