रोहित शेट्टी (Rohit Shetty) निवेदक करत असलेला खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi) हा रियालिटी शो म्हणजे सर्वांसाठीच पर्वणी असते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत नेहमीच दरवर्षी या शो ची आतुरतेने वाट पाहतात. गेल्या 45 दिवसांपासून या शो चे साऊथ आफ्रिकेतील केपटाऊन येथे (Capetown, South Africa) चित्रीकरण चालू होते. सोमवारी (21 जून) रोजी चित्रीकरणाचा शेवटचा दिवस संपवून सर्व स्पर्धक पुन्हा एकदा भारतात रवाना झाले आहेत. यावर्षी खतरों के खिलाडीचे 11 वे पर्व असून यावर्षी कोणता कलाकार वरचढ ठरणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर या पर्वाचा पहिलाच प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. सर्वांचा आवडता गायक आणि बिग बॉसचा 14 वा सीझन गाजवणारा मराठमोळा राहुल वैद्य (Rahul Vaidya) याच्यावर चित्रीत करण्यात आलेला हा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोला तुफान प्रतिसाद मिळाला असून राहुल नक्की आपली भीती कशी काय शो मधून काढणार, राहुल हरणार की जिंकणार या सगळ्याचीच उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे.
‘बिग बॉस मराठी 3’ चे दरवाजे उघडणार आणि एकच आवाज घुमणार!
राहुलचा मुकाबला सिंहांशी
पहिल्याच प्रोमोमध्ये राहुल सिंहांसमोर गात असलेला दिसून येत आहे. तर पाण्यात राहुलची झालेली बिकट अवस्था हा सीझन कसा असणार आहे याचा अंदाज देत आहे. दरवर्षी हा शो कलाकारांची पुरती परीक्षा घेत असून रोहित शेट्टी सर्वच कलाकारांना प्रोत्साहन देताना दिसून येतो. या शो चा फॉरमॅट हा लहान मुलांपासून अगदी वयस्कर सर्वांनाच आवडतो. त्याचमुळे दरवर्षी या शो मध्ये कोण सहभागी असणार आणि कशा प्रकारे वेगवेगळे स्टंट करणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते. राहुल वैद्यला बिग बॉसमध्ये अनेक टास्क करताना सर्वांनीच पाहिले होते. कोणत्याही गोष्टी मध्ये आपलं मत बिनधास्त मांडणारा राहुल स्टंट आणि इतर टास्क या शो मध्ये कसे करणार हेच त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पाहायचं आहे. राहुलने कधीच आतापर्यंत माघार घेतलेली नाही. तर हा राहुलचा अजून एक रियालिटी शो आहे. बिग बॉसमध्ये राहुल वैद्य दुसऱ्या क्रमांकावर राहिला असला तरीही त्याने प्रेक्षकांचं मन मात्र जिंकून घेतलं होतं. तर आता या सगळ्या स्टंटमध्ये राहुलने किती बाजी मारली आहे आणि हा शो तरी राहुल जिंकेल की नाही याची उत्सुकता सर्वांनाच आहे. तर दिव्यांकाच्या प्रोमोमध्ये तिने मगर हातात घेतली आहे आणि निक्की तांबोळी घाबरल्यावर रोहित शेट्टीने तिची मस्करी केलेला प्रोमोही प्रसारित झाला आहे.
आमच्यात तसं काहीही नाही तेजश्रीने केला त्या फोटोवरुन खुलासा
11 स्पर्धक झाले सहभागी
नुकताच पहिला प्रोमो आला असून ही तर सुरूवात आहे आणि राहुल इथे तुझं गाणं चालणार नाही असा इशारा दिग्दर्शक आणि स्टंट मास्टर रोहित शेट्टीने प्रोमोमध्ये दिला आहे. यावरूनच इतर स्पर्धकांची काय स्थिती असेल याचा अंदाज लावता येत आहे. राहुल वैद्यसह या स्पर्धेत अन्य कलाकारांनीही सहभाग घेतला असून अर्जुन बिजलानी, विशाल आदित्य सिंह, वरूण सूद, श्वेता तिवारी, दिव्यांका त्रिपाठी दहिया, सना मकबूल, निक्की तांबोळी, आस्था गिल, अभिनव शुक्ला, अनुष्का सेन अशी या कलाकारांची नावे आहेत. दरम्यान या सीझनमध्ये कोणत्या कलाकाराने बाजी मारली आहे हे नाव मात्र गुलदस्त्याच आहे. त्यामुळे आता जेव्हा हा रियालिटी शो प्रसारित करण्यात येईल तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच ताणून धरली जाणार आहे.
‘खतरों के खिलाडी’च्या स्पर्धकाला झाला कोरोना, चित्रीकरण थांबले
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade