‘आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही’ अथवा ‘देवाला सगळ्या ठिकाणी पोहचणं शक्य नाही म्हणून त्याने आईला पाठवलं’ अशी वाक्य आपल्या कानावर नेहमीच येत असतात आणि ती सार्थही असतात. कारण आई नसेल तर काहीच करता येणं शक्य नाही. 8 मे रोजी मदर्स डे (Mother’s Day) साजरा करण्यात येतो. जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. आईशिवाय काही योग्य वाटत नाही. तर आई दिवसभर आपल्यासाठी राबत असते. रोजचा दिवस हा खरा तर आईचा दिवस असतो. पण आईकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आणि मदर्स डे च्या शुभेच्छा (Mothers Day Status In Marathi) देण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. आपल्या आईसाठी घ्या खास गिफ्ट्स आणि करा मदर्स डे साजरा. आईला देण्यासाठी अनेक गिफ्ट्स तुम्ही निवडू शकता. त्यापैकी काही गिफ्ट्स आम्ही तुम्हाला सुचवत आहोत. तुम्हीही यावर्षी आईचा हा दिवस खरा खास. आईला मदर्स डे शुभेच्छा (Mothers Day Quotes In Marathi) देत तिचा दिवस खास करा.
नाजूक आणि आकर्षक कानातले
आईसाठी नक्की काय घ्यायचं असा जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर तुम्ही वामन हरी पेठे सराफ (Waman Hari Pethe Saraf) मध्ये अनेक आकर्षक आणि नाजूक कानातल्यांचे डिझाईन निवडू शकता. साधारण 3.500 ते 4 ग्रॅमपर्यंत वजनाचे सोन्याचे कानातले तुम्ही तुमच्या आईला गिफ्ट म्हणून देऊ शकता. सध्या सोन्याचा भावही काही प्रमाणात कमी झाल्यामुळे तुम्हाला नक्कीच या संधीचे सोने करता येईल. सोनं हे गुंतवणूक म्हणूनही योग्य आहे आणि तुमच्या आईसाठी काहीतरी चांगलं गिफ्ट घेतल्याचं तुम्हालाही नक्कीच समाधान मिळू शकतं.
साडी आहे उत्तम पर्याय
कोणत्याही आईला साडी आवडणार नाही असं होणार नाही. साडीला नेहमीच सौंदर्य आणि अभिजाततेचे प्रतिक मानले जाते. भारतभरातील या सुंदर साड्यांच्या कलेक्शन मधून साडी भेट देऊन तुमच्या आईला चकित करा. सध्या मिशो (Meesho) हे अॅपही चांगले चालू आहे. तुम्हाला तुमच्या आईच्या आवडीनुसार, या अॅपवरून तुम्ही साडी मागवून आईला आनंदी करू शकता.
फॉरेव्हरमार्क
आईसाठी हिरा खरेदी करणं हे प्रत्येक मुलामुलीचं स्वप्नं असतं आणि तुम्ही मदर्स डे च्या निमित्ताने हे स्वप्नं नक्कीच पूर्ण करू शकता. टाटा क्लिक लक्झरी (Tata CLiQ Luxury) मध्ये तुम्हाला 133 वर्षाची जुनी परंपरा असणाऱ्या De Beers Forevermark हिऱ्याची अंगठी, कानातले, ब्रेसलेट, पेंडंट्स, कफलिंग्ज, नोज पिन्स तुम्ही तुमच्या आईसाठी खरेदी करू शकता. तुमच्या आईला हे सरप्राईझ नक्कीच आवडेल.
अँटिक ज्वेलरी अर्थात दागिने
आपण वापरत असणारे तसेच दागिने दुसऱ्या कोणाकडे असतील तर नक्कीच आपल्याला आवडत नाही. त्यामुळे जर तुमच्या आईला अँटिक दागिने हवे असतील तर तुम्ही दस्सानी ब्रदर्सकडून तुम्ही अँटिक दागिन्यांचा पर्याय निवडू शकता. सोने, पोलकी दागिने आणि हिऱ्यांनी सजलेले दागिने तुम्हाला नक्कीच आपल्या आईसाठी घ्यायला आवडतील. याशिवाय पाचू आणि अन्य खड्यांनी सजलेले दागिने, त्यातील वेगळे डिझाईन्स हे तुम्हाला अधिक आकर्षित करते. पारंपरिक आणि अँटिक दागिन्यांचा हा सुंदर मेळ तुम्हाला तुमच्या आईसाठी नक्कीच आवडू शकतो. याशिवाय आईसाठी तुम्ही हे दागिने निवडल्यास, तिलाही नक्कीच आनंद होईल.
आईच्या त्वचेची काळजी
आई नेहमीच आपल्यासाठी झटत असते. तिची काळजी घ्यायला तिला वेळच नसतो. त्यामुळे मदर्स डे च्या दिवशी आईने आपल्या त्वचेची काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही MyGlamm च्या संकेतस्थळावरून Skincare – Haircare for your MOM या सेक्शनमध्ये जाऊन आईसाठी खास उत्पादनांची ऑर्डर करू शकता. या मदर्स डे ला तिच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. याशिवाय तुम्ही तिची घेत असलेली काळजी जाणवून आई नक्कीच भावूक होईल यात काहीच शंका नाही.
ऑर्गेनिक नाईट केअर किट
बऱ्याच जणांची आई कोणतेही उत्पादन चेहऱ्यावर वापरत नाही. पण त्वचेची काळजी घेताना नाईट केअर रूटिनही तितकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये नैसर्गिक घटक असणारे उत्पादन असेल तर आईला आणि आपल्याला दोघांच्याही डोक्याला त्रास राहात नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या आईसाठी Organic Harvest चे Night care Kit मागवून घेऊ शकता. आईची त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही उचललेले एक पाऊल खूपच महत्त्वाचे ठरेल हे नक्की.
बॉडी कलेक्शन
आईने आपल्या शरीराची आणि केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही टाटा क्लिक लक्झरी (Tata CLiQ Luxury) L’OCCITANE Almond Delicious Body Collection Gift Set देखील मागवू शकता. यामध्ये बदामाचा शँपू, शॉवर ऑईल असून याचे क्रिमी आणि सिल्की टेक्स्चर त्वचा अधिक चमकदार करण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरते. यातील बदामाचा घटक हा त्वचेला अधिक चांगले पोषण देण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आईच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी याचा नक्कीच वापर करू शकता.
यावर्षी आईला असे गिफ्ट्स देऊन करा सरप्राईज आणि द्या मदर्स डे चा आनंद भरभरून!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade