मॉर्डर्न लाईफस्टाईलमध्ये अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात. मेकअपमध्येही अनेक पद्धती आणि अनेक सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्यात येतो. मेकअप केल्याने सुंदर दिसण्यासह एक आत्मविश्वासही येतो. आपल्याला मेकअप करताना पाहून लहान मुलींनाही मेकअपची आवड निर्माण होते. त्यामुळे मुलींनाही आपल्याला मेकअप करायला हवा असे वाटू लागते. तर काही महिला अगदी लहानपणापासूनच मुलींना मेकअप करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? लहान मुलींना मेकअप केल्याने त्यांच्या त्वचेला नुकसान पोहचते. लहान वयातच चेहऱ्यावर अॅक्ने, अलर्जी अशा समस्या होतात. मेकअप तुमच्या मुलांच्या त्वचेला कशाप्रकारे हानी पोहचवते याबाबत अधिक माहिती.
त्वचेची हानी (Skin Damage)
सौंदर्य उत्पादनांमध्ये केमिकल्सचा वापर करण्यात येतो. हे केमिकल लहान मुलांच्या मुलायम आणि नैसर्गिक त्वचेला हानी पोहचवते. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे मेकअप हा परिपक्व त्वचेसाठी असतो. पण लहान मुलांच्या त्वचेचा विकास होत असतो. त्यामुळे त्यांच्या त्वचेला पटकन नुकसान पोहचते.
टीप – जर तुमची मुलगी मेकअप करण्यासाठी खूपच हट्ट करत असेल तर तुम्ही मेकअप करण्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावर बेबी मॉईस्चराईजर लावा अथवा क्रुएल्टी फ्री मॉईस्चराईजरचा उपयोग करून घ्या. यामुळे मुलीच्या त्वचेला त्रास होणार नाही आणि त्वचा अधिक वेळ हायड्रेट राहील.
चेहऱ्यावर येणारी मुरूमे (Pimples on Skin)
लहान मुलांची त्वचा ही अत्यंत मुलायम, मऊ आणि नाजूक असते. कमी वयात त्वचेवर मेकअप उत्पादनांचा वापर केल्याने त्वचेच्या आत मेकअप जाऊन त्वचा अधिक खराब होते. त्यामुळे त्वचेवर जळजळ होणे आणि मुरूमं येणे हे साहजिक आहे. कमी वयात मुरूमं येऊन त्वचा खराब होते.
टीप – मुलांना जास्त मेकअप उत्पादनांचा वापर करू देऊ नका. विशेषतः त्यांच्या चेहऱ्यावर फाऊंडेशन आणि कन्सीलरचा वापर करू नका
कोरडी त्वचा (Dry Skin)
बऱ्याचदा लहान मुलांच्या त्वचेनुसार सौंदर्य उत्पादन मिळतेच असे नाही. तुमची मुलगी जर अशा पद्धतीचे उत्पादन चेहऱ्याला लावते तर तिची त्वचा कोरडी होऊन त्वचेवर लालिमा येण्याचीही शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते यामुळे त्वचेवर इरिटेशन अथवा खाज येण्याचाही धोका असतो.
टीप – मुलीच्या चेहऱ्यावर मॉईस्चराईजर लावणे आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावर मऊपणा टिकून राहातो.
त्वचेवर येणारी अलर्जी (Skin Allergy)
मुलांची त्वचा अगदीच मुलायम असते आणि त्वचेचा विकास होत असते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावर फाऊंडेशन आणि कन्सीलर लावल्याने स्किन पोर्स बंद होतात. ज्यामुळे त्वचेवर अलर्जीची संभावना अधिक वाढीला लागते. मुलांच्या त्वचेवर मेकअप जास्त वापरल्याने त्वचेवर पुळ्याही येतात.
टीप – चेहऱ्यावर फाऊंडेशनच्या ऐवजी तुम्ही मॉईस्चराईजर अथवा बीबी क्रिमचा वापर करावा
मुलांना द्या योग्य मार्गदर्शन
लहान मुलांनी जास्त मेकअप अजिबात करू नये. कारण त्यांची त्वचेला मेकअपची गरज अजिबातच नसते. अगदीच नाटक, डान्स अशा कार्यक्रमांच्या वेळी केवळ काजळ, लिपस्टिक, लाईनर, मॉईस्चराईजर या सहज आणि सोप्या मेकअपचा वापर करावा. याशिवाय अन्य उत्पादनांचा वापर लहान मुलांच्या त्वचेवर करणे सहसा टाळावे. हे योग्य नाही
त्वचेवर इन्फेक्शन होण्यापासून कसे वाचावे, सोपे उपाय
- त्वचेवर कोणत्याही मेकअप उत्पादनांचा वापर करण्यापूर्वी तुम्ही एकदा पॅच टेस्ट नक्की करून घ्या
- मेकअप करण्यापूर्वी पहिल्यांदा मुलींना त्वचेवर मॉईस्चराईजर लावण्याची सवय लावा
- चेहऱ्यावर जास्त मेकअप लेअरचा वापर करू नका
- मेकअप कितीही परफेक्ट असला तरीही तुम्ही चेहऱ्यावर 2-3 तासांपेक्षा अधिक काळ ठेऊ नका
- चेहऱ्यावर लावलेला मेकअप तुम्ही क्लिंन्झरने स्वच्छ करा
- कोणत्याही मेकअप उत्पादनातून घाण वास येत असल्यास, त्याचा वापर अजिबात करू नका. कारण त्यामध्ये अधिक केमिकल्स असण्याची शक्यता असते
- मेकअप उत्पादने कधीही गरम जागा असणाऱ्या ठिकाणी ठेऊ नका
मुलांना मेकअपपासून दूर ठेवणे अत्यंत कठीण आहे. पण तुम्ही त्यांना कमीत कमी अर्थात मिनिमल मेकअप करा आणि त्यांचा चेहरा खराब होणार नाही याची काळजी नक्की घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक