मनोरंजन

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेने अखेर घेतला निरोप

Leenal Gawade  |  Mar 8, 2021
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेने अखेर घेतला निरोप

एखादी मराठी मालिका प्रेक्षक पसंतीला उतरली की, ती वर्षानुवर्षे चालते. पण वेबसिरिजच्या काळात एपिसोड बेस्ड मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही आता खूप दिवस चालणारी रटाळ मालिका आवडेनाशी होते. मराठीत अशा काही मालिका आहेत ज्यांची सुरुवात ही सुंदर झाली पण टीआरपी वाढल्यानंतर ही मालिका अशी काय वाढवण्यात आली की, त्यामुळे मूळ मुद्दा सोडून या मालिकेने आपला ट्रॅक भरकटवला. त्यापैकीच एक भरकटलेली मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको’ ही मराठी मालिका. या मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका संपल्यामुळे काही जणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सीक्वलमध्ये आलिया, तरूणींच्या जीवनावर आधारित आहे कथा

मालिकेतील मुख्य कलाकाराच्या पत्नीने केली पोस्ट

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमध्ये अनेक बदल करण्यात आली. कथा रोमांचकारी बनवण्यासाठी तिला बरेचदा फिरवण्यात आले. या मालिकेमुळे अनेक नव्या चेहऱ्यांना ओळख मिळाली. त्यापैकीच एक म्हणजे अभिजीत खांडकेकर. आरजे म्हणून काम करणाऱ्या अभिजीतला या मालिकेने गॅरीच्या रुपात एक नवी ओळख मिळवून दिली. त्याला अमाप अशी प्रसिद्धी दिली. त्याची पत्नी अभिनेत्री सुखदा खांडकेकरने त्याच्यासाठी एक पोस्ट लिहून गुरुनाथ नावाचे पात्र साकारणाऱ्या अभिजीत खांडकेकरचे कोडकौतुक केले आहे. साडेचार वर्ष आणि 1350 एपिसोड्स इतक्या मेहनतीने जिद्दीने करत तू सिद्ध केलेस. असे म्हणत तिने त्याचे कौतुक केले आहे. 

राखी सावंतचा हा फनी व्हिडिओ तुम्ही पाहिलात का, अजूनही आहे बिग बॉसच्या घरात

 

मालिका झाली होती रटाळवाणी

मालिका या ट्रॅक भरकटू लागल्या की, रटाळ वाटू लागतात. ‘माझ्या नवऱ्याची बायको’  ही एका चांगल्या मेसेजसह सुरु झाली होती. पण जसे काही एपिसोड्स झाले आणि या मालिकेमध्ये स्थित्यंतर येत गेली. या मालिकेत अनेक नवे कॅरेक्टर आल्यानंतर ही मालिका आपला मेन ट्रॅक सोडू लागली. त्यामुळे अनेकांना ही नकोशी वाटू लागली. ही मालिका कधी बंद होईल याची प्रतिक्षा अनेकांना होती. असे असले तरी या मालिकेचा एक फॅनबेस होता. ज्यामुळे ही मालिका अनेकांच्या जवळीची होती. पण अखेर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 

मालिकेतील कलाकारांना मिळाली ओळख

या मालिकेतील कलाकारांना या मालिकेमुळे नक्कीच फायदा झाला. अभिजीत खांडकेकर, रसिका सुनील, अनिता दातार या सगळ्यांना या मालिकेमुळे एक नवी ओळख मिळाली. या मालिकेमुळे त्यांना इतरही काही काम मिळाली. आता ही मालिका बंद झाली असली तरी देखील या मालिकेच्या जागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक दर्जेदार मालिका पुन्हा एकदा झी मराठी चॅनेलवर पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर गीता माँ ची हजेरी

नव्या मालिका येणार भेटीला

झी मराठीवर अनेक नव्या मालिका भेटीला येणार आहे. यामध्ये रात्रीस खेळ चाले ३, तू मला न पाहिले, अग्गंबाई सासूबाई २ या मालिका भेटीला येणार आहेत. या मालिकेेंचे प्रोमो पाहता या मालिका नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करतील याची अपेक्षा आहे. 

दरम्यान, तुमची आवडती मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ सध्या तरी संपणार आहे.

Read More From मनोरंजन