प्रियदर्शन जाधव हे नाव मराठी चित्रपटसृष्टीला नवीन नाही. आपल्या विनोदबुद्धीने आणि हुशारीने प्रियदर्शनने आपला असा एक वेगळा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. गेले काही दिवस प्रियदर्शन आपल्या सोशल मीडियावर काही फोटो पाठमोरे पोस्ट करत होता आणि यांना ओळखता येतं का असा प्रश्न त्याने प्रेक्षकांनाही विचारला होता. आता हे नक्की काय गूढ आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. प्रियदर्शनने लवकरच काहीतरी नवीन घेऊन येणार आहे हे सांगितले होते. मात्र हे पाठमोरे कलाकार कोण आणि नक्की नाटक, चित्रपट, मालिका का वेबसिरीज यापैकी प्रियदर्शन प्रेक्षकांसाठी काय घेऊन येणार याची उत्सुकताही प्रियदर्शनने ताणून ठेवली होती. त्यामुळे आता प्रेक्षकांची ही उत्कंठा जास्त वेळ ताणून न धरता प्रियदर्शनच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे आणि या चित्रपटाचे नाव आहे ‘लव – सुलभ’.
महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर गीता माँ ची हजेरी
प्रियदर्शन पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे
लेखक-दिग्दर्शक-अभिनेता प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला आहे. “लव सुलभ” नावाच्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ठाणे येथे चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून ठाण्याचे विद्यमान महापौर नरेशजी म्हसके आणि चित्रपटाचे निर्माते प्रभाकर परब ह्यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे. देवी सातेरी प्रॉडक्शन्सच्या प्रभाकर परब यांनी “लव सुलभ” चित्रपटाची निर्मिती केली असून सहनिर्मिती स्वरूप स्टुडिओजच्या आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, विशाल घाग यांनी केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव याचे असून छायांकन केदार गायकवाड करणार आहेत तर सतीश चिपकर कलादिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत. प्रियदर्शन जाधवसह प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे मातब्बर अभिनेते या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. विशेष म्हणजे या चित्रपटाची प्रियदर्शन जाधव लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी निभावत आहे.
सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज पुरवणारा गोव्यातून अटकेत
नावातच आहे हटकेपणा
“लव सुलभ” हे चित्रपटाचं नाव अतिशय आकर्षक आहे. चित्रपटाच्या नावातून ही एक प्रेमकथा असेल असा अंदाज बांधता येतो. टीजर पोस्टरवर मेहंदी असलेल्या हातावरील बोटांत अंगठी आहे आणि त्या हातानं भिंतीवर स्त्री-पुरुषाची आकृती काढलेली दिसते पण चित्रपटाच्या कथेचा आशय अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. चित्रपटाचं नाव, स्टारकास्ट आणि पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये नक्कीच कुतूहल निर्माण झालं आहे. तर प्रियदर्शनने आपल्या एका वेगळ्या स्टाईलने चित्रपटातील कलाकारांचे आणि चित्रपटाचे प्रमोशन चित्रीकरणाच्या आधीपासूनच सुरू केल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे आता हा चित्रपट कसा असणार आणि बऱ्याच महिन्यांनी काहीतरी वेगळं आणि मजेशीर पाहायला मिळणार का याचीही उत्कंठा प्रेक्षकांमध्ये नक्कीच वाढली आहे. लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊन हा चित्रपट प्रदर्शित होईल. तसंच ईशा केसकर आणि प्रथमेश परब यांचे कामही चित्रपटामध्ये कसे असेल याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेने अखेर घेतला निरोप
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade