मनोरंजन

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी

Leenal Gawade  |  Aug 6, 2019
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. दिल्लीतल्या AIIMS रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल रात्री त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळले आणि काही तासातच ही दु:खद बातमी समोर आली. सुषमा स्वराज यांच्या अकाली एक्झिटमुळे अनेकांना धक्का बसला आहेच. शिवाय राजकारणातील एक खंबीर महिला नेतृत्व हरपल्याची भावना सगळीकडे व्यक्त केली जात आहे.

70 मिनिटं दिली मृत्यूशी झुंज

साधारण 9.26 दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अचानक त्यांची तब्येत खालावली. तब्बल 70 मिनिटं त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. पण त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याच त्यांचे निधन झाले. 

दोन दिवसांचा राजकीय दुखवटा

Instagram

सुषमा स्वराज यांचे पार्थिव दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकं येत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले असून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाणार आहे. 

परदेशातही सुषमा स्वराज यांचे चाहते

Instagram

देशातच नाही तर परदेशातही सुषमा स्वराज यांचे चाहते आहेत. अनेक देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळेच जगभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. मालदीवच्या विदेश मंत्र्यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नेपाळचे पंतप्रधान, फ्रान्स, अफगाणिस्तान या देशांनी त्यांच्या जाण्याचे दु:ख व्यक्त केले आहे. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पदाचा भार स्विकारत त्यांनी इतिहास रचला. मोदी सरकारच्या कारकीर्दीत त्यांनी परराष्ट्रमंत्री पदाचा भार स्विकारला. त्या सातवेळा आमदार म्हणून निवडून आल्या. तर तीन वेळा त्या खासदार म्हणून निवडून आल्या. सगळ्यात तरुण नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. देशातील सगळ्यात लाडकी राजकारणी अशी त्यांची ओळख होती.

ट्विटर क्वीन

सुषमा स्वराज यांनी ट्विटर क्वीन म्हटले जायचे.कारण त्या ट्विटरवर कायम अॅक्टिव्ह असायच्या. त्या कायम ट्विट करायच्या. पण त्यातून कोणताही वाद उद्भवेल असं त्यांनी कधीही केले नाही. लोकांना येणाऱ्या समस्या लोकं त्यांना ट्विटवरुन सांगायची आणि त्या समस्या लक्षात घेऊन त्या लगेच तो प्रस्न सोडवायच्या. काश्मीरचा विशेष दर्जा काढून मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे देखील त्यांनी ट्विटरवरुन स्वागत केले होते.त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. पासपोर्टसारखा क्लिष्ट विषय त्यांनी सोडवला. पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया सोपी आणि सगळ्यांना समजेल अशी केली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांनी ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कुलभूषण जाधवांच्या वकिलाला केला शेवटचा फोन

 कुलभूषण जाधव यांचे वकिल हरिश साळवे यांच्याशी सुषमा स्वराज शेवटचे संभाषण केले. साधारण 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांना फोन केल्याचे हरिश साळवे यांनी सांगितले. फोन केल्या तेव्हा सुषमा स्वराज अगदी ठणठणीत होत्या. त्यांनी मला भेटण्यासाठी बुधवारी संध्याकाळी 6 वाजताची वेळ दिली होती. पण अगदी काहीच तासात त्यांच्या निधनाची बातमी कानी पडली. आश्चर्याचा धक्का बसला.कायम हसतमुख असलेल्या सुषमा स्वराज यांचे निधन म्हणजे माझी मोठी बहीण गमावणे, असे दु:ख त्यांनी एका न्यूज चॅनेलवर व्यक्त केले. 

 त्यांच्या जाण्याचे दु:ख आम्हालाही असून #popxomarathi कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Read More From मनोरंजन