Mental Health

कोरोनाच्या भीतीने मानसिकदृष्ट्या खच्चीकरण, काय करायला हवं

Dipali Naphade  |  Jun 1, 2021
कोरोनाच्या भीतीने मानसिकदृष्ट्या खच्चीकरण, काय करायला हवं

या महामारीमध्ये अनेकांना भावनिक आणि आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. अनेकजण वर्षभरापासून घरातून काम करतायेत त्यांना नैराश्य, ताणतणाव जाणवू लागला आहे.यासाठी एकमेकांशी सातत्याने बोलत राहणं आणि सकारात्म विचार करत राहणं महत्त्वाचं आहे.  या परिस्थितीत देखील बदल होणार आहे हे लक्षात ठेवणं देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या माहितीचा सातत्याने भडिमार देखील मानसिकतेवर परिणाम करु शकतो. त्यामुळे जेवढी माहिती गरजेची आहे तितकीच घ्यायला हवी.या कठीण काळात, आपल्याला नित्यक्रमांचे पालन केल्याने फायदा होईल. हे आपले जीवन सामान्य बनवेल.या कठीण काळात आपण मानसिकदृष्ट्या निरोगी आणि सशक्त कसे राहता येईल यादृष्टीने प्रयत्न करा.तुम्ही त्या गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. याबाबत आम्ही डॉ. दिपाली अमोल घाडगे,जनरल फिजिशियन यांच्याकडून माहिती घेतली. 

पालकांनी मुलांमधील बदल वेळेत ओळखावेत

Freepik

गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्याने सतत घरात राहणं, मित्रपरिवार न भेटणं यामुळे मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होऊ लागला आहे.बरीच लहान मुलं नैराश्य, चिंता आणि तणाव यांसारख्या मानसिक समस्यांना समोरं जात आहेत. अशावेळी मुलांच्या स्वभावातील हे बदल पालकांनी ओळखून वेळीच आपल्या मुलांना मानसिक आजारातून  बाहेर काढावे. मुलांबरोबर पुरेसा वेळ घालवा.

कोरोना काळात #LongDistanceRelationship टिकण्यासाठी हे नक्की करा

दिवसभरातील आराखडा आखा

प्रत्येकाने दिवसभरात आपल्याला काय काम करायचे आहे, याचा आराखडा तयार करा. तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल अशा बातम्या वाचणे, पाहणे शक्यतो टाळाच. नियमित व्यायाम करा, ध्यान करा जेणेकरून  सकारात्मकता वाढेल तसेच तणावापासुन दूर राहता येईल. संसर्गापासून दूर राहता येईल अशा नियमांचे पालन करायला विसरू नका.

कोरोना काळात महिलांचे आरोग्य, स्वास्थ्य जपण्यासाठी काही सोप्या टिप्स

मित्रमैत्रिणींशी जोडलेले राहा

Shutterstock

शारीरिकदृष्ट्या नक्की आपल्या जवळच्या माणसांना अथवा मित्रमैत्रिणींना भेटता येत नाही. पण किमान दहा दिवसातून एकदा तरी सर्वांशी व्हिडिओ कॉलवरून बोला. एकमेकांशी संवाद साधा. एकटे राहू नका. आपल्या मनात असलेली मरगळ घालवा. आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलल्याने मनातील भार हलका होतो. तसंच तोचतोचपणा निघून जातो आणि वेगळ्या विषयामुळे मनातील नकारात्मक विचारही नाहीसे होतात. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी बोलल्याने तुम्हाला स्वतःला अधिक बरं वाटतं आणि मानसिक आधार मिळतो. 

कोरोना काळात वाटतेय अस्वस्थ, या टिप्स करतील मन शांत

खंगत बसू नका

तुम्हाला नक्की काय होतंय आणि काय वाटतं आहे ते स्पष्ट बोला. मनात गोष्टी ठेऊन खंगत बसू नका. त्याने तुमच्या मनावर अधिक परिणाम होऊन तुम्ही अधिक नैराश्याच्या गर्तेत जाता. त्यामुळे तुम्हाला जे वाटतं आहे ते किमान आपल्या जवळच्या व्यक्तींकडे व्यक्त व्हा. भेटणं शक्य नसलं तरीही किमान फोनवरून तुम्ही संवाद साधा. तुम्हाला जर अगदी जवळच्या माणसाकडे बोलायचीही भीती वाटत असेल तर तुम्ही एखाद्या एनजीओशी अथवा डॉक्टरांशी संपर्क साधून आपले मन मोकळे करा आणि मनावरील ताण कमी करा. 

घरात वेगवेगळ्या कामात मन रमवा

freepik

सध्या घरकाम, ऑफिसकाम, मुलांची कामे या सगळ्याचा काम आहे हे मान्य आहे. पण तरीही या सगळ्यातून वेळ काढून तुम्ही तुमच्या आवडत्या कामांमध्ये तुमचं मन रमवण्याचा प्रयत्न करा. पूर्ण तास झोप आवश्यक आहे. त्यामुळे अति विचार न करता तुम्ही व्यवस्थित झोपेकडेही लक्ष द्या. 

 

व्यायाम करा

Shutterstock

सध्या कुठेही बाहेर न गेल्याने शरीराला काहीही हालचाल मिळत नाही. त्यामुळे त्याचा ताण मनावरही येत आहे. पण तुम्ही दिवसातून किमान अर्धा ते पाऊण तास आपल्या स्वतःसाठी व्यायाम करा. यामुळे तुमची मानसिक स्थिती चांगली राहाते. विशेषतः योगा करा. सकाळीच उठून योगा केल्यानेही तुम्हाला मानसिक विचारांवर नियंत्रण मिळवणे सोपे होते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Mental Health