लाईफस्टाईल

जन्माष्टमीची तारीख, पूजा आणि विधी – इत्यंभूत माहिती

Dipali Naphade  |  Aug 26, 2021
janmashtami-2021

संपूर्ण भारतात आपण कृष्ण जन्माष्टमी हा महोत्सव अगदी मनापासून साजरा करतो. अनेकांच्या घरी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास केला जातो. रक्षाबंधननंतर येणारा श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमी (Janmashtami 2021). अष्टमीच्या दिवशी कृष्णाचा जन्म झाला म्हणूनच याला श्रीकृष्ट जन्माष्टमी असे म्हटले जाते. रात्रीच्या प्रहरी 12 वाजता श्रीकृष्णाने जन्म घेतला अर्थात विष्णून श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेतला असे पूर्वपरंपरागत समजण्यात येते. यावर्षी सोमवार, 30 ऑगस्ट, 2021 रोजी कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे. संपूर्ण देशात कोरोना व्हायरस जरी असला तरीही कृष्णोत्सव साजरा करण्यात येणारच. अनेक मंदिरामध्ये आणि अगदी घरांमध्येही हा उत्सव खूपच उत्साहात साजरा केला जातो, जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिल्या जातात. जन्माष्टमीची पूजा कशी करावी आणि त्याचे नक्की काय विधी आहेत हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचायला हवा.

जन्माष्टमीच्या पूजेचा मुहूर्त

Janmashtami 2021

अष्टमी तिथी 29 ऑगस्ट रोजी रात्रौ 11.25 पासून सुरू होत असून 30 ऑगस्ट, 2021 रोजी रात्रौ 01.59 पर्यंत अष्टमी ही तिथी आहे. त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त म्हणून (Janmashtami Puja Shub Muhurt) तुम्ही 30 ऑगस्ट, 2021 रोजी रात्रौ 12 ते 12.44 पर्यंत वापरू शकता. पूजेसाठी हा कालावधी केवळ 45 मिनिट्सचा आहे. कृष्ण जन्माष्टमीचा शुभ काळ हा असून तुम्ही या पाऊण तासात कृष्णाची पूजा अगदी शोडषोपचारे करू शकता. या दिवशी अनेक घरांमध्ये कृष्णाला नवे वस्त्र घालून त्याला सजवतात आणि झोपाळ्यात बसवून त्याची पूजा केली जाते. तसंच घरातील लहान मुलांनाही कृष्णाचे कपडे घालून त्यांचीही पूजा केली जाते. तसंच रात्री कृष्णाच्या जन्मानंतर ज्यांचा उपवास असेल त्या व्यक्ती आपला उपवास कृष्णाचे दर्शन घेऊन सोडतात.

जन्माष्टमीचा विधी (Janmashtami Puja Vidhi)

एका चौरंगावर लाल कपडा घालून भगवान कृष्णाची लहान मूर्ती अथवा बाळकृष्णाची मूर्ती एका थाळीमध्ये अथवा तामन असेल तर त्यामध्ये ठेवण्यात येते. त्यानंतर कृष्णाला आंघोळ घालून त्याला स्वच्छ करण्यात येते आणि त्यानंतर त्याला नवे वस्त्र चढवून त्याच्यासमोर धूप – दीप – अगरबत्ती लावण्यात येते. कृष्णाला आवडणाऱ्या पदार्थांचा नेवैद्य दाखवून सर्वांना हा प्रसाद म्हणून वाटण्यात येतो. तसंच कृष्णाची आरती करण्यात येते. 

काही ठिकाणी कृष्णाच्या मूर्तीला पंचामृती स्नान घालण्यात येते आणि मग गंगाजलचा वापर करून पुन्हा एकदा स्नान घालण्यात येते. त्यानंतर कृष्णाला नवे कपडे घालून संपूर्ण सजवण्यात येते. त्याची झोपाळ्यात घालून गंध, फूल आणि धूप – दीपाने पूजा करण्यात येते. यावेळी कृष्णाला अष्टगंध आणि तांदूळाच्या अक्षता लावण्यात येतात. शुद्ध आणि पवित्रता जपण्यासाठी पूजेच्या वेळी या गोष्टी करण्यता येतात. त्यानंतर लोणी, साखर, मध अशा कृष्णाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवण्यात येतो. तर काही ठिकाणी कृष्णाला 56 भोग अर्थात पक्वानांचा नेवैद्य दाखविण्यात येतो. सर्वात शेवटी घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत कृष्णाला फुलं वाहून त्याचा आशीर्वाद कायम आपल्यासह राहावा यासाठी प्रार्थना करतात. 

भारतामध्ये विविध ठिकाणी कृष्ण जन्माष्टमी वेगवेगळ्या स्वरूपात साजरी करण्यात येते आणि तितक्यात उत्साहात दुसऱ्या दिवशी कृष्णाचा आवडता गोपाळकाला अर्थात दहीहंडीचा उत्सवही साजरा करण्यात येतो. गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचे महत्त्व तुम्हाला माहीतच आहे.  तुम्हालाही यावर्षीचा मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही या लेखातून नक्की जाणून घ्या.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From लाईफस्टाईल