बॉलीवूड

पतौडी पॅलेसमध्ये स्पॅनिश शिकत आहे तैमूर, शेअर केले क्यूट फोटो

Trupti Paradkar  |  Oct 6, 2020
पतौडी पॅलेसमध्ये स्पॅनिश शिकत आहे तैमूर, शेअर केले क्यूट फोटो

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान करिना कपूर आणि तैमूरसोबत काही दिवसांपू्र्वीच मुंबई एअरपोर्टवर दिसले होते. ऑगस्ट महिन्यात सैफच्या पन्नासाव्या वाढदिवशी सैफीनाने ते दोघं पुन्हा एकदा आई-बाबा होणार असं जाहीर केलं आणि सर्वांच्याच नजरा करिनाच्या होणाऱ्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाकडे लागल्या. सध्या करिना दुसऱ्यांदा गरोदर असल्याने आणि लॉकडाऊनमुळे सैफच्या चित्रपटाचं शूटिंग बंद सध्या बंद असल्यामुळे ते दोघंही तैमूरसोबत काही दिवस क्वॉलिटी टाईम स्पेंड करण्यासाठी पतौडी पॅलेसमध्ये रवाना झाले आहेत. हरियाणातील गुरगावमध्ये सैफचा खानदानी ‘पतौडी पॅलेस’ आहे. सैफ आणि करिना बऱ्याचदा आराम करण्यासाठी या ठिकाणी जात असतात. राजेशाही थाटात काही दिवस आराम करून मग करिना पुन्हा एकदा तिच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करण्यासाठी दिल्लीला जाणार आहे. करिनाला आता पाचवा महिना सुरू आहे. त्यामुळे तिला सध्या आरामाची नक्कीच गरज आहे. मात्र या काळातही ती तिचा मोठा लेक तैमूरकडे मुळीच दुर्लक्ष करत नाही. तैमूर लॉकडाऊनमध्ये कंटाळू नये यासाठी तिने त्याला स्पॅनिश शिकवण्याचा घाट घातला आहे. तैमूरला रितसर स्पॅनिश शिकवण्यासाठी खास टीचरची नेमणूकही करण्यात आली आहे. नुकतंच करिनाने पतौडी पॅलेसमधून तैमूर आणि त्याच्या स्पॅनिश टीचरसोबत केलेलं फोटोसेशन इंन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. लहान वयातच तैमूरचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे तैमूरविषयी जाणून घेण्यासाठी सर्वच नेहमी उत्सुक असतात. तैमूरच्या या क्युट फोटोंवर इंन्स्टाग्रामवर लाईक्स आणि कंमेट्सचा पाऊसच पडत आहे. 

Instagram

तैमूर शिकत आहे स्पॅनिश

कोरोनाच्या  काळात मन रमवण्यासाठी करिना आणि सैफचा लाडका लेक तैमूर सध्या स्पॅनिश भाषा शिकत आहे.  खरंतर तो आता फक्त तीनच वर्षांचा आहे. मात्र करिना त्याला याच वयात निरनिराळ्या भाषेमध्ये पारंगत केलं जात आहे. करिना तैमूरच्या प्रत्येक गोष्टीबाबत जातीने लक्ष घालते. त्याने कसं  वागावं आणि काय खावं  याबाबत ती कटाक्षाने काही नियम पाळते. मुंबईत असताना तैमूर स्पॅनिशचे ऑनलाईन शिक्षण घेत होता. आता मात्र पतौडी पॅलेसमध्ये गेल्यावर त्याला त्याच्या टीचरकडून स्पॅनिशचे धडे मिळत आहेत. कारण तैमूरला शिकवण्यासाठी त्याची टीचर एशलीन एस जॉली स्वतः गुरूग्रामला पतौडी पॅलेसमध्ये गेलेली आहे. तैमूरची टीचर एशलीने तैमूरसोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत सांगितलं आहे की, “शेवटी मी माझ्या स्पॅनिश विद्यार्थ्याला भेटली तेही ऑफस्क्रीन!” यासोबत एशलीनने हार्ट इमोजीही शेअर केले आहेत. तैमूरही त्याच्या टीचरला पाहून खूपच खुश झाला आहे. निरनिराळ्या फोटो पोझ देत त्याने पतौडी पॅलेसमध्ये टीचरसोबत फोटोसेशन केलं आहे. एका फोटोमध्ये करिनानेही टीचरसोबत फोटो काढला आहे. ज्यामध्ये करिनाचा पाचवा महिना सुरू असल्याने तिचे बेबी बंम्प दिसत आहेत. करिनाने या फोटोंमध्ये हिरवा, काळा आणि पांढऱ्या रंगाचा कप्तान घातलेला आहे. बॅकग्राऊंडला त्यांचा खानदानी पतौडी पॅलेसही दिमाखात दिसत आहे. 

Instagram

फोटोसौजन्य – इंन्स्टाग्राम

अधिक वाचा –

अक्षय कुमारच्या पावलावर पाऊल टाकत आहे आरव, ट्विंकलने शेअर केली ही खास गोष्ट

अखेर सहा महिन्यानंतर मल्टीप्लेक्स आणि थिएटर उघडणार

या महिन्याच्या शेवटी नेहा कक्कर अडकणार विवाहबंधनात, चर्चांना आलंय उधाण

Read More From बॉलीवूड