घर आणि बगीचा

इंडक्शन शेगडीवर स्वयंपाक करताना या गोष्टी ठेवा लक्षात

Trupti Paradkar  |  Nov 9, 2021
Keep these things in mind while cooking on induction stove in Marathi

आधुनिक जीवनशैलीसोबत घर आणि स्वयंपाक घरही सध्या अपडेट होऊ लागलं आहे. गॅसच्या तुलनेत सुरक्षित आणि सोपा पर्याय म्हणून इंडक्शन शेगडी वापरण्यास सुरूवात झाली आहे. या शेगडीवर स्वयंपाक पटकन होतो आणि अन्न शिजवताना तुम्हाला गरमही होत नाही. कारण इंडक्शन शेगडी सुरू असताना तुम्ही किचनमध्ये फॅन, एसी सुरू ठेवू शकता. इंडक्शन शेगडी स्वच्छ करणंही खूप सोपं असतं. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या किचनसाठी इंडक्शन शेगडीची निवड केली असेल तर या गोष्टी जरूर वाचा.

किचनसाठी हॉब खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

इंडक्शन शेगडी वापरताना काय काळजी घ्यावी 

इंडक्शन शेगडी वीजेवर चालणारे उपकरण आहे. त्यामुळे जर तुम्ही ती नीट वापरली नाही तर ती लवकर खराब होऊ शकते.

इंडक्शनवर वापरण्याची भांडी 

इंडक्शन शेगडी वापरताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे इंडक्शनवर तुम्ही कोणती भांडी वापरत आहात. इंडक्शन शेगडीसाठी आजकाल बाजारात सर्व प्रकारचे इंडक्शन कुकवेअर विकत मिळतात. जर तुम्ही योग्य प्रकारची भांडी या शेगडीवर वापरली नाही तर तुम्हाला स्वयंपाक करताना नक्कीच अडचणी येऊ शकतात.

स्वयंपाघरातील तेलकट, चिकट डाग असे करा कमी

स्वच्छता

शेगडी कोणतीही असो स्टील, हॉब अथवा इंडक्शन. तुम्ही शेगडी कशी स्वच्छ करता यावर ती किती काळ टिकणार हे ठरत असतं. अनेकींना असं वाटतं इंडक्शन शेगडी नेहमी स्वच्छ केली तर ती लवकर खराब होईल. मात्र हे बरोबर नाही. भारतीय स्वयंपाक करताना शेगडी खूप खराब होते. त्यामुळे स्वयंपाक झाल्यावर शेगडी नियमित स्वच्छ करायला हवी. विशेष म्हणजे इंडक्शन शेगडी स्वच्छ करणं अतिशय सोपं काम आहे. साध्या ओल्या फडक्यानेही तुम्ही इंडक्शन शेगडी स्वच्छ करू शकता. इंडक्शन शेगडीच्या खालील  आणि वीज कनेक्शनकडील भाग तुम्ही कोरड्या ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. 

घर खरेदी करण्यापूर्वी स्वतःला विचारा हे प्रश्न आणि मग घ्या निर्णय

वजनदार भांडी ठेवू नका 

इंडक्शन शेगडी ही काचेची असते. सहाजिकच या शेगडीमध्ये जास्त वजन पेलण्याची क्षमता नसते. त्यामुळे जर तुम्ही या शेगडीवर क्षमतेपेक्षा मोठी भांडी ठेवली तर काच फुटण्याची शक्यता असते. यासाठी नेहमी इंडक्शनच्या क्षमतेनुसार वजनाची भांडीच वापरा. 

या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर इंडक्शन वापरणं अतिशय सोपं आणि सुरक्षित आहे. त्यामुळे या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला जरूर कंमेटमधून कळवा.

Read More From घर आणि बगीचा