मनोरंजन

नेहा-यशच्या लग्नाचा ग्रँड सोहळा, एक आठवडा प्रेक्षकांना अनुभवता येणार

Leenal Gawade  |  Jun 7, 2022
यश- नेहा यांच्या लग्नाचा थाट

 टीव्हीवरील सगळ्यात जास्त गाजलेली मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgath)  ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. काऱण या मालिकेत अखेर नेहा-यशच्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे. नुकतीच या लग्नाची संपूर्ण शुटींग पूर्ण झाली असून काही फोटोही व्हायरल झाले आहेत. नेहाच्या लुक पासून ते तिच्या दागिन्यापर्यंत सगळ्याची चर्चा सगळीकडे होत आहे. जर तुम्ही या मालिकेचे चाहते असाल तर तुम्हाला एक आठवडाभर हा सगळा लग्नसोहळा पाहता येणार आहे. जाणून घेऊया काय असणार या लग्नाचे हायलाईट्स

पार पडला नेहा यशचा साखरपुडा

नेहा- यशच्या लग्नासाठी खूप जण उत्सुक होते. अखेर यांच्या लग्नाला सुरुवात झाली आहे. अनेक कठीण प्रसंगातून जात आता त्यांच्या लग्नाचा क्षण हा आलेला आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा देखील पार पडला आहे. या साखरपुड्याचे अनेक व्हिडिओज या आधीही व्हायरल झालेले आहेत .यश आणि नेहाचा साखरपुड्याचा लुकही तितकाच सुंदर आहे. हिरव्या रंगाची साडी त्यावर ऑक्सिडाईज ज्वेलरी असा लुक तिने केला आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तिची साखरपुड्याची अंगठीही तितकीच सुंदर आहे. आता हा मस्त सोहळा काल पाहून झाल्यानंतर आता हळद आणि लग्नाची प्रतिक्षा सगळ्यांना आहे.

शूटींग झाले पूर्ण

वेगवेगळ्या स्टाईलमध्ये ही जोडी आपल्या भेटीला तर येणार आहेच. पण या सगळ्या कार्यक्रमात काही ना काही ट्विस्ट नक्कीच असणार आहे. त्यामुळे या दरम्यानचे सगळे एपिसोड्स पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हे भाग प्रेक्षित व्हायच्या आधीच त्यांचे सगळे लुक व्हायरल झाले आहेत. 

नेहाच्या लुकची चर्चा

कोणत्याही मालिकेत लग्न असेल तर त्या मालिकेची चर्चा वाढू लागते. नेहा-यश हे मराठीमधील आवडती अशी जोडी आहे. या जोडीने लग्नासाठी काय काय घातले याची चर्चा होणे अगदी स्वाभाविक आहे. नेहाचे पात्र साकारणारी प्रार्थना बेहरे तिचे लग्नातील लुक हे फारच वेगळे आणि सुंदर आहेत. नेहाने लग्नासाठी छान हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. तर तिने लग्नासाठी छान गुलाबी अशी थीम केल्याचे दिसते. इश्क का रंग गुलाबी असे या दोघांच्या लुकमधून म्हणायला हवे. प्रार्थनाची गुलाबी साडी ही सुंदर असून तिची हेअरस्टाईल आणि त्यावरील दागिने हे देखील तितकेच सुंदर आहेत. तिने यावरील अनेक व्हिडिओज देखील केले आहेत

नेहाने दिल्या टिप्स

ज्यांची लग्न होणार आहेत त्यांच्यासाठी काही खास स्किन टिप्स देखील दिल्या आहेत. तिने एक मस्त व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने सगळ्या स्किन टिप्स शेअर केल्या आहेत. 

ता या लग्नाचा थाट आठवडाभर बघायला अजिबात विसरु नका. 

Read More From मनोरंजन