अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र हा 2022 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ब्रह्मास्त्रचा ट्रेलर 15 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे. आता या चित्रपटाविषयी एक नवीन बातमी कानांवर पडतेय. ती म्हणजे मेगास्टार चिरंजीवी कथितरित्या या चित्रपटाचा एक विशेष भाग असणार आहेत.
चिरंजीवी यांची खास भूमिका
अनेकांना माहिती आहे की एसएस राजामौली हे ब्रह्मास्त्र चार भाषांमध्ये सादर करणार आहेत. चिरंजीवीबद्दल बोलताना, एका सूत्राने पिंकविलाला सांगितले की, “ब्रह्मास्त्र हा चित्रपट केवळ हिंदी चित्रपटसृष्टी नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचा चित्रपट आहे आणि हा चित्रपट यशस्वी व्हावा यासाठी चित्रपटाची टीम शक्य तितके प्रयत्न करीत आहे. एसएस राजामौली हा चित्रपट 4 भारतीय भाषांमध्ये सादर करणार आहेत आणि त्यासाठीच मेगास्टार चिरंजीवी यांच्याशी चर्चा सुरु आहे. चिरंजीवी या चित्रपटाचा विशेष भाग असावेत यासाठी निर्मात्यांचे प्रयत्न सुरु आहेत. स्त्रोताने पुढे सांगितले की अयान मुखर्जी हे चिरंजीवी यांच्याबरोबर खास भेट घेण्यासाठी हैदराबादला गेले होते. जरी या भेटीच्या तपशिलांबद्दल कोणालाही माहिती नसली तरी, अयान, ब्रह्मास्त्र टीम व चिरंजीवी यांच्यात काहीतरी चर्चा नक्कीच सुरु आहे. वास्तविक ‘ब्रह्मास्त्र’ हा हिंदीसोबतच तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये देखील प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत दक्षिणेकडील प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची जादू कायम ठेवण्यासाठी निर्माते चित्रपटाच्या यशासाठी आवश्यक ते सर्व करत आहेत. अशा परिस्थितीत आता चिरंजीवी यांना या चित्रपटाशी जोडण्याची तयारी सुरू आहे.. हैदराबादमधील ही बैठक बऱ्याच अंशी यशस्वी ठरली आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास चिरंजीवी यांची भूमिका लवकरच जाहीर केली जाईल, असा दावा केला जात आहे.
ब्रम्हास्त्र पूर्ण होण्यास पाच वर्षे लागली
ब्रह्मास्त्र पूर्ण व्हायला जवळपास पाच वर्षे लागली. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर आणि आलिया भट यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय आणि डिंपल कपाडिया यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांनी बिग बी आणि नागार्जुन यांच्या व्यक्तिरेखेचे पोस्टर रिलीज केले होते.रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा संपूर्ण भारतातील ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार असून रणबीर कपूरही आपल्या चित्रपटाचे दक्षिणेत प्रमोशन करत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट हिंदीत सादर करत आहेत व ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी हा चित्रपट दक्षिणेत सादर करण्याची जबाबदारी उचलली आहे. नुकताच रणबीर कपूर त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दक्षिणेत आला होता. त्यावेळी एसएस राजामौलीही त्याच्यासोबत होते.
‘ब्रह्मास्त्र’ संपूर्ण भारतात तीन भागात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर ‘शिव’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर आलिया ‘ईशा’च्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच, नागार्जुन आणि अमिताभ बच्चन यांचा लूक निर्मात्यांनी शेअर केला, जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार असून ट्रेलर 15 जूनला रिलीज होणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje