बॉलीवूड

करिश्मा कपूरचा कमबॅक, अभिनेत्री नाही दिसणार निर्मातीच्या भूमिकेत

Trupti Paradkar  |  Sep 10, 2020
करिश्मा कपूरचा कमबॅक, अभिनेत्री नाही दिसणार निर्मातीच्या भूमिकेत

बॉलीवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारी अभिनेत्री करिश्मा कपूर अनेक वर्षांपासून बॉलीवूडपासून दूर गेली होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करिश्मा कपूर लवकरच कमबॅक करत आहे. चित्रपटांपासून एवढी वर्ष दूर असलेल्या करिष्माने मागच्या वर्षी एकता कपूरच्या वेबसिरिज मेंटलहूडमधून डिजीटल डेब्यू केला होता. मात्र यातून तिला हवं तसं यश मिळू शकलं नाही. म्हणूनच करिष्मा आता अभिनेत्री नाही तर थेट निर्मातीच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

Instagram

कसा असेल करिश्माचा हा नवा प्रवास –

करिश्मा लवकरच ओटीपी प्लॅटफॉर्मवर एक शो घेऊन येणार आहे. ज्याची ती स्वतःच निर्माती असेल. यासाठी करिश्माने जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती तिने मिडीयाला शेअर केलेली नाही. ती या माध्यमासाठी एका ओरीजनल कंटेटच्या शोधात आहे. करिष्माच्या कुटुंबाकडून तिला निर्माती होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. कदाचित तिची बहीण करिना कपूरही तिच्या सोबत सह- निर्माती असेल. ज्यामुळे या दोघी बहिणी मिळून आता निर्मातीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सध्या करिना कपूर गरोदर आहे. त्यामुळे ती पुढचे एक ते दोन वर्ष अभिनय करू शकत नाही. या वेळात सक्रीय राहण्यासाठी आणि बहिणीच्या करिअरला मदत करण्यासाठी करिना करिश्मासोबत निर्माती होणार आहे. याबाबत कोणतेही प्लॅनिंग त्यांनी अजून जाहीर केले नसले तरी ही माहिती कपूर कुटुंबाच्या सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यामुळे लवकरच या दोघींनी निर्मातीच्या भूमिकेत पाहायला मिळणार हे नक्की. 

Instagram

करिश्माचा करिश्मा –

करिश्मा कपूरने प्रैमकैदी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आणि नंतर एका पाठोपाठ एक हिट चित्रपटांमध्ये  काम केलं. गोविंदा आणि करिश्माच्या जोडीने एकेकाळी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं.तिला बॉलीवूडमध्ये प्रेमाने लोलो असं म्हटलं  जायचं आजही करिशमाचे चाहते अनेक आहेत. हिरो नं 1 , अनाडी,  साजन चले ससुराल, बीबी नं 1, साजन चले ससुराल, दिल तो पागल है, फिजा, जुबैदा अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये करिश्माने काम केलेलं आहे. मात्र तिने 2003 मध्ये संजय कपूर या बिझनेसमेनशी लग्न केलं आहे बॉलीवूडपासून दूर झाली. मात्र दोन मुलांच्या जन्मानंतर आणि प्रचंड वादविवादानंतर तिने संजय कपूरला घटस्फोट दिला. आता करिश्मा तिच्या मुलांचे एकटीच संगोपन करत आहे. करिना आणि कपूर फॅमिली नेहमीच तिच्या पाठीशी ठामपणे उभी असते.2012 साली तिने डेंजरस इश्क या चित्रपटात काम केलं त्यानंतर ती पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसली नाही. करिश्माने पुन्हा तिच्या करिअरमध्ये पाय रोवून घट्ट उभं राहावं यासाठी ते तिच्या कमबॅकला प्रोत्साहन देत आहे. मागच्या वर्षी मेंटलहूड या वेबसिरिजमधून तिच्या अभिनयाची जादू पूर्वीप्रमाणे चालली नसली तरी ती या क्षेत्रात निर्मातीच्या भूमिकेत नक्कीच पुढे जाऊ शकते. आता करिश्मा खरंच हे आव्हान स्वीकारणार का हे येणारा काळच सांगू शकेल.  

 

 

Instagram

मेंटलहूडमध्ये करिश्माची काय होती भूमिका

ऑल्ट बालाजीच्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर मागच्या वर्षी मेंटलहूड वेबसिरिज प्रदर्शित झाली होती.  या वेबसिरीजमधून जीवनाशी संघर्ष करत जगणाऱ्या पाच मातांची कहाणी उलगडण्यात आली होती. अमेरिकेतील टीव्ही सिरिज प्रिटी लिटील लायर्स वर ही कथा आधारित होती. ‘मेंटलहुड’मध्ये करिश्माने एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. मात्र या वेबसिरिजला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

दीपिका पादुकोण गोव्याला रवाना, या आगामी चित्रपटाचं शूटिंग होणार सुरू

दोन वर्षांच्या आत ‘कसौटी जिंदगी की’ मालिका गुंडाळणार गाशा

‘बधाई हो’ मधील अभिनेत्री रुग्णालयात दाखल, ब्रेन स्ट्रोकचा त्रास

Read More From बॉलीवूड