Festival

अक्षय्य तृतीया : या दिवशी केलीत ही मंगल कार्ये तर पसरेल आनंद

Leenal Gawade  |  May 13, 2021
अक्षय्य तृतीया : या दिवशी केलीत ही मंगल कार्ये तर पसरेल आनंद

साडे तीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी हा अत्यंत पवित्र असा दिवस मानला जातो. खूप जण या दिवशी खरेदी करतात. सोनं खरेदी, गाडी खरेदी, घर खरेदी अशा बऱ्याच गोष्टी या दिनाचे औचित्य साधून केले जातात. पण या दिवशी आणखी कोणती मंंगलकार्ये तुम्ही करु शकता याची माहिती घेणेही गरजेचे आहे. यंदा 3 मे रोजी अक्षय्य तृतीया आली आहे. यंदाचा हा दिवसही लॉकडाऊनमध्ये असल्यामुळे तितक्या मोठ्या प्रमाणात सण साजरा करता येणार नाही. पण तरीही काही सोप्या आणि घरीच राहून आपण हा सण साजरा करु शकतो. तसंत एकमेंकाना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देऊ शकतो. जाणून घेऊया या दिवशी नेमकी कोणती मंगल कार्ये करावीत ते. 

या दिवशी नेमकी कोणती मंगल कार्ये करावीत

Instagram

अक्षय्य म्हणजे नष्ट न होणारे. असे म्हणतात की अक्षय्य तृतीयेला तुम्ही जर एखादी कोणती गोष्ट खरेदी केली की, ती वाढत जाते असते म्हणतात त्यानुसार काही गोष्टी या दिवशी अगदी हमखास करायला हव्यात.

  1. जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतीसाठी हा उत्तम काळ आहे असे म्हणतात की, या दिवशी शेती कामाला सुरुवात केली धान्य चांगले येते किंवा जी शेती करत आहात ती चांगली होती.
  2.  जर तुम्ही एखादे नवीन घर घेतले असेल तर तुम्ही गृहप्रवेश करु शकता.  कारण या दिवशी नवीन घरात जाणे हे फारच शुभ असते. 
  3. अक्षय्य तृतीया हा लग्नासाठी एक चांगला असा मुहूर्त आहे या दिवशी अगदी कोणताही मुहूर्त न पाहता तुम्ही लग्न करु शकता. लग्नसारखे मंगलकार्य हे या दिवशी केले तर फारच शुभ मानले जाते. 
  4. एखादी नवी संस्था तुम्ही सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आजच्या दिवशी याची सुरुवात करु शकता त्याचा तुम्हाला चांगलाच लाभ होईल. 
  5. बिझनेस करणाऱ्या व्यक्तींनी एखाद्या नवीन बिझनेसचा विचार केला असेल तर तुम्ही तो विचार न ठेवता तो आचरणात आणा. कारण त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ मिळू शकतो. 
  6. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही घराचे काम देखील सुरु करु शकता. घराचे नुतनीकरण करायला या दिवशी सुरुवात केली तर कोणतीहीन बाधा येत नाही.
  7. जर तुम्हाला काही दान करायचे असेल तरी देखील तुम्ही या दिवशी दान करा त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल. खूप जणांना दान-धर्माची आवड असते. पण ते कधी करावे हे कळत नाही. पण या दिवशी दान केले तर तुमची वृद्धी होते. 
  8.  घरात एखादी नवी वस्तू आणायची असेल तरी देखील तुम्ही या दिवशी एखाद्या नव्या महागड्या वस्तूची खरेदी करु शकता. 

    आता या मंगलदिनी नक्कीच चांगल्या गोष्टीची सुरुवात करा, तुम्हाला नक्की फायदा होईल.

Read More From Festival