आजकाल पैशांची बचत ही आपली सर्वात मोठी गरज आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत पैसे वाचवणे या गोष्टीला आपण प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. असं म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे. पैसे वाचवण्यासोबतच खर्च केल्यामुळेही चांगली बचत करता येते. आपण मनात कितीही खर्च कमी करण्याचा विचार केला तरी मेकअप साहित्य, ब्युटी प्रॉडक्ट पाहीले की मन आवरणं कठीण जातं. यासाठीच या मेकअप टिप्स फॉलो करा ज्यामुळे तुमचा मेकअपवर जास्त खर्च होणार नाही.
खरेदीपूर्वी मनाला हा प्रश्न विचारा –
शॉपिंगला गेल्यावर अथवा ऑनलाईन शॉपिंग करताना समोर दिसतंय म्हणून अनेक उत्पादने खरेदी केली जातात. मात्र बऱ्याचदा ती तुमच्या उपयोगाचीच नसतात. कधी कधी एखादे उत्पादन आपण फक्त एक अथवा दोनवेळाच वापरतो. मार्केटिंग स्कीम्स, सेल आणि आकर्षक पॅकेजिंगमुळे तुम्हाला या वस्तूंची भुरळ पडते. त्यामुळे एखादी मेकअपसाठी लागणारी वस्तू खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला या उत्पादनाची खरंच गरज आहे का हा प्रश्न मनाला विचारा. ज्यामुळे अनावश्यक वस्तू खरेदी करणं कमी होईल आणि तुमचे पैसे वाचतील. त्याचप्रमाणे तुमच्याकडे असलेले प्रॉडक्ट संपल्याशिवाय ते दुसऱ्यांदा खरेदी करू नका. असं केल्यामुळेही तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवता येईल.
Shutterstock
खरेदी करण्यापूर्वी टेस्ट घ्या –
कोणतेही मेकअपचे प्रॉडक्ट वापण्यापूर्वी त्याची टेस्ट घेणं नेहमीच फायद्याचं ठरू शकतं. मार्केटमध्ये सर्व उत्पादनांचे टेस्टर उपलब्ध असतात. घाबरू नका कारण स्टोअरमधील हे टेस्टर्स वापरणं धोक्याचं नसतं. एकदा वापर झाल्यावर दुकानदार अथवा सेल करणारी व्यक्ती हे प्रॉडक्ट पुन्हा स्वच्छ करून ठेवतात. बऱ्याचदा आपण घाईघाईत टेस्ट न करता चुकीची लिपस्टिक शेड, फाऊंडेशन, कन्सिलर अथवा नेलपेंट विकत घेतो. यासाठीच तुम्ही ते प्रॉडक्ट विकत घेण्यापूर्वी त्याची टेस्ट घेणं आवश्यक आहे.
Shutterstock
एकाच उत्पादनाचा निरनिराळ्या प्रकारे वापर करा –
ब्युटी प्रॉडक्ट कसे वापरावेत याचा कोणताही ठराविक नियम कधीच नसतो. त्यामुळे एकाच ब्युटी प्रॉडक्टचा तुम्ही निरनिराळ्या कारणांसाठी वापर करू शकता. जसे की जर तुम्ही वारंवार ब्लश वापरत नसाल तर ब्लश विकत घेण्याऐवजी पिच लिपस्टिकचा वापरा. निरनिराळ्या लिपस्टिक शेड्सचा वापर तुम्ही तुमच्या आयशॅडोसाठीदेखील करू शकता. ज्यामुळे गरज नसलेल्या अथवा एकदा अथवा दोनदा वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर तुमचे कमी पैसे खर्च होतील.
Shutterstock
आकर्षणाला बळी पडू नका –
बऱ्याचदा एखाद्या सेलिब्रेटीने वापरलेली लिपस्टिक शेड अथवा मेकअपचं इतर साहित्य तुम्हालाही हवं असतं. या आकर्षक गोष्टी नेहमीच तुम्हाला भुरळ पाडतात. मात्र असा सेलिब्रेटी लुक मिळवण्यासाठी पैसेदेखील जास्त खर्च करावे लागतात. त्याऐवजी त्या शेडच्या वस्तू कमी खर्चात आणि उत्तम दर्जात तुम्हाला इतर ब्रॅंडमध्ये मिळतात का ते शोधा. ज्यामुळे तुमची इच्छाही पूर्ण होईल आणि खर्चही कमी होईल.
सेल ऑफरवर लक्ष ठेवा –
एखाद्या ब्रॅडेड उत्पादनासारखे दुसरे तुम्हाला कुठेच सापडू शकत नाही. अशा वेळी त्या प्रॉडक्टवर लागणाऱ्या सेल ऑफरकडे लक्ष ठेवा. ज्यामुळे तुम्हाला हवे असणारे महागडे मेकअप प्रॉडक्ट तुम्हाला कमी पैशातही विकत घेता येईल. सध्या ऑनलाईन शॉपिंगचा ट्रे़ंड आहे. त्यामुळे अशा सेल ऑफर तुम्हाला पटकन कळू शकतात.
Shutterstock
मेकअप रिमूव्हरच्या जागी नैसर्गिक वस्तूंचा वापर करा –
जर तुम्हाला नियमित मेकअप करण्याची सवय असेल. तर तुम्हाला मेकअप काढण्यासाठी रिमूव्हरही मोठ्या प्रमाणावर वापरावे लागते. रिमूव्हरवर भरमसाठ खर्च करण्याऐवजी तुम्ही काही नैसर्गिक वस्तूंचा वापर करू शकता. नारळाचे तेल अथवा कोणतेही बेबी ऑईल मेकअप काढण्यासाठी उत्तम असते. अशा प्रकारे घरी असणाऱ्या वस्तू वापण्यामुळे तुमचे पैसे नक्कीच वाचतील.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
चष्मा लावणाऱ्या मुलींसाठी मेकअप टिप्स, डोळे दिसतील अधिक सुंदर
भारतीय त्वचेसाठी सर्वोत्तम कन्सिलर (Best Concealer For Indian Skin)
तेलकट त्वचेसाठी बेस्ट फाऊंडेशन (Best Foundation For Oily Skin In Marathi)
Read More From Make Up Products
आमच्या 8व्या वाढदिवसानिमित्त एपिक सेलमध्ये लुटा शॉपिंगची मजा, घ्या ही 8 सौंदर्य उत्पादने
Vaidehi Raje
Best Cruelty Free Makeup Brands In Marathi | बेस्ट विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअप ब्रॅंड
Trupti Paradkar
दिवाळी पार्टीसाठी व्हा तयार, वापरा हे मेकअप पॅलेट
Trupti Paradkar