भारतामध्ये अनेक प्राचीन मंदीर, मस्जिद, चर्च आणि अशा अनेक जागा आहेत ज्या तुम्हाला माहीतही नसतील. तसंच याठिकाणी अनेक रहस्यही दडलेली आहेत. देशामध्ये अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांच्याविषयी आजही आपल्याला अत्यंत कमी माहिती आहे. अशाच एका मंदिराविषयी या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) असेच एक मंदीर आहे जे देशात आणि उत्तर प्रदेशात साधारण पाऊस कधी होईल अथवा कधी होणार नाही याचे संकेत देते. या मंदिराच्या छतावरून तेथील पुजारी यावर्षी किती पाऊस येईल याचा अंदाज बांधतात. पण नक्की हे संकेत काय आहेत आणि हा चमत्कारी घटनाक्रम काय आहे ते आपण जाणून घेऊया. तुम्हाला पण नक्कीच याची उत्सुकता असेल, तर आम्ही तुम्हाला याची खास माहिती देत आहोत.
7-8 दिवस आधी मिळतात पावसाचे संकेत
उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात भीतरगाव ब्लॉकपासून साधारण तीस ते चाळीस किलोमीटरवर अस्तित्वात असणारे एक मंदीर आहे ज्याचे नाव आहे ‘जगन्नाथ मंदीर’ (Jagannath Mandir). या मंदिराबाबत अनेक किस्से सांगितले जातात. या मंदिराच्या छतावर टपकणाऱ्या पाण्याच्या थेंबावरून पावसाचा अंदाज लावला जातो की, देशामध्ये कोणत्या आणि किती स्तरावर पाऊस येऊ शकतो. पाऊस चालू होण्यापूर्वी 7 दिवस आधी या मंदिराच्या छतावरून पाणी येऊ लागते. हे पाणी अधिक असेल तर यावर्षी पाऊस खूपच चांगला होणार असा अंदाज बांधण्यात येतो. पण जर हे पाण्याचे थेंब अगदी आरामात येत असतील तर मात्र पाऊस यावर्षी कमी होणार असं मानलं जातं.
महाराष्ट्रात फिरता येणारे अप्रतिम समुद्रकिनारे (Beaches In Maharashtra)
जगन्नाथ मंदिराचे रहस्य
या रहस्यमयी मंदिराचे स्थापना नक्की कधी झाली याचा काही विशिष्ट कालावधी कोणालाही माहीत नाही. याचे कोणतेही प्रमाण पण उपलब्ध नाही. अनेक लोकांचा समज आहे की, साधारण 9 व्या अथवा 10 व्या शतकात या मंदिराची स्थापना करण्यात आली असावी. अनेकदा पुरातत्व विभागाने या रहस्यमयी तथ्य उलगड्याचा बराच प्रयत्न केला. पण कोणालाही याची योग्य माहिती मिळाल्याचे आजपर्यंत ऐकिवात नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या छतावरून नक्की पाणी कसे पडते याची कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. हा एक वेगळाच चमत्कार दिसून येतो. जशी ओडिसामधी जगन्नाथ मंदिरातून रथ यात्रा निघते तशीच येथेही निघते.
पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतातील अप्रतिम ठिकाणं (Places To Visit In Monsoon In Marathi)
बौद्ध स्तुपाप्रमाणे हे मंदीर
हे मंदिर आतून आणि बाहेरून एखाद्या विशाल बौद्ध स्तुपाप्रमाणे दिसते. पण या मंदिराच्या आत भगवान जगन्नाथाची मुख्य प्रतिमा आहे. या मूर्तीपासून ते अगदी या मंदिरापर्यंतचे निर्माण हे नागर शैलीत करण्यात आल्याचे सांगितले जाते. वास्तविक मंदिराचा काही भाग आता खंडर झाला आहे. पण आजही या मंदिरात पूजा करण्यासाठी अनेक भक्त येतात. या मंदिराच्या भिंती या साधारण 14 फूट उंच आहेत.
भारतात आजही आहेत अशा रहस्यमयी लेण्या, जाणून घ्या वैशिष्ट्य
कधी आले होते छतावरून पाणी
एका मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आले होते की, मागच्या वेळी या मंदिराच्या छतावरून 26 मे रोजी पाणी टपकणे सुरू झाले होते. जगन्नाथ मंदिराच्या या पाण्याच्या थेंबावरूनच परीक्षण करून या गावातील लोक शेती करतात आणि इतर ठिकाणीही याला मान्यता आहे. बऱ्याचदा या पाण्याच्या येण्यावरूनच मंदिरातील पूजा पाठ करून शेतीच्या कामाला सुरूवात केली जाते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक