मनोरंजन

अभिनेत्री इशिता दत्ताने उघड केलं बेबी बम्प दिसण्यामागचं गुपित

Trupti Paradkar  |  Nov 9, 2020
अभिनेत्री इशिता दत्ताने उघड केलं बेबी बम्प दिसण्यामागचं गुपित

बॉलीवूड अभिनेत्री इशिता दत्ता सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. यामागचं कारण आहे तिने शेअर केलेला एक व्हिडिओ… काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती  गरोदर असल्याचं दिसत होतं. हा व्हिडिओ एका नामांकित कंपनीच्या जाहिरातीचा होता ज्यामध्ये इशिताकडे गुडन्यूज आहे आणि तिचा पती वत्सल शेठ आणि इतर मंडळी हा आनंद साजरा करत आहेत असं दाखवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे यात दीपिका पादुकोन आणि  रणवीर सिंहदेखील या दोघांना शुभेच्छा देताना दाखवण्यात आले आहेत.  हा व्हिडिओ इशिताने तिच्या सोशल मीडियावरून शेअर केल्यामुळे तिच्या  नातेवाईक आणि चाहत्यांनी त्या दोघांना या गुड न्यूजसाठी शुभेच्छा देण्यास सुरूवात केली. ज्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला. आता याबाबत स्वतः इशिताने तिचं मत मोकळेपणाने मांडलं आहे. 

काय म्हणाली इशिता…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इशिता दत्ताने तिच्या प्रेगनन्सीच्या बातम्या अफवा असल्याचं जाहीर केलं आहे. एवढंच  नाही तर जास्त प्रमाणात मिठाई खाण्यामुळे तिचं पोट वाढलं असून लोकांना ते बेबी बम्प वाटत आहेत असंही तिने सांगितलं आहे. तिने असंही म्हटलं आहे की मी शेअर केलेली जाहिरात पाहुन मला अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी गुडन्यूजच्या शुभेच्छा देत आहेत. ज्यामुळे आता मला ही गोष्ट जाहीरपणे सांगण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नाही. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे की  सर्वजण असा अंदाज का काढत आहेत. तर नातेवाईकांना याचं वाईट वाटतंय की मी ही गोष्ट त्यांच्यापासून लपवून का ठेवली. आता लोकांना मला नाईलाजात्सव हे सांगावं लागत आहे की माझं पोट जास्त मिठाई खाण्यामुळे मोठं दिसत आहे. आता मला यावर उपाय लवकरच करावा लागणार आहे. आता जिम पुन्हा सुरू झाले आहेत त्यामुळे मी नियमित वर्कआऊटला सुरूवात करणार आहे. ज्यांना मी गरोदर आहे असं वाटत आहे त्यांना मी एक महिना वर्क आऊट केल्यावर पुन्हा पुर्वीसारखी दिसू लागल्यावर ही गोष्ट नक्कीच पटेल.

Instagram

इशिता आणि वत्सल सेठ कधी देणार गुडन्यूज

इशिताने तिच्या  करिअरची सुरूवातत 2012 ला चानक्युडू या तेलुगू चित्रपटाने केली होती. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. इशिताला खरी ओळख दृष्यम या चित्रपटाने मिळाली होती. या चित्रपटात तिने अजय देवगनच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2016 साली सुपरहिट ठरला होता. ज्यामध्ये तब्बू, रजत कपूर आणि श्रिया सरन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटामुळे इशिता दत्ताचे नाव घरोघरी ओळखले जाऊ लागले. 2017 साली इशिताने वत्सल शेठसोबत लग्न केलं.  आता त्यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. त्यामुळे सर्वांना ही गुड न्यूज खरीच वाटू लागली. मात्र त्या दोघांनीही ही अफवा असून ते त्यांना एवढ्यात आईबाबा व्हायचं नाही असं सांगितलं आहे. 

Instagram

फोटोसौजन्य –

अधिक वाचा –

हेमामालिनी यांनी शेअर केला लक्ष्मी अवतार, खूप दिवस शोधत होत्या ‘हा’ फोटो

केएल राहुलने केला आथियाबरोबर फोटो पोस्ट, लवकरच स्वीकारणार का नाते याबाबत चाहते उत्साही

Bigg Boss 14: कविता कौशिकची पुन्हा एकदा एंट्री, राहुलला मिळाला प्रेक्षकांचा पाठिंबा

Read More From मनोरंजन