बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम काही काळापासून त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. सध्या तो ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत अर्जुन कपूर, तारा सुतारिया आणि दिशा पटानी हे कलाकार दिसणार आहेत. त्याचबरोबर आता जॉनने त्याच्या पुढील चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. जॉन लवकरच ‘तेहरान’ या ऍक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. त्याने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून आता या चित्रपटातील जॉनचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.
ट्विटरवर शेअर केला व्हिडीओ
जॉन अब्राहमच्या पुढील चित्रपटाची घोषणा करताना, मॅडॉक फिल्म्सने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये जॉनचा फर्स्ट लूक दिसतो आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये जॉन अतिशय दमदार एक्सप्रेशनमध्ये दिसत आहे आणि त्याचा लूक कोणालाही घाबरवण्यासाठी पुरेसा आहे. जॉनचा फर्स्ट लूक शेअर करताना मॅडॉक फिल्म्सने ट्विटरवर लिहिले की, “लाइट्स, कॅमेरे आणि थोड्या ऍक्शनसह, तेहरानमध्ये शूटिंग सुरू होत आहे.” जॉनने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.
सत्य घटनांवर आधारित तेहरान
जॉनचा आगामी ऍक्शन थ्रिलर चित्रपट तेहरान हा सत्य घटनांवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण गोपालन करत असून त्याचे चित्रीकरण इराणमध्ये होणार आहे. या चित्रपटाचे लेखन रितेश शाह आणि आशिष प्रकाश वर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे. जॉनने मागेच या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की होते, तो इराणमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि हा एक उत्तम चित्रपट असेल.”
जॉन इंटेन्स लूकमध्ये दिसला
जॉनने तेहरानच्या फर्स्ट लूक व्हिडिओ इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. या लूकमध्ये जॉन इंटेन्स लूकमध्ये दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी जॉन’अटॅक’ या चित्रपटात दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र, हा चित्रपट आता ओटीटीवर आला आहे. तसेच जॉन आता ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्येही दिसणार आहे, जो 29 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि जॉनसोबत दीपिका पदुकोण देखील आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होत आहे. म्हणजेच जॉनचा चित्रपट ‘तेहरान’ आणि शाहरुखच्या ‘पठाण’मध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे.
तेहरान -एक जिओ-पॉलिटिकल चित्रपट
या चित्रपटाबद्दल बोलताना, जॉनने एप्रिलमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “मद्रास कॅफे, बाटला हाऊस आणि परमाणू यांच्याप्रमाणेच हा चित्रपट देखील विशेष आहे. हा एक जिओ- पॉलिटिकल चित्रपट असेल. तेहरानचे शूटिंग सुरू करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. इराणमध्ये शूटिंग करणारा मी कदाचित भारताबाहेरील पहिला अभिनेता असेल. मी तिथे जाण्यासाठी खूप उत्सुक आहे.” तो पुढे म्हणाला की त्याच्या आईचे इराणमध्ये अनेक नातेवाईक आहेत आणि म्हणून ती तिला शूटिंगला बरोबर घेऊन जाईल. “जर तुम्हाला रशिया-युक्रेनच्या लढाईत रस असेल तर विचार करा की चीन काय करत आहे, इराण काय करत आहे, या संपूर्ण गोष्टीत पॅलेस्टाईन कुठे बसतो, तेहरान हा चित्रपट या सर्व गोष्टींबद्दल आहे. हा एक जबरदस्त चित्रपट आहे”, असेही तो म्हणाला.
हा चित्रपट प्रेक्षकांना किती भावतो हे येत्या प्रजासत्ताक दिनी कळेलच.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje