सगळ्या भाज्या खायच्या म्हटल्या की, त्यामध्ये बुळबुळीत लागणारी भेंडीची भाजी आलीच. खूप जणांना भेंडीची भाजी आहे म्हटले की, तोंड अगदी कडू कारले खाल्ल्यासारखे होते. भेंडीची भाजी ( Lady Finger) पासून भरलेली भेंडी, परतलेली भेंडी असे काही प्रकार बनवता येतात. ज्यांनी कधीही भेंडीची भाजी बनवली नाही आणि खाल्ली नाही अशांनी जर चुकून भेंडीची भाजी केली तर ती चिकट होते. भाजीला तार सुटावा अशी तार त्याला सुटले. अशी गिचकी आणि गुळगुळीत भाजी कोणालाही खायची इच्छा होत नाही. भाजी करताना तुम्ही नेमकी काय चूक करता हे लक्षात आवे तर तुमची भेंडीची भाजी अशी चविष्ट होईल की तुम्ही इतर कोणतीही भाजी खाणार नाही आणि भेंडीला नाही म्हणणार नाही.
भाजी स्वच्छ करताना
भेंडीची भाजी स्वच्छ करणे खूपच जास्त सोपे असते. या भाजीची देठ मोडून ती ताजी आहे की जुनं हे पटकन ओळखता येते. भाजीचे टोक पटकन मोडले की समजावे भाजी ताजी आहे. ही भाजी ज्या पद्धतीने करायची त्या पद्धतीने ती साफ करायाला हवी. तुम्ही थोडी ओलसर अशी भाजी करणार असाल तर ही भाजी गोल गोल चकत्यांमध्ये कापावी लागते. ही भाजी कधीही चिरल्यानंतर धुवू नका. त्यामुळे त्यात अधिक मॉईश्चर जाते. शिवाय त्या भाजीचा चीक अधिक जाणवून लागतो. भेंडी आधी स्वच्छ धुवून भाजीसाठी चिरावी. तुम्हाला भरलेली भेंडी करायची असेल तर तुम्ही त्यामधील बियादेखील काढू शकता. त्यामुळेही थोडा चिकटपणा नियंत्रणात येतो. कोवळी अशी भेंडी असेल तर त्या बिया तशाच ठेवाव्यात
भाजी शिजवताना
भेंडीची भाजी शिजवण्याची एक विशिष्ट अशी पद्धत आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीची भाजी करताना भेंडी फोडणीला घातल्यानंतर त्याचे झाकण लगेच अजिबात लावता कामा नये. भाजी परतली की, अगदी दोनच मिनिटांसाठी झाकण लावावे. त्यानंतर थोड्या मोठ्या आचेवर ही भाजी शिजवून घ्यावी. त्यामुळे भाजीला चिकटपणा अजिबात येत नाही. त्यांनतर मध्यम आचेवर उघडीच भाजी शिजवा. भाजी शिजली की, त्याला झाकण लावले तरी देखील चालू शकते. खूप जण भाजी शिजण्यासाठी भाजी फोडणीला घातली की, लगेचच झाकण मारतात.त्यामुळे भाजी गिचकी आणि बुळबुळीत होते.
भेंडीची भाजी कशी कराल?
बाजारातून भेंडी आणली की, छान स्वच्छ करुन घ्या. ती कपड्याने चांगली पुसून ठेवा. खूप जणांना झटपट अशा भाज्या बनवायच्या असतात. अशावेळी तुम्ही आदल्या दिवशी भेंडीची भाजी स्वच्छ करुन, पुसून आणि चिरुन ठेवली तर तुमच्या कामाचा ताण कमी होतो. भाजी भरलेल्या भेंडीची करायची असेल तर तुम्हाला त्या भेंडीच्या बिया काढता आल्या तर उत्तम. बिया अगदीच कोवळ्या असतील तर काढू नका. पण जुनं म्हणजेच मोठ्या असतील तर त्याकाढून टाका आणि मगच त्यामध्ये मसाला भरा. बर सांगितल्याप्रमाणे फोडणी दिल्यानंतर तुम्ही झाकण अगदी दोन मिनिटांसाठी लावा. त्यानंतर उघडूनच भाजी शिजवा. भेंडी कोवळी असतील तर ती शिजायला फारसा वेळ लागत नाही.
आता तुमची भेंडीची भाजी अशी चिकट होत असेल तर वर दिलेल्या काही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा.