मनोरंजन

‘झलक दिखला जा 10’ मध्ये दिसणार हे आवडते कलाकार, लवकरच येणार रियालिटी शो भेटीला

Dipali Naphade  |  Jul 24, 2022
jhalak-dikhhla-jaa-season-10-first-episode-may-go-on-air-in-september-more-details-in-marathi

अनेक रियालिटी शो येतात आणि जातात पण काही रिलालिटी शो हे प्रेक्षकांचे इतके आवडते असतात की, त्यांचे अनेक सीझन येत असतात आणि त्यापैकी एक आवडता रियालिटी शो म्हणजे ‘झलक दिखला जा’ (Jhalak Dikhhla Jaa). या शो चा दहावा सीझन येत आहे आणि त्यामुळे या सीझनमध्ये कोणकोणते कलाकारा सहभागी होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. सप्टेंबर 2022 पासून हा शो सुरू होणार असल्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो आला नव्हता. पाच वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा हा शो ऑन एअर होत आहे. लहान पडद्यावरील अनेक प्रसिद्ध चेहरे यामध्ये सहभागी होऊन आपल्या डान्सिंगने परीक्षकांना आणि प्रेक्षकांनाही आपल्या प्रेमात पाडतात. यावर्षी नक्की कोणकोणते कलाकार सहभागी होऊ शकतात याबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

डान्स परफॉर्मन्समधून जिंकतात कलाकार मन 

Jhalak Dikhhla Ja Season 10

झलक दिखला जा या रिलायलिटी शो मधून टीव्हीवरील अनेक कलाकार सहभागी होताना दिसतात. तर याच शो नंतर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मोठा पडदा प्रचंड गाजवला आणि त्यातील एक नाव म्हणजे सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput). तर इतरही अनेक कलाकारांची नावं घेता येतील. चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांना परफॉर्मन्स देताना पाहायला खूपच आवडतं आणि त्यामुळेच हा शो नेहमीच चाहत्यांचा आवडता शो ठरला आहे. 10 व्या सीझनमध्ये निया शर्मा (Nia Sharma), धीरज धूपर (Dheeraj Dhooper), निती टेलर (Niti Taylor) अशी काही नावं सध्या समोर येत आहेत. पण यावर अजूनही शिक्कामोर्तब झाल्याचे ऐकिवात नाही अथवा यापैकी कोणत्याही कलाकारांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. 

निया शर्माने आतापर्यंत मालिकांमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. एक हजारों में मेरी बहना है, नागिन, जमाई राजा या मालिकेतून तिला खूपच प्रसिद्धी मिळाली. याशिवाय अनेक रियालिटी शो मधूनही नियाने आपली ओळख निर्माण केली. तर धीरज धूपरने नुकतेच ‘कुंडली भाग्य’ (Kundli Bhagya) या मालिकेला राम राम ठोकला आहे आणि नव्या मालिकेचे चित्रीकरणही सुरू केले आहे. त्याशिवाय लवकरच खऱ्या आयुष्यात धीरज बाबा होणार आहे. तर अनुपमा (Anupama) या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार पारस कलनावत (Paras Kalnawat) देखील या शो मध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अनुमपा ही अत्यंत प्रसिद्ध मालिका असून टीआरपीच्या रेसमध्ये कायम सध्या क्रमांक एक वर आहे. त्यामुळे पारस या रियालिटी शो मध्ये सहभागी होण्याकरिता ही मालिका सोडणार का असाही त्याच्या चाहत्यांना प्रश्न आहे. पण जोपर्यंत शो चे प्रोमो येत नाही तोपर्यंत काहीच निश्चित असू शकत नाही. याशिवाय हरभजन सिंह, हिना खान, टोनी कक्कर, अली असगर हे प्रसिद्ध चेहरेही दिसणार असल्याची सध्या चर्चा आहे. 

माधुरी, नोरा आणि करण परीक्षक 

माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit Nene), करण जोहर (Karan Johar) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) हे या शो साठी परीक्षक म्हणून काम पाहणार आहे. नोरा स्वतः या शो मध्ये स्पर्धक होती. तर माधुरी आणि करणने यापूर्वीही या शो चे परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. असे असले तरीही अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सध्या या शो बाबत रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर यावी असं या शो च्या चाहत्यांना नक्कीच वाटत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन