बॉलीवूड

VIDEO – सुपर 30 च्या सेटवर ऋतिक रोशन जेव्हा भोजपुरी ‘तू लगावे जब लिपस्टिक’वर करतो डान्स

Dipali Naphade  |  Jul 2, 2019
VIDEO – सुपर 30 च्या सेटवर ऋतिक रोशन जेव्हा भोजपुरी ‘तू लगावे जब लिपस्टिक’वर करतो डान्स

ऋतिक रोशनचा ‘सुपर 30’ प्रदर्शनाच्या मार्गावर असून सध्या या चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ऋतिक रोशन आणि डान्स हे बेस्ट काँम्बिनेशन आहे. त्याला डान्स करताना पाहणं ही त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. तर भोजपुरी गायक पवन सिंहच्या ‘लगावेलू जब लिपिस्टिक…हिलेला आरा डिस्ट्रिक…जिला टॉप लागेलू’ या गाण्याने केवळ बिहारच नाही तर संपूर्ण देशभर सर्वांना वेड लावलं आहे. यामध्ये ऋतिक रोशन तरी कसा मागे राहील. लग्न पार्टी या सर्वच ठिकाणी हे गाणं सध्या वाजत असतं. ऋतिकनेदेखील या गाण्यावर डान्स केला असून सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

ऋतिक रोशनने सुपर 30 च्या सेटवर जमवला डान्सचा रंग

ऋतिक रोशनने आपल्याबरोबर काम करणाऱ्या सर्व अभिनेत्यांबरोबर या भोजपुरी गाण्यावर डान्स करून सुपर 30 च्या सेटवर जमवला डान्सचा रंगच जमवला. या डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ऋतिकने आपल्या सोशल अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सर्वांनाच हा व्हिडिओ आवडत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ऋतिकने विशेष कॅप्शन दिली आहे. सध्या त्याच्या आजूबाजूला जे वातावरण आहे आणि तो ज्या कंट्रोव्हर्सीमध्ये गेल्या काही वर्षांपासून अडकला आहे. कदाचित हे त्याच्याशी संबंधित असावं असंच वाटत आहे. ऋतिकने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, ‘आपल्याला साहस, शक्ती आणि बुद्धी हवी जेणेकरून आपण आयुष्यात येणाऱ्या परिस्थिती आणि घटनांना सामोरं जाऊन आपला दृष्टीकोन बदलू शकू. चला तर मग उठा आणि डान्स करा! तुमचं नियंत्रण असू द्या. तुमच्यावर इतर कोणाचं नियंत्रण असू देऊ नका. सुपर 30 चा क्लासची ही एक वेगळीच बाजू आहे. या युवा अभिनेत्यांबरोबर मी खूपच मजा केली आहे. यातील काही लोक पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर दिसत आहेत. #super30 #keepcreating #keepgrowing #wearetheworld #studentsforever’. डान्सवर प्रेम करा आणि आयुष्याकडे कसं पाहा हे सांगणारी एक अप्रतिम लाईन ऋतिकने यामध्ये लिहिली आहे. ऋतिक काल हा व्हिडिओ पोस्ट केला असून काही तासांमध्येच प्रेक्षकांनी हा व्हिडिओ डोक्यावर उचलून धरला आहे. प्रेक्षकांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला असून याचे काही तासांमध्येच 14 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज झाले आहेत. 

पहिल्यांदाच गणित शिक्षकाच्या भूमिकेत

Instagram

ऋतिक पहिल्यांदाच गणित शिक्षकाच्या भूमिकेत सुपर 30 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ऋतिक बऱ्याच गॅपनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना दिसणार असून त्याच्या नेहमीच्या भूमिकेपेक्षा ही भूमिका वेगळी आहे. सुपर 30 हा चित्रपट 12 जुलैला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मृणाल ठाकूर, नंदीश सिंह, अमित साध आणि पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये ऋतिकनेदेखील वाटा उचलला आहे. तर मराठमोळी असणारी मात्र मालिकांमध्ये आपली छाप उमटवलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. सध्याच्या शिक्षणावर भाष्य करणारा हा चित्रपट असून यामधून सत्य मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांनाही खूपच आशा आहे. त्यामुळे आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील याचीही उत्सुकता आहे. 

हेदेखील वाचा –

कंगनाला पाठिंबा देत ह्रतिकच्या बहिणीने केले ह्रतिकवर गंभीर आरोप

चीनमध्ये हृतिक ठरला ‘दा शुई’, चीनच्या प्रेक्षकांना आवडला काबिल

या विचित्र फोटोंमुळे हे सेलिब्रिटी झाले होते चर्चेचा विषय

 

Read More From बॉलीवूड