गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनामुळे (coronavirus) कडक निर्बंध करण्यात आले होते. त्यामुळे मराठी, हिंदी मालिकेच्या निर्मात्यांनी कलाकारांसह परराज्यांमध्ये चित्रीकरण चालू केले होते. अनेक मालिका सिल्व्हासा, गोवा, दमण आणि दिव येथे चित्रीकरण करत होत्या. पण आता पुन्हा एकदा चित्रीकरणाचे काही नियम बदलत मालिकांना मुंबईमध्ये चित्रीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने परराज्यातून गाशा गुंडाळत मुंबईमध्ये चित्रीकरणासाठी मराठी मालिकांचे निर्माते आणि कलाकार तयार झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा मुंबईला येत असल्याचेही शेअर केले आहे.
नव्या फोटोशूटमध्ये श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा
7 जूनपासून चित्रीकरणाला परवानगी
एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात कोरोनाच्या कहरामुळे कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र प्रेक्षकांचे मनोरंजन थांबू नये यासाठी परराज्यात चित्रीकरण करण्याचा निर्णय अनेक निर्मात्यांनी घेत आणि कलाकारांनी त्याला साथ देत चित्रीकरण चालू ठेवले आणि प्रेक्षकांचे मनोरंजनही केले. पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात निर्बंध शिथील करण्यात आले असून मनोरंजन क्षेत्राला 7 जूनपासून चित्रीकरण करण्यास काही अटी आणि शर्तींनुसार परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण करणे हे नक्कीच आव्हानात्मक आणि अधिक महाग आहे. निर्मात्यांनाही कोरोनामुळे तोटा सहन करावा लागला आहे. पण आता पुन्हा एकदा सर्वांनी परराज्यातील चित्रीकरण थांबवून परतण्याचा निर्णय घेत आपल्या महाराष्ट्रात चित्रीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे. ‘अगबाई सूनबाई’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘चला हवा येऊ द्या’ अशा अनेक मालिका आणि त्यातील कलाकार हे सध्या जयपूर, सिल्व्हासा, गुजरात इथे काम करत होते. पण आता पुन्हा एकदा आपल्या मुंबईतून काम करायला सर्व कलाकार सज्ज झाले आहेत.
पावसाचा आनंद द्विगुणित करतील ही मराठी चित्रपटातील गाणी
चित्रीकरण चालू करण्याची तयारी जोमात
सध्या अनेक मालिकांच्या सेटची आणि चित्रीकरणाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. या ठिकाणी सर्वांची काळजी घेण्यासाठी स्वच्छता, सॅनिटायझेशन, पावसाळ्यामुळे होणारी पडझड आणि त्याची सुरक्षा या सगळ्याची व्यवस्थित काळजी घेत आता पुन्हा एकदा सेट सज्ज होत आहेत. दुसऱ्या राज्यांमध्ये काही निवडक कलाकार आणि त्यांचा समूह घेऊन जाता आला होता. आता इथे पुन्हा एकदा मुंबईत असणारा स्टाफ आणि कलाकार चित्रीकरणात पुन्हा एकदा सहभागी होतील. दुसऱ्या राज्यात चित्रीकरण करताना निर्मात्यांवर वेगळे दडपणही होते. मालिकांमधील कलाकारांची जबाबदारी आणि त्यांची काळजी हीदेखील तितकीच महत्त्वाची होती. तसंच बाहेर चित्रीकरण असल्यामुळे कुटुंबापासून दूर असणे हे अजून एक शल्य आहे. पण या सगळ्याची तारेवरची कसरत सांभाळत सर्व कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे महत्त्वाचे समजत आपले काम उत्कृष्ट केले आहे. आता पुन्हा एकदा नव्याने सज्ज होत मुंबईतून चित्रीकरणासाठी सर्व कलाकार तयार झाले आहेत.
पहिल्या पत्नीच्या अफेअरबद्दल बोलणे नाही रुचले शिल्पाला, दिली ही प्रतिक्रिया
वेगळ्या वळणावर मालिका
मालिका सध्या वेगळ्याच वळणावर आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता आणि वेगवेगळे विषय हाताळत आता मराठी मालिका घोडदौड करत आहेत. प्रत्येक वाहिनीवरील मालिका आता पाहिल्या जात आहेत. सध्या घरातच असल्याने कोणताही दुसरा विरंगुळा नाही आणि त्यामुळे मालिकेतील निर्माते आणि कलाकार आपल्याकडून जास्तीत जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade