मनोरंजन

सुशांतसिंह राजपूतच्या ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

Leenal Gawade  |  Jan 21, 2019
सुशांतसिंह राजपूतच्या ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

हिंदी मालिकेतून बॉलीवूडमध्ये आपले अस्तित्व निर्माण करणारा अभिनेता  सुशांतसिंह राजपूत आज ३३ वर्षांचा झाला आहे. सुशांतच्या करीअरचा मार्ग सोपा नव्हता. ‘किस देस मे हे मेरा दिल’ या मालिकेपासून त्याने सुरुवात केली. पण त्याच्या अभिनयाच्या करीअरला वेगळी ओळख दिली ती ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने. या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरात पोहचला ही मालिका कित्येक वर्षे सुरु होती.. आणि याच मालिकेतून त्याला बॉलीवूडला जाण्याची किल्ली सापडली. ‘काय पोछे’ त्याचा पहिला सिनेमा. नुकताच त्याचा केदारनाथ हा सिनेमा रिलीज झाला आणि आता तो दोन ते तीन सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. पण सुशांतसिंहच्या करीअरमध्ये असे अनेक ट्विस्ट आले ते तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे आहेत का? आम्ही तुमच्यासाठी सुशांतबद्दलच्या काही खास गोष्टी काढल्या आहेत. ज्या तुम्हाला प्रेरणा देऊ शकतील.

 अभिनयासाठी सोडले शिक्षण

अभिनयासाठी शिक्षण सोडलेले अनेक स्टार्स आपण आतापर्यंत पाहिले आहेत. सुशांतसिंह राजपूतनेदेखील आपले शिक्षण पूर्ण केले नाही. AIEEE या स्पर्धापरिक्षेत त्याने ७ वा क्रमांक पटकावला होता. मेकॅनिकल इंजिनीअरींचे शिक्षण घेत होता. पण शेवटच्या वर्षात त्याने अभिनय करायचा म्हणून शिक्षणाला राम राम केला. पण तो अभ्यासात हुशार होता. अनेक स्पर्धा परीक्षा त्याने उत्तीर्ण केल्या होत्या. आज सुशांत अभिनय क्षेत्रात नसता तर इ्ंजिनीअरींग क्षेत्रात नक्कीच मोठ्या पदावर कार्यरत असता.

मणिकर्णिकासाठी अंकिताने घेतली विशेष मेहनत

बॅकडान्सर म्हणून केले काम

सुशांतसिंहला डान्सची देखील आवड आहे. ‘पवित्र रिश्ता’मध्ये मुख्य भूमिका मिळण्याआधी तो डान्स कोरिओग्राफर शामक दावरकडे काम करत होता. त्याच्यासोबत त्याने अनेक अॅवार्ड शोमध्ये बॅकराऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. मालिकेतून ओळख मिळाल्यानंतर त्याने ‘झलक दिल ला जा’ या स्पर्धेत सहभागी होऊन आपले डान्सिंग मुव्हज लोकांना दाखवून दिले. पण प्रसिद्धीच्या आधी त्याने बॅक राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे, हे अनेकांना माहीत नसेल.

आता येतोय नरेंद्र मोदी यांच्यावर सिनेमा, हा अभिनेता साकारणार नरेंद्र मोदी

एम.एस. धोनीसाठी केली अतोनात मेहनत

सुशांतसिंह राजपूतला प्रसिद्धी मिळाली ती त्याने साकारलेल्या धोनीच्या भूमिकेतून. भारतीय क्रिकेटर एम.एस.सिंह धोनी याच्यावर तयार करण्यात आलेल्या बायोपिक अर्थात ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामुळे.सुशांतने धोनीची भूमिका साकारली होती. धोनीचा हेलिकॉप्टर शॉट हा प्रसिद्ध आहे. तो सहजासहजी करण्यासारखा नाही म्हणूनच सुशांतने याचा खूप सराव केला. दिवसातून २२५ वेळा क्रिकेट बॅटने तो त्याचा सराव करायचा. धोनीची भूमिका चांगली वठवण्यासाठी त्याने दीड वर्षे  घेतली आणि मग त्यानंतर जो सिनेमा तयार झाला. तो प्रेक्षकांच्या पसंतीला किती उतरला ते तर बॉक्स ऑफिसच्या गल्ल्यावरुनच कळाले.

असा मिळाला शुद्ध देसी रोमांस

शुद्ध देसी रोमांस या सिनेमातील त्याची भूमिका अनेकांच्या लक्षात राहिली. पण हा सिनेमा त्याच्या आधी शाहिद कपूरला ऑफर करण्यात आला होता. शाहिदने या सिनेमाची शुटींगदेखील सुरु केली होती. पण हा सिनेमा सुशांतच्या नशीबात होता त्यामुळे हा रोल त्याला मिळाला.

मार्शल आर्टचेही ज्ञान

सुशांत हा मल्टीटॅलेंडेंट आहे हे सांगायला नको. अभ्यास आणि अभिनयाव्यतिरिक्त त्याने मार्शल आर्टचेही धडे घेतले आहेत. राझ २ या सिनेमातील काही सीनसाठी त्याने मोहीत सुरी याला देखील असिस्ट केले आहे.

Read More From मनोरंजन