प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आणि मार्व्हल युनिव्हर्स मध्ये ओरिजिनल सहा अव्हेंजर्सपैकी एक असलेल्या हॉकआयची भूमिका साकारणारा जेरेमी रेनर सध्या भारतात आला आहे आणि इंस्टाग्रामवर त्याच्या भारतदौऱ्याचे अपडेट्स पोस्ट करत आहे. या हॉकआय स्टारने मंगळवारी राजस्थानच्या अलवरमध्ये मुलांसोबत गल्ली क्रिकेट खेळतानाचा एक फोटो शेअर केला होता आणि त्याने त्याच्या फॅन्सी जेवणाची छायाचित्रे आणि एक नवीन व्हिडिओ देखील शेअर केला. रेनरने लिहिले, “भारतातले जेवण म्हणजे अहाहा! अप्रतिम! Different dishes, different regions!” सकाळची सुरुवात शुभेच्छांनी झाली. आज एक मोठा खुलासा करणार आहे, अतिशय रोमांचक!!!” या कमेंटबरोबर त्याने सरड्याचा एक फोटो शेअर केला. रेनरला भारतातील उन्हाळ्याचा त्रास होत असल्याचे दिसतेय. कारण त्याने त्याच्या पुढच्या स्टोरीमध्ये लिहिले “हीटवेव्ह 115.”
एका वेब सिरीजच्या शूटिंगसाठी रेनर भारतात आलाय
रेनरची भारत भेट त्याच्या आगामी Disney+ चा रिऍलिटी शो रेनरव्हेशन्सच्या संदर्भात आहे. यापूर्वी, त्याचा सहकारी अव्हेंजर ख्रिस हेम्सवर्थने देखील त्याच्या नेटफ्लिक्स हिट एक्स्ट्रॅक्शनच्या शूटिंगसाठी भारतात चांगला वेळ घालवला होता. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपटांमध्ये जेरेमी रेनर क्लिंट बार्टन उर्फ हॉकआयचे पात्र रंगवण्यासाठी रेनर प्रसिद्ध आहे. त्याने 2011 च्या थॉर मध्ये मार्व्हल युनिव्हर्समध्ये पदार्पण केले होते आणि अलीकडेच त्याची डिस्ने+ वर हॉकीआय ही मालिका प्रदर्शित झाली होती. त्याला द हर्ट लॉकर आणि द टाऊनसाठी दोन ऑस्कर नामांकने देखील मिळाली होती.
यापूर्वी अनिल कपूर बरोबर केले काम
हॉलिवूड अभिनेता जेरेमी रेनर आणि अनिल कपूर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. दोन्ही कलाकार मंगळवारी राजस्थानच्या अलवरमध्ये शूटिंग करताना दिसले. जेरेमी सध्या भारतात त्याच्या आगामी प्रोजेक्ट रिनोव्हेशनसाठी शूटिंग करत आहे. ही रिऍलिटी सीरिज डिस्ने + हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या मालिकेत अनिल कपूरही दिसणार असल्याचं समजतंय. याआधी दोघेही 11 वर्षांपूर्वी आलेल्या मिशन इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉल या चित्रपटात एकत्र दिसले होते.
राजस्थानमध्ये घेतला गली क्रिकेटचा आनंद
जेरेमीने आतापर्यंत अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच त्याने राजस्थानच्या अलवरमध्ये मुलांसोबत क्रिकेट खेळतानाचा एक फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केला आहे. बुधवारी अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर जेरेमीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले, ज्यामध्ये अनिल कपूर देखील दिसत आहे. फोटोमध्ये अनिल कपूर आणि जेरेमीला चाहत्यांनी गराडा घातल्याचे दिसत आहे. तसेच फोटोमध्ये पार्श्वभूमीत अनेक शाळकरी मुले देखील दिसत आहेत.
इतर फोटोंमध्ये, जेरेमी बाहेर शूटिंग करताना दिसत आहे आणि चाहते त्याचे फोटो क्लिक करताना दिसत आहेत. अलवरच्या एका चाहत्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये, एक क्रू मेंबर अनिल कपूरला राजस्थानच्या उष्णतेपासून वाचवण्यासाठी त्याला पंख्याने वारा घालताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शननुसार, या मालिकेचे चित्रीकरण अलवरमधील ढोलगढी देवी मंदिरात करण्यात आले आहे. मार्वलच्या अव्हेंजर्स मालिकेमुळे, जेरेमी संपूर्ण भारतात खूप प्रसिद्ध आहे. अॅव्हेंजर्समधील त्याचे हॉकआय हे पात्र भारतीय प्रेक्षकांना खूप आवडले होते. या चित्रपटानंतर आलेल्या Hawkeye या वेब सीरिजला भारतासह जगभरातून खूप प्रशंसा मिळाली होती.
जेरेमी रेनरने स्वत:चे फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. जेरेमीचे भारतीय चाहते त्याचे सोशल मीडियावर जोरदार स्वागत करत आहेत. या फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, ‘राजस्थानमध्ये तुमचे स्वागत आहे.’ त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘पधारो म्हारे देस.’
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade