कॉमेडी शो ‘दी कपिल शर्मा’चे चाहते अनेक आहेत. हा शो देशभरात लोकप्रिय आहे. या शोचे फॉलोव्हर्स इतके आहेत की सेलिब्रिटीज काय पण प्रेक्षक म्हणून सामान्य माणसंही या शोमध्ये सहभागी होण्यासाठी संधी शोधत असतात. पण असं असुनही एक व्यक्ती आहे ज्यांना कपिल शर्मा शो मुळीच आवडत नाही. ही एक अशी व्यक्ती आहे की एकेकाळी ती कपिल शर्मा एवढीच लोकप्रिय होती. होय… ऐकून थोडं आश्चर्य नक्कीच वाटेल की महाभारतात भीष्मची भूमिका साकारणारे आणि शक्तीमान या नावाने आजही प्रसिद्ध असलेले अभिनेता मुकेश खन्ना यांना हा शो अजिबात आवडत नाही. याच कारणासाठी जेव्हा शोच्या नव्या एपिसोडसाठी महाभारत टीमसोबत मुकेश खन्ना या शोमध्ये सहभागी झाले नाहीत. याबाबत स्वतः मुकेश खन्ना यांनी स्वतः केला आहे धक्कादायक खुलासा…
या कारणासाठी नाही आवडत हा शो…
मुकेश खन्ना यांनी प्रेक्षकांसाठी या गोष्टीचा स्वतःच खुलासा केला आहे. त्यांच्या मते महाभारत टीमसोबत त्यांना या शोसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र आमंत्रण असुनही ते या शोमध्ये सहभागी झाले नाहीत. सहाजिकच लोकांनी हा प्रश्न व्हायरल केला की, महाभारत स्पेशल शो मध्ये पितामह भीष्म का नव्हते ? काहींनी वाटलं की मुकेश खन्नांना या शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं नसेल तर काहींनी मुकेश खन्ना वैयक्तिक कारणांमुळे या शोमध्ये सहभागी झाले नसतील असा अर्थ काढला. मात्र यावर आता मुकेश खन्ना यांनी उत्तर दिलं आहे. त्यांच्या मते, ” महाभारत पितामह भीष्मशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. पण या शोमध्ये जाणं मला आवडत नसल्यामुळे मीच या शोमध्ये सहभाग घेतला नाही”
यासाठी टाळलं शोमध्ये सहभागी होणं…
लोकांनी मुकेश खन्नांना विचारलं की दी कपिल शर्मासारख्या लोकप्रिय शोमध्ये जाणं तुम्ही का टाळलं? कारण या शोमध्ये मोठेमोठं सेलिब्रेटी जाण्यासाठी तयार असतात. यावर मुकेश खन्ना यांनी सडेतोडपणे सांगितलं की “ते जात असतील पण मुकेश खन्ना जाणार नाही” जरी कपिल शर्मा शो जगभरात लोकप्रिय असला तरी तो मला मुळीच आवडत नाही. मला हा शो अतिशय वल्गर आणि चीप वाटतो. घाणेरडे विनोद, डबल मिनिंग आणि अश्लिलता या शोमध्ये भरलेली आहे. जिथे पुरुष महिलांचे कपडे घालून घाणेरडे चाळे करतात आणि लोक यावर पोटधरून हसतात. अशा शोमध्ये मला जाणं पसंत नाही.
सिद्धू आणि अर्चनाला फक्त हेआहे काम
मुकेश खन्ना म्हणाले की या शोमध्ये लोक नेमकं का हसतात हे मला आजवर समजू शकलेलं नाही. एका व्यक्तीला मध्यभागी सिंहासनावर बसवलं जातं आणि त्याचं काम काय असतं तर फक्त हसणं. जरी त्यांना हसायला येत नसेल तरी त्यांना उगाचच हसावं लागतं. हसण्याचे त्यांना पैसे दिले जातात. पहिले यासाठी सिद्धू भाई बसत असत आता अर्चना ताई बसून करते हे काम. काम काय तर फक्त ‘हा हा हा’ करणं. या शोचा कॉमेडीचा स्तर इतका खालच्या दर्जाचा आहे की त्यांनी रामायण स्पेशल शोमध्ये श्रीराम यांची भूमिका साकारणारे अरूण गोविल यांच्यावर अतिशय घाणेरडे आणि अपमानास्पद विनोद केले होते. मुकेश खन्ना यांनी फक्त या शोचा प्रोमोच पाहिला आणि त्यांचा राग अनावर झाला होता.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
या महिन्याच्या शेवटी नेहा कक्कर अडकणार विवाहबंधनात, चर्चांना आलंय उधाण
सिंघम’ फेम काजल अग्रवाल लवकरच करतेय लग्न
अक्षय कुमारने ‘या’ चित्रपटांमध्ये साकारला आहे अफलातून खलनायक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje